आमच्या विषयी

शरणु शरणार्थ,

विश्वक्रांतीगुरु बसवन्ना यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरीत आणि लिंगायत धर्माच्या महान दार्शनिक परंपरेच्या मुळाशी बांधलेला ‘लिंगायत युवा.कॉम’ हा वैश्विक शरण-शरणींचा क्रांतीस्वर जगभरातील तमाम लिंगायत धर्मियांना एकत्रित करण्यासाठी व आपल्या महान अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय क्रांती स्वरूपाविषयी जाणीव करून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

लिंगायत युवा ही वेबसाईट लिंगायत धर्मीय युवक, महिला, ज्येष्ठ नागरीक  यासाठी वैविध्यपूर्ण माहिती, बातम्या, घडामोडी, विश्लेषण सादर करेल व लिंगायत धर्म जागृतीच्या एकात्म कार्यामध्ये आपला वाटा उचलण्याचा प्रयत्न करेल.

स्वतंत्र लिंगायत धर्मातील सर्व लिंगायत अध्यात्मिक व कायक परंपरांचे एकत्रीकरण व धर्मवृद्धीसाठी प्रयत्न, बसवक्रांती विचारांचा वैश्विक प्रचार व प्रसार, लिंगायत दर्शनाचे ऐतिहासिक व सद्यकालीन महत्व प्रस्थापित करणे, स्थानिकच नव्हे तर जागतिक विकास नियोजनात आणि विकास विचारांमध्ये ‘अनुभव मंटप’ च्या लोकशाहीत्मक चौकटीमध्ये सहभागी होणे व लिंगायत सिद्धांताना वैश्विक पातळीवर सिद्ध करून दाखवणे या व अश्या अनेक महत्वाच्या कार्यांना उत्तेजना देणे व त्यासाठी आवश्यक ज्ञानव्यवस्था रचणे यासाठी लिंगायत युवा. कॉम प्रयत्न करत राहील.

या उपक्रमामध्ये आपणही सामील होऊन आपले यथोचित योगदान द्यावे ही विनंती.

Print Friendly, PDF & Email