बहुजनांचा दिवाळीचा सण

1 min read

भारतीय सण, संस्कृती आणि परंपरा यांचा चिकित्सक अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येते . भारतीयांचा प्रत्येक सण हा शेती, ऋतू , निसर्ग यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या सण-उत्सवांची निर्मिती झाली. आदिवासी, कष्टकरी-कामकरी, गोरगरीब यांनी निसर्गसंमत सुरु केलेले सण कालांतराने दक्षिणेवर जगणाऱ्या लोकांनी या निसर्गसंमत सणांचा इतिहास काल्पनिक कथेच्या स्वरुपात लिहून विकृत करून टाकला. या कथेच्या मूळ नायकांना खलनायक बनविले.असोत. याचा विस्तार पुढे येणार आहे. आता आपण दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व पाहू या .

वसुबारस:

वसुबारस नाही , वाघाबारस हेच या पहिल्या दिवसाच्या उत्सवाचे नाव आहे. यादिवशी घरातील गोठ्यात असणाऱ्या गाई, बैल आणि वासरु यांना पाणवठ्यावर नेऊन स्वच्छ करावे,त्यांना छान सजवून त्यांना गोड अन्न खायला घालावे. वाघ, सिंह यासारख्या जंगली पशुपासून त्यांचे रक्षण व्हावे, अशी प्रार्थना करावी. गाई वासरांविषयी कृतज्ञता बाळगण्याचा हा दिवस आहे.

दीन दीन दिवाळी, गाई म्हैसी ओवाळी,
गाई-म्हैसी कोणाच्या, लक्ष्मणाच्या.

पण, आर्य ब्राह्मणांनी वाघबारस सणाचे नाव वसुबारस केले. गायी-वासरांचे रक्षण व्हावे म्हणून केल्या जाणाऱ्या सणाचा इतिहास त्यांचे पालन करण्याची भावना दूर करून ब्राम्हणांनी प्रत्यक्ष गायी- वासरू यांना कापल्याच्या कथा विकृतपणे वसुबारस नावाने खपवल्या. (अधिक माहितीसाठी वसुबारसेची चातुर्मासातील कथा वाचावी.)
काही श्लोकांच्या आधारे हे स्पष्ट होते, आता ” गो माता की जय ” म्हणणाऱ्या ब्राम्हणांनी गायी कापल्या नि खाल्या.

उक्ष्णो हि मे पंचदश साकं पचन्ति विंशमित्।
उताहमद्मि पवि इदुभा कुक्षी पृणन्ति में विश्वस्मादिन्द्र उत्तरः।।
(ऋग्वेद,१०-८६-१४.)

आद्रीणाते मंदिन इन्द्र तृयान्स्सुन्बंती |
सोमान पिवसित्व मेषा ||
पचन्ति ते वषमां अत्सी तेषां |
पृक्षेण यन्मधवन हूय मान : ||
(ऋग्वेद १०-२८-३.)

मन्यन्ननि पयः सानो मांस ववचानु परस्कृतम् अक्षार लवणं चैव प्रकृत्या हवि रुच्यते || (मनुस्मृती.)

एव्हढेच नाही तर एका अखंडात म. फुले लिहितात-

श्राद्धामध्ये गाया आर्यभट खाती । मौजा मारिताती । मृतानावे ।।१।।
पडझड गाया दीन मांग खाती । ब्राह्मण निंदिती । त्याला सर्व ।।२।।

म्हणजेच आर्य ब्राम्हणांनी त्यांची विकृती वसुबारसेच्या नावाने आम्हां भारतीयांच्या माथी मारली.

धनत्रयोदशी:

धानतेरस हा धान्याची मळणी करण्याच्या खळ्याची पूजा करण्याचा सण आहे. भाताच्या लोंब्याचे तोरण करून घराला लावतात. धान्याची पूजा करतात. वैदिकांनी धानतेरस शब्दाची मोड-तोड करून धनतेरस किंवा धनत्रयोदशी बनवली. काडीचाही संबंध नसणाऱ्या धन्वंतरीशी याचा संबंध जोडला.

नरकचतुर्दशी:

नृरक म्हणजे माणसाचे स्वरूप असणारा भूमीचा पुत्र भौमासुर. हा भौमासुरच्या पूजेचा दिवस आहे. हा भौमसुर सोळा सहस्त्र स्त्रियांची शेती करत होता. या शेतीतील कीटकांचा नाश व्हावा म्हणून त्याने दिव्याच्या उत्सवाची सुरवात केली. दिव्याच्या प्रकाशात पिकांना अपाय करणाऱ्या कीटकांचा नाश झाला. पण काहीही संबंध नसताना या दिवसाचा संबंध नरकासुराच्या खुनाशी जोडला गेला, कारण नरकासुर हा राक्षस होता. भौमसुराचा वध सत्यभामेने केला तरीही आज शेतकरी भूमी पौर्णिमेला भौम, दहीभात आणि फुग्याची धपाटे घेऊन शेतात जातात, भौमसुराला आदरांजली वाहून जेवण करून घरी येतात.

लक्ष्मीपूजन:

याच दिवशी विष्णूने कपटाने कोकणातून लक्ष्मीला पळवले, तिला आपली दासी बनवून पाय चेपायला लावले. कोकणातील शेतकरी लक्ष्मी परत यावी म्हणून यादिवशी प्रार्थना करु लागले. शेतातील नवीन धान्य आणि धान्य मोजण्याच्या मापाची पूजा करतात. चिरमुरे-बत्तासे प्रसाद म्हणून देतात. लक्ष्मीला वाचवायला गेलेली तिची थोरली बहीण अलक्ष्मीने देवांचा पराभव केला. तिला अलक्ष्मी, अक्काबाई, कडकलक्ष्मी अशी नावे मिळाली. म्हणून लक्ष्मीची मंदीरे सांगली , उस्मानाबाद जिल्ह्यात शेतात आहे.

बलिप्रतिपदा:

बळी हा बहुजनांचा नायक होता. बळीराजा एक महापराक्रमी राजा होता. त्याच्या राज्यात प्रजाच नव्हे तर मुके प्राणीही सुखी होते. शेतीची भरभराट होती. बळीराजा स्वतः शेती करत असे. त्याच्या राज्यातील असंख्य स्त्रियांनी त्याला भाऊ मानले होते. याच बळीराजाला वामन नावाच्या ब्राम्हणांने कपटाने त्याला ठार मारले. ब्राम्हण समाजात आजही बलिप्रतिपदा या दिवशी कनिकेचा बळी करून उंबरठ्यावर ठेवतात, घरातील प्रमुख पुरुषाने आपट्याच्या काठीने बळीचे पोट फोडण्याची प्रथा आहे. हा बळीराजाचा अपमान आहे. या बळीराजाला कपटाने मारणाऱ्या वामनाचे डोके बहुजन समाजाने या दिवशी फाेडावे. धान्याची बळीप्रतिमा करून त्याची पूजा करावी. आजही खेड्यापाड्यात आया-बहिनी ओवाळताना म्हणतात- ईडा पिडा जाऊ दे, बळीचे राज्य येऊ दे. हाच बळीचा सन्मान आहे. खेड्यातील शेतकरी कुटूंबात आजही शेणाची बळीची प्रतिमा आणि बळीच्या राज्यातील वेगवेगळे काम करणाऱ्या म्हणजेच तलवार चालविणाऱ्या, युद्ध करणाऱ्या, पाणी शेंदणाऱ्या, जेवण करणाऱ्या, रक्षण करणाऱ्या इ सर्व स्त्रियांच्या शेणाच्या प्रतिमा बनवून पूजा करतात. बळीच्या राज्यात स्त्रिया मुक्त होत्या, त्या चूल-मूल आणि चार भिंतीत बांधलेल्या नव्हत्या, हे यावरून समजते.

भाऊबीज:

बळीराम आणि सुभद्रा या भाऊ- बहिणीशी संबंधित हा सण आहे. बळीरामाकडून सुभद्रेने शेतीचे तंत्र शिकून घेतले. त्यामुळे शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळाले. त्या धान्याच्या राशीभोवती बळीराम, सुभद्रा, गोपी यांनी नृत्य केले. त्यालाच रासलीला म्हणतात. पण पुरोहित आणि श्रीमंतांनी आपल्या अनैतिक गरजा भागविण्यासाठी रासलीला शब्दाचा वापर केला. दुसरी एक कथा या सणाशी जोडली आहे ती अशी- यमाला यमी नावाची बहीण होती. ती यमाकडे शरीरसुखाची मागणी करते. यम तिला नकार देतो. अशी एक विकृत कथा या सणाच्या नावावर खपवतात. कोणती बहीण आपल्या सख्या भावाकडे अशी अपेक्षा व्यक्त करेल ? म्हणजे ही कथा साफ खोटी असल्याचे समजते. याच प्रकारे सणांच्या नावावर खोट्या, भ्रामक, काल्पनिक आणि विकृत कथा लिहून बहुजनांचा इतिहास बदनाम केला आहे.

संदर्भ:

डॉ. आ. ह. साळुंखे: बळीवंश,
डॉ. राजेंद्र कुंभार: दिवाळीचा खरा इतिहास
डॉ. नीरज साळुंखे: कुंतलदेश
पं. कृ. म. बापटशास्त्री: स्वयंपुरोहित, चातुर्मासातील कथा.
मनुस्मृती.
हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण, लेखक- एस एल सागर, भाषांतर-प्रमिला बोरकर
हिंदुत्व मुक्त भारत -कांचा आइलैय्या.
महात्मा फुले सम्रग्र वाङ्मय (पान क्रमांक : ५४२) संपादक : य. दि. फडके सुधारित पाचवी आवृत्ती, २८ नोव्हे. १९९१ प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ.
Dr. B. R. Ambedkar – Did the Hindus never it beaf ?
The complete work of swami vivekanand. (Vol.- 3.)

https://sanjaysonawani.blogspot.com/2015/10/blog-post_97.html?m=1

http://satishchandgupta.blogspot.com/2011/06/blog-post_03.html?m=1

नोंद: लेखात प्रस्तुत मते लेखकाची वैयक्तीक अभ्यासपूर्ण मते आहेत.

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
शरणी वरदानी गुड्डापूर दानम्मा कोण होत्या ?

महात्मा बसवण्णा  आणि शरणांनी १२ व्या शतकात शरण आंदोलन नावाने समग्र क्रांतीचे आंदोलन उभे केले. सामाजिक, धार्मिक, राजकीय, साहित्य, अर्थ,

Close