लिंगायत स्वतंत्र धर्म का ?

1 min read

प्रत्येक धर्माला धर्मसंस्थापक असतो. बौद्ध  धर्माचे  तथागत  बुद्ध, जैन धर्माचे वर्धमान  महावीर, ख्रिश्चन धर्माचे  येशू ख्रिस्त  हे धर्मसंस्थापक आहेत . तसेच  महात्मा बसवेश्वरच लिंगायत धर्माचे धर्मसंस्थापक आहेत. ते तुमच्या- आमच्यासारखे आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले एक तत्ववेत्ते, क्रांतीपुरुष आहेत. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

बसवादि शरणांनी आपल्या धर्माचे धर्मग्रंथ असणारे वचन कन्नड भाषेत लिहिले. म्हणून *कन्नड आमची धर्मभाषा आहे. लिंगायत धर्माची स्वतंत्र कन्नड भाषा आहे. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

बौद्ध धर्माचे त्रिपिटक, ख्रिश्चन धर्माचे बायबल, मुस्लिम धर्माचे कुरआन, शीख धर्माचे  गुरुग्रंथसाहेब त्याच प्रमाणे लिंगायत धर्माचे वचन धर्मग्रंथ आहे. वचन हे समानता पटवून देणारी धर्मग्रंथ  किंवा  धर्मसंहिता आहे.  *वचन हा लिंगायत धर्माचा स्वतंत्र धर्मग्रंथ आहे. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायत धर्माचे धर्मचिन्ह , ईश्वराचे चिन्ह , विश्वाचे चिन्ह इष्टलिंग आहे. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायताना स्वतंत्र धर्मक्षेत्र आहेत. ती बसवादि शरणांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहेत.  महाराष्ट्रातील सोलापूर, पुळुज(सोलापूर), रेणावी (विटा,सांगली), गुड्डापूर (जत,सांगली), कर्नाटक राज्यातील शरणभूमी कल्याण (सध्याचे बसवकल्याण), गुरु बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कुडलसंगम, बसवन-बागेवाडी, उडुतडी तसेच आंध्रप्रदेशमधील कर्दळीबन ही लिंगायतांची स्वतंत्र धर्मक्षेत्र आहेत. म्हणून  लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायत धर्माचा षटकोन इष्टलिंगसहित बसवध्वज हा स्वतंत्र ध्वज आहे. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायत पंचसुतक ( जन्माचे सुतक, मरणाचे सुतक,  मासिक पाळीचे सुतक, उष्टे खाल्ल्याचे सुतक,  जातीचे सुतक) हि पाच सुतक मान्य करत नाही. *लिंगायत सुतक पाळत नाहीत त्यांना सुतक मान्य नाही. म्हणून लिंगायत स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायत श्रमालाच, कष्टालाच ईश्वर मानणारा, श्रमातच देव शोधणारा धर्म आहे. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायत एकदेव उपासक आहेत, त्यांनी गळ्यातील इष्टलिंग एकच देव मानला आहे. *लिंगायतांनी बहुदेवतावाद नाकारला आहे, एकेश्वरवाद स्वीकारला आहे. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

महात्मा बसवेश्वरांनी देहालाच शिवालय म्हंटले आहे. लिंगायतांनी स्थावर मंदिर नाकारुन देहरुपी मंदिर स्वीकारले आहे. लिंगायतांच्या मते, कायाच कैलास आहे. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

अनुभवमंटप हेच लिंगायतांचे स्वतंत्र प्रार्थनास्थळ, स्वतंत्र विचारपीठ आहे. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायत पंचांग, ज्योतिष, भविष्य पाहत नाही, त्यावर विश्वास ठेवत नाहीत. लिंगायत मन, मेंदू आणि मनगटातील शक्तीलाच प्रमाण मानतात. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायत श्राद्ध, पितर, दिवस हे कर्म करत नाहीत. लिंगायताना पुनःजन्म, स्वर्ग-नरक, कैलास या कल्पना मान्य नाहीत. म्हणून लिंगायत स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायतांनी वेद, वेदांगे, उपनिषदे, आगम-निगम, शास्त्रे नाकारली आहेत. म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायत तीर्थयात्रा, तिर्थस्नान, समुद्रस्नान करत नाहीत, ते स्थावर देवांची पूजा-अर्चा करत नाहीत, कर्मकांड-अवडंबर करत नाहीत. त्यामुळे लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

लिंगायत जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद, वर्गभेद मान्य करत नाहीत, म्हणून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.


लेखन: अभिषेक देशमाने,   9822054291

वरील लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची स्वतःची आहेत. सर्वाधिकार व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
मराठवाड्यातील संतकवी बसवदास

महात्मा बसवण्णांवर अभंगरचना करणारेे संतकवी बसवदास.  इ. स. १९०३ ते १९२३हा बसवदासांच्या प्रत्यक्ष कार्याचा काळ. मराठवाड्यातील नांदेडमधील हणेगावचे ते रहिवासी

Close