राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना वसुंधरा रत्न पुरस्कार

1 min read

लातूर: अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय वसुंधरा पुरस्कार नुकताच दिल्ली येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

स्वतंत्र लिंगायत धर्म आंदोलन आणि लिंगायत धर्मास घटनात्मक अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी  अविरत झटणारे अहमदपूरकर महाराज हे महाराष्ट्र व कर्नाटकातील लिंगायत धर्मियांना पूजनीय आहेत.

१०२ वयाचे महाराज अजूनही तरुणाच्या उर्जेप्रमाणे चळवळीमध्ये भाग घेऊन लिंगायत धर्मासाठी झटत आहेत.

वसुंधरा रत्न पुरस्कार दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.

पुरस्कार मिळाल्याबद्दल जागतिक लिंगायत समुदायाकडून महाराजांचे नम्रतापूर्वक अभिनंदन केले जात आहे.


 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
लिंगायत वधू वर परिचय, पूज्य कोरणेश्वर स्वामी यांचे सुरतमध्ये आगमन

सुरत: लिंगायत धर्मगुरु, प्रवचनकार, लिंगायत धर्माचे राष्ट्रीय प्रतिनिधी पूज्य कोरणेश्वर आप्पाज, उस्तुरी निलंगा, लातुर यांचे  महाराष्ट्र त्रिलोकेश्वर युवक व महिला

Close