३ डिसेंबरच्या सांगली लिंगायत महामोर्च्याची तालुका बैठक उद्या पलूसमध्ये (२६ ऑक्टो)

1 min read

पलूस: सांगली येथे ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची तालुकास्तरीय बैठक उद्या पलूस इथे आयोजित करण्यात आली आहे.

पलूस येथील शिवपार्वती सभागृहात संध्याकाळी ६ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

‘लिंगायत धर्मास स्वतंत्र घटनात्मक दर्जा व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा’, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती, बसव ब्रिगेड व लिंगायत धर्मियांच्या अनेक संघटनांतर्फे सांगली येथे ३ डिसेंबरला या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये श. अविनाश भोसीकर, श. प्रदीप वाले सर, श. विश्वनाथ मिरजकर, श. नामदेव करगणे, श. महादेव चिवटे, व श. राजेंद्र कुंभार मार्गदर्शन करणार आहेत.

३ डिसेंबरच्या सांगली येथील मोर्च्यासाठी नियोजन करण्यासाठी पलूस तालुक्यातील सर्व लिंगायत शरण- शरणींनी दुपारी ३ वाजता एकत्र यावे, असे आवाहन बसव ब्रिगेड तर्फे करण्यात आले आहे.


Print Friendly, PDF & Email
Read previous post:
बसवचळवळीचे आत्मकथन

रोपट्याच जस झाड व्हावे तसे माझा विस्तार होत आहे, दिवसाला बसवतत्व जगणाऱ्या आणि जगायला शिकविणाऱ्या तत्ववेत्यांची संख्या वाढत आहे. मला

Close