बसवचळवळीचे आत्मकथन

1 min read

रोपट्याच जस झाड व्हावे तसे माझा विस्तार होत आहे, दिवसाला बसवतत्व जगणाऱ्या आणि जगायला शिकविणाऱ्या तत्ववेत्यांची संख्या वाढत आहे. मला बसवचळवळ नाव कोणी दिले हे मला माहित नाही, कदाचित बसवविचाराचे  प्रसार- प्रचार आणि बसव विचाराचे सच्चे शरण घडविण्याच्या माझ्या सामर्थ्याने मला बसव चळवळ असे नाव मिळाले आहे. कोणी मला लिंगायत धर्म चळवळ म्हणतात. नावाचा विषय महत्वाचा  नाही.  आज मला खूप बोलायचं आहे तुमच्याशी. कारणही तसच आहे आज  माझ्या विचारांचा प्रसार करणाऱ्या  एका माझ्या शरणांचा जन्मदिवस आहे. त्यांच नाव आनंद बळीराम कर्णे.  भगिरथी नावाच्या सोज्वळ, सात्विक, प्रेमळ मातेच्या उदरी तुमचा जन्म झाला. वडील बळीराम कर्णे हे कायकनिष्ठ शेतकरी आहेत.  या शेतकरी दाम्पत्यांच्या पोटी दिनांक १७ ऑक्टोबर, १९८४ रोजी  तुमचा जन्म झाला.  अशिक्षित  शेतकरी मातापित्याच्या पोटी जन्म घेऊन आपण  उच्चशिक्षण घेतले.  आपण एम. ए. अर्थशास्त्र (प्रथम श्रेणी), एम. जे. ऍण्ड एम. एस. (प्रथम श्रेणी), बी. एड. (विशेष प्राविण्य), एम. ए. ( राज्यशास्त्र),  या पदव्या  यांनी संपादन  केल्या आहेत. म. बसवण्णा, छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर तुम्ही व्याख्यान देता.  चळवळीसाठी अवश्य असे मानवकेंद्री विचार पेरणारे महापुरुषांचे विचार तुम्ही बहुजन समाजापर्यंत पोहोचवले.

शालेय जीवनापासून तुम्हाला भाषण कलेचे आवड होती. ती तुम्ही जोपासली.  महाविद्यालयात कथाकथन, वक्तृत्व, वादविवाद, नाट्य स्पर्धा  यात तुम्ही विविध पारितोषिक पटकविले.  कलाकार हा हाडाचा असतो हे तुम्ही सिध्द केले.  एन. एस. एस. , संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघातून तुम्ही  सामाजिक कार्यात सहभागी झालात.  प्रा. श्याम मानव यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यशाळेत तुम्ही उस्फूर्त सहभाग घेतला.  राज्यशास्त्रीय अर्थशास्त्रीय परिषदेत तुम्ही सहभाग घेतला.  शंभर शाळेतून तुम्ही मनोरंजनातून प्रबोधन केले.  मी वेडा का झालो ?, नशीब, मला जगायचय ! या तुम्ही लिहिलेल्या कथांचे तुम्ही विविध ठिकाणी सादरीकरण केले.  तुम्ही ग्लोबल व्हिजन संस्कार केंद्राच्या माध्यमातून  नांदेड शहरात तुम्ही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

सर, तुमच्या या  समाजसेवी कार्याबद्दल  तुम्हांला काही पुरस्कारही मिळाले त्यात  यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्याकडून २००८ साली अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि  मराठवाडा युवा वक्ता हा   २०११ सालचा पुरस्कार तुम्हांला मिळाला.  मराठा सेवा संघाकडून तुम्हांला गुणवंत विद्यार्थी  पुरस्कार मिळाला. जगद्गुरू संत तुकाराम साहित्य परिषद शाखा नांदेडच्या उपाध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली.  अशा अनेक पुरस्काराने तुम्हांला सन्मानित करण्यात आले आहे.

महात्मा बसवण्णा, छ. शिवराय आणि डॉ. आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी बहुजननायक व समाजसुधारकांच्या जीवनकार्यावर आधारित महाराष्ट्रात ५०० पेक्षा अधिक  व्याख्याने सर तुम्ही आजपर्यंत दिली आहे. यशवंत विद्यालयाच्या यशवंत वार्षिक अंकातून तुम्ही  लिखाण केले आहे.  दै. नांदेड आज या दैनिकाचे उपसंपादक म्हणून तुम्ही कार्य केले.  सन २०१३  पासून तुम्ही  मास्टर दीनानाथ मंगेशकर कनिष्ठ महाविद्यालय सोमठाणा,   ता नायगाव जि नांदेड येथे अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून तुम्ही उज्वल काम करत आहात. तुमच्या या शिक्षकी पेशात तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले आहेत, सर्व विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणून तुमचा गौरव आहे. अगदी आमचे, माझे ही आवडते शिक्षक तुम्ही आहेत.

 सर,  तुम्हाला उत्तम आरोग्य, यश, कीर्ती, सदकीर्ती, आमच्या सर्वांचे असीम आणि न संपणारे प्रेम मिळावे ही गुरू बसव चरणी प्रार्थना..

पुन्हा एकदा तुम्हाला जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…..

लेखन: अभिषेक देशमाने, ९८२२०५४२९१.

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
लिंगायत: एक विज्ञानवादी धर्म

लिंगायत एक विज्ञानवादी धर्म आहे १२ व्या शतकात शेतकरी कुळात जन्मलेले विश्वगुरु बसवण्णां यांनी सर्व बहुजन व्यवसाय जातींना एकत्र करून

Close