लिंगायत: एक विज्ञानवादी धर्म

1 min read
डॉ. महादेव जोकारे
Follow me

डॉ. महादेव जोकारे

डॉ. महादेव जोकारे हे व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.जोकारे सर लिंगायत धर्माचे अभ्यासक व तज्ञ असून महात्मा बसवेश्वरांच्या दर्शनावर ते सतत लिखाण करत असतात.
डॉ. महादेव जोकारे
Follow me

लिंगायत एक विज्ञानवादी धर्म आहे १२ व्या शतकात शेतकरी कुळात जन्मलेले विश्वगुरु बसवण्णां यांनी सर्व बहुजन व्यवसाय जातींना एकत्र करून समतेची क्रांती केली, तो काळ म्हणजे भयंकर कर्मकांडात बुडालेला काळ, कुठल्याही सामान्य जनतेस मंदिर प्रवेश नव्हता, अगदी शेतकऱ्याला  सुद्धा प्रवेश नव्हता, अनेक देव उपासना केली जात होती, बसवण्णांनी नेमकं ह्याच गोष्टीला विरोध केला आणि समतेची नवीन बीजे “लिंगायत” नावाचा धर्म स्थापन करून मानव समाजात पेरला, ज्यात सर्व मानवजात एक आहे, स्त्री पुरुष सुद्धा एकच आहेत, स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात बसवण्णांनी केली.

बसवण्णा एक महानतत्वज्ञ तर होतेच शिवाय एक महान शात्रज्ञ आणि गणितज्ञसुद्धा होते याची प्रचीती त्यांच्या वचन साहित्यातून येते. प्रत्येकाचा देव एकच आहे जो सर्वशक्तिमान “शिव” आहे तो सर्व बहुजनांचा आदिपुरुष आहे फक्त त्याच परशिवाची पूजा इष्टलिंगाच्या स्वरुपात करण्यास सुरुवात केली, कारण सामान्यांना मंदिर प्रवेश नव्हता म्हणून बसवण्णांनी हा आपला देहचं देऊळ आणि आपल्यात असणारा प्राणलिंगरुपी शिवाला पुजाण्यासाठी इष्टलिंगाची निर्मिती केली. बसवण्णांच इष्ट्लिंग जनक असल्याची अनेक बसवादी शरण वचनकारांनी आपल्या वाचनातून तसा उल्लेख केला आहे. अक्का महादेवींनी तर स्पष्ट पणे इष्टलिंगाचे जन्मदाता पिता ‘बाप’ महामहीम बसवण्णा आहेत असा उल्लेख केला आहे:

“अंगदल्ली आचारव तोरीद;

आ आचारवे लिंग वेंद अरुहीदा.

प्राणदल्ली अरीवा नेलेगोळसिदा;

आ आरीवे जंगमवेंदू तोरीदा,

चन्नमल्लिकार्जूनन हेत्त तंदे संगन बसवण्णनु यनगे कर्मवन अरुहीदनय्या प्रभुवे”

ह्या प्रस्तुत वचनात ‘हेत्त तंदे’ चा अर्थ जन्म देणारा बाप असा सरळ सरळ अर्थ होतो.

बसवण्णांनी इष्टलिंगाची निर्मिती करून ते सर्व बहुजनांना ‘शिव’ ह्या एकच देवाची पूजा करण्यास सांगून त्यात इष्ट्लिंग त्राटक योगात कसा विज्ञान लपलेला आहे, इष्टलिंग पूजेने आपल्याला काय फायदा होतो, त्यांने कसा शरीर निरोगी राहतो, आपण कसा दीर्घआयुषी होऊ, अपघाती मरण येणार नाही ह्या संदर्भातील अनेक वचने बसवण्णांनी लिहिली आहेत. पण त्यासाठी इष्ट्लिंग पूजा कधी करावी कशी करावी याची सुद्धा माहिती बसवण्णांनी आपल्या वचनात दिली आहे. इष्टलिंग म्हणजे बसवण्णांनी मानवाला दिलेला एक Scientific Device अथवा Gadget आहे असं म्हंटल तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

लिंगायत धर्मात कायकाला (व्यवसाय-उद्योग) खूप मोठ महत्व आहे, स्वतःचा व्यवसाय करता करता देव पूजा आणि योग यांचा सांगड म्हणजेच इष्ट्लिंग योग पूजा. यासाठी काही वचनांचा उदाहरण घेऊयात.  “सुप्रभात समयदल्ली अर्थीयल्ली लिंगव नेनेदरे, तप्पववु अपमृत्यू, कालकर्मगळैय्या”. याचा मराठीत अर्थ समजून घेवू: सुप्रभात समई प्रेमभराने जो इष्टलिंग पूजा करील त्याची चुकेल अपमृत्यू. याचा आत्ताच्या मॉडर्न सायन्स-विज्ञानात त्याचे स्पष्टीकरण केले तर इष्टलिंग पूजनांने मनाची एकाघ्रता वाढतो, त्यामुळे वाहन अपघात टाळता येतो, शिवाय मन स्थिर राहिल्याने अनेक दुर्धर आजार टाळता येतात, आजच्या नवीन वैधकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे की कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आणि अल्झामायर सारखे अनेक दुर्धर दुरूस्त ना होणारे (Non-Curable Diseases) रोग हे मानसिक अस्थिरतेतून होतात ज्याची सुरुवात आयुष्याच्या लवकर असू शकते. होमिओपॅथी औषध शास्त्रात तर मानसिक लक्षणे खूप म्हत्वाचे आहेत Mind ला खूप महत्व दिले आहे. इष्टलिंग म्हणजे काय हे सुद्धा बसवण्णांनी आपल्या वचनांतुन सांगितले आहे:

“चंद्रशिलेयल्ली पावकहुट्टी;

इडा पिंगळ मध्यदल्ली अनिल तुंबी अरीदरीदु !

निम्म नेनेव परिकर होसत्तु !

अरीवडे तेले इल्ला;

हिडीवडे वडलिल्ला कुडलसंगमदेवा; निम्म शरणन परीइंत्तुटू; अरीदरीदु !”

 

‘चंद्रशीला’ म्हणजे ‘सिलीकॉन’(Silicon) जो संगणकात मेमरी म्हणून वापरला जातो, होमिओपॅथी मध्ये औषध म्हणून वापरला जातो, शिवाय शेतीत पिक संरक्षक म्हणून मुळांना आणि फवाऱ्याच्या स्वरुपात सिलिकॉन दिला जातो. ह्या चंद्रशिलेपासून उत्पन्न झालेला इष्टलिंग हा निर्गुण स्वरूपातील शिवाचा प्रतिक आहे, ज्यास शीर आणि धड नाही.  इष्टलिंग पूजा कधी करावा तो वेळही खूप महत्वाचा आहे:

“गांधारी माधारी यंब अहोरात्रीयल्ली लिंगव पुजीसबेकू;

ऊर कोळी कुगुदमुन्न काड नवीलू ओदरदमुन्न;

तुंबी मुट्टी पुष्प निर्माल्य वागद मुन्न लिंगव पुजीस बेकू”.

वरील वचनात बसवण्णांनी सांगितले आहे भल्या पहाटे गावातील कोंबड्यांनी बांग देण्याआगोदर, रानातील मोर टाहोण्याच्या आगोदर, कळीचे पुष्प होण्याआगोदर इष्टलिंग पूजा करणे आवश्यक आहे, हा वेळ साधारण पणे पहाटे ३-४ पासून सुर्योदयापूर्वीची आहे. इष्टलिंग पुजेस बसण्याची पध्दत सुद्धा खूप महत्वाचे आहे तो  शरण बहुरूपी चौडय्या यांच्या वचनात आहे:

“पद्मासनदल्ली कुळीतीर्दू आधारम

बलीदू वायू उद्रेक तीद्दी मनपावन

बिंदूव तरहरवम माडी षडधार कमलवनोद्रय

मुखवम्म माडी मेल्लण सहसृष्यकमलमध्य दोळीप्प ज्योतिर्लिंगदल्ली मनव

निल्लिसी नेनेनेनेदु कीटभृंग न्यायादंतप्पुदे योग रेक्कण्णा प्रिय नागीनाथा.”

ह्या प्रस्तुत वचनात इष्टलिंग पुजेसाठी पद्मासनात बसावे आणि ज्योतिर्लिंग म्हणजे इष्टलिंग, इष्टलिंगातून निघणाऱ्या पण  न दिसणाऱ्या ज्योती कडे एकटक लाऊन पाहावे, श्वासोश्वास नियंत्रित होऊन आपल्या नेत्राने इष्टलिंगावर लक्ष केंद्रित होतो, मन स्थिर होऊन हृदयाची गती नियंत्रित होते , श्वसनाला एक विशिष्ट गती मिळते, बसवण्णांनी आपल्या वचनात ‘अनिल’ असा उल्लेख केला आहे. ‘अनिल’ म्हणजे हवा, यात मध्य असा उल्लेख आहे तो मध्य नाडी संदर्भातील आहे ज्याला सुषुम्न नाडी म्हणतात, इडा आणि पिंगळ ह्या सुद्धा उजवी आणि डावी नाडया आहेत ज्यांचा उल्लेख बसवण्णांनी आणि अल्लमप्रभूदेवांसह अन्य शरणांनी सुद्धा केला आहे:

“वेद नव्हे प्रमाण, शास्त्र नव्हे प्रमाण, शब्द प्रमाण नव्हे लिंगासी;

पहा  हो ! अंगसंगी मनाच्या ‘मध्यात’ (सुषुम्न नाडी) स्थित प्राणलिंगाचे रहस्य

अनुभवलेला, गुहेश्वरा, तुमचा शरण.

या अल्लमप्रभूदेवांच्या वचनात ‘मध्य’ नाडीचा उल्लेख आहे.

इष्टलिंग पूजा करताना पेल्यातील पाण्यात ओंकार प्रणव काढून त्याचे पादोदक तयार करून तेच पाणी पूजेसाठी वापरावा. इष्टलिंग पूजेच्या वेळी कुठल्या मंत्राचा उच्चारण करावा ? याच उत्तर  अल्लमप्रभूदेवांनी सांगितले आहे  ” ॐ नम: शिवाय ! आणि  ‘ओम ॐ श्री गुरु बसव लिंगायनमः’ मंत्र उच्चारण सांगितला आहे. त्याचे वैज्ञानिक कारण आपल्या वचनातून सांगितला आहे:

“तनुवा तोंटव माडी मनुवा गुदली् माडी अगेदू कडेदेनय्या भ्रांतीया बेरा;

सुषुम्नांळदिंद उदक बतीशी

‘बसव’ गळरनु हसगेडी सिहीरीदू”.

तन हे शेतमळा करून मनाचे कुदळ करून भ्रांतीरुपी झाडाचे मुळे खणेन, मध्यात असणाऱ्या सुषुम्न नाडी फक्त ‘बसव’ ह्या गोड नावाने उदीपित होईल. ह्या वचनातून अल्लमप्रभूदेवांनी ‘बसव’ नामाचा महत्व विस्तारित केले आहे. बसवण्णांना ‘विश्वगुरु’ म्हणून सुद्धा अल्लमप्रभूदेवांनी गौरविला आहे. आपण स्वतः सुद्धा ‘ओम ॐ श्री गुरु बसव लिंगायनमः’ चा मंत्र उच्चार केल्यास त्याची नक्कीच प्रचीती येईल.

आता आपण इडा, पिंगळ, मध्यातील सुषुम्न नाडी बद्दल योगिक दृष्ट्यामाहिती घेऊयात, योग हि मुळ शिव (द्रविड) संस्कृतीची देण आहे, हडप्पा उत्खननांत योगिक मुद्रेतील शिव शिल्प सापडला आहे.

१) इडा नाडी –डावी बाजू ,सशक्त डाव्या बाजूमुळे आपण भावनिक संतुलनात असतो, डाव्या बाजूचा प्रभाव अधिक वाढल्याने आपण आळशी होतो आणि स्वतःला कमकुवत समजून इतरांना श्रेष्ठ मानु लागतो,इतरांचे प्रभुत्व चालवून घेण्याची प्रवृत्ती वाढते याला वैध्यकीय भाषेत Inferior Complexity म्हणतात, डावा मेंदू भाषा, गणित, भेदभाव, व स्वार्थ भावना , Negative Thoughts, विचार निर्माण करतो. म्हणून डाव्या हातात इष्टलिंग ठेवून इष्टलिंग योग त्राटक करण्यास बसवण्णांनी सांगितले आहे. ज्यांनी हि नाडीनियंत्रित राहते .

२) पिंगला नाडी –उजवी बाजू , चांगल्या उजव्या बाजूच्या सिद्धीमुळे क्षमता, सृजनशीलता, व्यवस्थापन कौशल्य इत्यादी गुण विकासीत होतात,जर आपल्यात डाव्या बाजूचा प्रभाव वाढल्यास स्वभावात कटुता येतो, दुसऱ्याच्या दुखःत स्वत: सुख अनुभवाणे, दुसऱ्यावर टीका टिप्पणी करणे,  दुसऱ्यावर प्रभुत्व चालविण्याचा स्वभाव बनतो, याला Superior Complexity म्हणतात.

३) सुषुम्न नाडी- मधली नाडी ह्या नाडीच्या उद्दिप्न्नाने नाडी सशक्त आणि विकसित होऊन आपला स्वभाव शांत होतो. याचीच आत्ताच्या वैध्यकीय (Modern Science) परिभाषेत विस्ताराने माहिती घेवू. बसवण्णांनी विश्वाभूत स्वरुपाचा इष्टलिंग सर्व बसवादी शरणांना आणि इतर सर्व बहुजनांना देवून त्यांना क्रांतीलढ्यात सामावून घेतला, बसवादी म्हणजे अनादी बसवण्णां त्यानंतर सगळे शरण. इष्टलिंग हे अर्ध अंडाकृती जसे पृथ्वीचे आकार आहे त्याप्रमाणे त्याचा आकार आहे. इष्टलिंग वरून काळ्या रंगाचे असते आणि आत चंद्रशीला. काळा लेप हा अनेक औषधी वनस्पती, बिब्याचे तेल, भस्म, तुपाची काजळी इ. पासून बनविले असते या सर्व लेपास ‘कंती’ म्हणतात. हा काळ्या लेपात सर्व घटकांचा कार्बन (Carbon) आहे. जेंव्हा इष्टलिंग डाव्या हाताच्या करस्थालात ठेवून त्यावर पादोदक टाकून नंतर विभूती लाऊन इष्टलिंगाकडे एकटक अर्ध मिटलेल्या डोळ्यांनी पाहतो त्याला त्राटक म्हणतात, डाव्या करस्थळातील इष्टलिंग शरीराच्या  तापमानाने गरम होतो, वरील कंती गरम होऊन आतील चंद्राशीला गरम होतो आणि त्यातून तरंग (Positive Energy) बाहेर टाकले जातात जे आपल्या डोळ्यातून मेंदूत प्रवेश करतात, वरील कंतीचा रंग काळा असल्याने उष्णता शोषून घेण्यास खूप मोठी मदत होते कारण भौतिक शास्त्राचा (Physics) एक सिद्धांत आहे काळा रंग पांढऱ्या रंगापेक्षा ज्यास्त उष्णता शोषून घेतो, ‘Black Surface Absorbs More Heat Than White’. ह्या सिद्धांताचा वापर करूनच सर्व सौर उर्जेचे उपकरणे बनविले आहेत. आपल्या शरीरातील उष्णता शोषून ती उष्णता आतल्या चंद्रशिलेला गरम करतो. इष्टलिंग योग त्राटक करीत असताना आपले श्वसन स्थिर होतो आणि इडा-पिंगळ-सुषुम्न नाडी उद्दीपित होऊन त्याचा मेंदूतील लहरीवर चांगला परिणाम होऊन मेंदूत मध्यभागी असणाऱ्या डाययेनसेफालोल (Diaencephlol) मध्ये असणाऱ्या पिनाईल (Pineal) ग्रंथीतून वाहणाऱ्या मेलोटोनिन (Melotonin) नावाचा स्त्राव (Hormone) ज्यास्त प्रमाणात निर्माण होतो तो रक्तातून स्त्रवत सर्व शरीराच्या पेशींना मिळतो ज्याने त्या पेशींचे कार्य सुधारतो. मेलोटोनिन (Melotonin) चे कार्य समजून घेणे गरजेचे आहे, मेलोटोनिन (Melotonin) स्त्राव (Hormone) हा आपल्या शरीरातील खूप म्हत्वाचे हार्मोन आहे, त्याचे मुख्य कार्ये आहेत जसे,

१) मन शांत ठेवणे.

२) रोगप्रतिकार क्षमता वाढविणे.

३) प्रजनन क्षमता वाढविणे.

४) स्मरणशक्ती वाढविणे.

५) नवीन पेशी निर्मितीत मदत करणे.

६) स्त्रियांत सर्व हार्मोन चा स्त्राव योग्य प्रमाणात ठेवणे.

७) मुला मधील ग्रोथ (Growth Hormone) हर्मोनचा प्रमाण योग्य ठेवणे.

८) नैसर्गिक अंटीऑक्शीडंट (Antioxidant)

मानवी शरीर खूप किचकट क्रियेने चालणारा एक यंत्र आहे, आणि यावर नियंत्रण ठेवण्याच काम मेंदू करतो, मानवाच्या तहयात अनेक पेशी मरत असतात आणि नवीन पेशी तयार होत असतात त्याच्या ह्या पेशी निर्मितीच्या वेगावर माणसाचे आयुष ठरलेले असते. अपवाद शरीरातील स्पायनल कॉर्ड(Spinal Cord) पेशी मात्र परत-परत तयार होत नाहीत. मेंदुचे अजून एक वैशिष्टयपूर्ण नवल असे  की; उजव्या बाजूचा मेंदू डाव्या बाजूचे शरीर नियंत्रित करीत असतो आणि डाव्या बाजुचा  मेंदू उजवी बाजू नियंत्रित करतो. उजव्या मेंदूत शांती, कलागुण, सृजनशीलता, कौशल्य गुण, व चांगली भावना, करुणा, स्तैर्य इ. गुण असतात. डावा मेंदू भाषा, गणित, भेदभाव, व स्वार्थ भावना , Negative Thoughts, विचार निर्माण करतो. इष्टलिंग योगाने सर्व वाईट विचारांचा नाश होतो कारण उजव्या बाजूचे पिंगळ नाडी डाव्या मेंदूवर नियंत्रण करतो, आणि डाव्या बाजू चे मेंदू उजव्या मेंदूतील दोष्यांवर नियंत्रण करतो. तिसरी नाडी सुषुम्न नाडी दोन्हीवर नियंत्रण करतो.

इष्टलिंग पूजा डाव्या हाताच्या करस्थालात ठेवून करावयाचे अजून एक शास्त्रीय कारण आहे, शरीरातील महत्वाचे अवयव (Vital Organs) जसे की हृदय, स्वादुपिंड, प्लीहा (Spleen) इ.अवयव डावीकडे असतात, स्वादुपिंड निकामी झाला अथवा त्याचे कार्य मंदावले तर इन्सुलिन योग्य प्रमाणत तयार होत नाही त्याने रक्तातील साखर वाढतो त्याला मधुमेह म्हणतात. हृदय हा एक अखंडपणे चालणारा पंप आहे, सतत सर्व शरीरातील पेशींना ऑक्सिजन युक्त रक्त पुरवण्याचे काम करीत असतो, हृदयातील डाव्या (Left Ventricle) कप्प्यातील रक्तच ऑक्सिजनयुक्त असतो तिथूनच ऑक्सिजनयुक्त रक्त उरवठा होत असतो, हृदयाचा एक लययुक्त आंकुंचन आणि प्रसरण होत असतो, त्याला डायस्टोल आणि सिसस्टोल म्हणतात तेच रक्तदाब नियंत्रित करत असतात, रक्तदाब वाढल कि उच्च रक्त दाब आणि कमी झाले कि कमी दाब दोन्हीही शरीरास घातकच आहेत म्हणून दोन्हीहि नियंत्रणात राहणे गरजेचे आहे, अनेक उच्चरक्तदाब रुग्णांना हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ठ औषधे घ्यावी लागतात. काहींचे हृदय गतीचे ठोके ज्यास्त असतात. जर प्रेमभराने इष्टलिंग पूजा केल्यास तिन्ही नाड्या नियंत्रित होऊन मेंदूतील मेलाटोनीनचा स्त्राव वाढून हृदयाची गती नियंत्रित राहण्यास मदत होतो. मन स्थिर झाला कि संपूर्ण शरीराचे कार्य योग्य रीतीने चालतो. इष्टलिंग त्राटक योगाने टेन्सन हेडे्ग (Tension Headache) तर क्षणात बारा होतो, रोग मुक्त जीवन, दीर्घायुषी जीवन, जर जगायचे असेल तर प्रत्येकाने बसवण्णांच्या विज्ञानवादी इष्टलिंगाची त्राटक योग केला पाहिजे.

लेखक: डॉ. महादेव मल्लिकार्जून जोकारे, कंदलगाव, सोलापूर लिंगायत सेवा संघ

फोन-९७६७५९७०४३

 छायाचित्र: starofmysore.com च्या सौजन्याने

अस्वीकरण: वरील लेखातील मताशी लिंगायत युवा.कॉम सहमत असेल असे नाही. लेखांतील मते व संशोधन निर्देशित लेखकांचे आहे. सर कायदेशीर जबाबदारी निर्देशित लेखकांवर आहे.

Print Friendly, PDF & Email

डॉ. महादेव जोकारे

डॉ. महादेव जोकारे हे व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. जोकारे सर लिंगायत धर्माचे अभ्यासक व तज्ञ असून महात्मा बसवेश्वरांच्या दर्शनावर ते सतत लिखाण करत असतात.

Read previous post:
‘बसव ब्रिगेड’ चे संस्थापक श. अविनाश भोसीकर यांचा वाढदिवस

नांदेड : आंतरराष्ट्रीय लिंगायत नेते, 'बसव ब्रिगेड' चे संस्थापक, आणि लिंगायत धर्माच्या घटनात्मक मान्यतेसाठी अव्याहतपणे झटणारे  श. अविनाश भोसीकर यांचा

Close