धूप घालणारी शरणी गोगव्वे

0 min read
अभिषेक देशमाने
Follow me

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.
अभिषेक देशमाने
Follow me
गुरू बसवण्णांनी चालवलेली लिंगायत चळवळ समता, समता, बंधुता, कायक दासोह या पंचसूत्रीवर आधारित भक्तीचळवळ होती.
शरणांची चरित्राला जरी चमत्काराची झालर पुराणकारांनी लावली असली तरी ते चरित्र हे आपल्याला कायकनिरत करण्याचाच प्रयत्न करते.  कल्याणच्या अनुभव मंटपातील शरणींचे योगदान अनमोल आहे. तो असा काळ होता की त्या काळात स्त्रियांना धर्माच्या, प्रथांच्या नावाखाली  बंधनात अडकवून ठेवले होते. त्याच काळात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश या राज्यांच्या सीमावर्ती भागात बसवादि शरणांनी चालवलेली लिंगायत नावाची परिवर्तनवादी, सामाजिक मूल्य पेरणारी, भक्ती चळवळ ही  स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन केलेली विचाराची सामाजिक क्रांती आहे. शरणांच्याबरोबरीने शरणीनी शिक्षण घेतले, त्या सक्षमपणे आपला विचार मांडू लागल्या, त्याच शिवशरणी झाल्या.  त्यातील काही शरणी प्रमुख वचनकार होत्या त्याची नावे अशी-  अक्कमहादेवी,  अक्कनागलंबिका, गंगाबिका, निलंबिका,  मुक्तायक्का, सत्यक्का,  कदरे रेमव्वा,  बोतांदेवी,  लिंगम्मा, लक्कम्मा, काळव्वे, अमुगी रायम्मा,  माळव्वे,  मोळीगे महादेवी, मसणय्या, दुग्गळे,  कोटन्नद सोमव्वा, कालकण्णिय कामण्णा, रेमव्वे, सुळे संकव्वे, सुळे बोंम्मलदेवी, सुळे पदमलदेवी, सुळे चामलदेवी, उग्गडिसुव वीरादेवी, नर्तनद महादेवी, सेवकर गौरव्वे, निरंजनद धवळाई, हुग्विय दुग्गळव्वा, सायिदेवी, बिज्जळदेवी, कायम्मा, सोमव्वे, कमलाई, गुड्डव्वे, गंगाम्मा, कल्याणीम्मा, नेमद वीरसंगव्वे, दांडिगेय गुरुदेवी, लक्षम्मा, रेचव्वे, गोगव्वे, वीरम्मा, रेकम्मा, सुग्गलदेवी, सुवर्णदेवी, कदरेतिम्मव्वा,  बडगी चामलदेवी, अण्णितीदेवी, शिवमायीदेवी,  वैश्य मायादेवी, निजद निंबव्वे, लिंगत केतव्वे या एकूण पंचावन्न शरणी वचनकारांची वचने आहेत.

केरळमधील अवळूरच्या शिवभक्त दाम्पत्यांच्या पोटी गोगव्वेंचा जन्म झाला.आपल्या आईवडिलांप्रमाणे गोगव्वे पण शिवभक्त होती. गोगव्वे तारुण्यात आली, तिचं लग्नाचं वयही झाले.  वरसंशोधनाला सुरवात झाली परंतु तिला लग्न करायचं नव्हते. तिच्या आईवडीलांना मात्र हे मान्य नव्हते. गोगव्वे कोणालाही न सांगता गोगेश्वराच्या मंदिरात लपून बसली.  आई वडील घाबरले, त्यांनी तीन दिवस तिचा शोध घेतला. शेवटी दोघेही गोगेश्वरांना शरण गेले, आपली मुलगी सापडावी  म्हणून गोगेश्वराला गाऱ्हाणे घातले.  ते गाऱ्हाणे गोगव्वेनी ऐकले, ती घरी गेली. आईवडिलांना आनंद झाला, त्यांनी गोगेश्वराचे आभार मानले.  गोगव्वेला मनाप्रमाणे राहण्याची मुभा दिली. गोगव्वे आता रोज गोगेश्वराची सेवा करू लागली. ती रोज मंदिरात धूप , कापूर लावण्याचे काम भक्तीने करत असे.

एकदा शिवाला गोगव्वेची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. शिवाने सुंदर पुरुषाचे रूप घेऊन  गोगव्वेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केले. गोगव्वेने शिवाचा धावा केला , तेव्हा सुदंर पुरुषाचे रूप टाकून मूळ रूप दाखवले. वरदान मागण्यास सांगितले. नित्य तुमचा सहवास लाभावा , असे गोगव्वेंनी  वरदान मागितले. तिने पुन्हा मंदिरात धूप घालायला सुरवात केली, त्यातच ती समाधान मानायला लागली.  गोगव्वेचे धूप घालण्याचे काम नित्याचे झाले होते.

एकदा  केरळचा राजा गोगेश्वराच्या मंदिरात आला. तो बाहेर जाण्याच्या तयारीत होता. गोगव्वेने त्याला  प्रश्न विचारला, कोठे निघालात? यावर राजाने कैलास दर्शन घ्यायला म्हणून सांगितले. गोगव्वेनी कैलास येथेच आहेत असे सांगून भक्तीने धूप घातला, धुपात कैलासाचे दर्शन घडविले.

गोगव्वे शिवाची भक्त होती. ती एक शरणी आणि वचनकार होती.  सामाजिक दृष्टीकोनातून गोगव्वेनी ज्ञानासी लालसा व्यक्त केली आहे. स्त्री पुरुषातील भेद नाहीसा करणे,हाच सुखाचा मार्ग आहे.

वचन:
उंच चढण्या कठडा असल्याविना शक्य न होई.
चिद्रुप परशिवास  जाणण्या पूजा, अर्चा, नित्यनेम
असल्याविना शक्य न होई.
हे सत्यपणे करून, असत्य विसरल्यास,
हेच सत्य पहा, नास्तिनाथा.
अग्नीने गिळलेल्या वस्तूस
आकार प्रकार असे का ?
महासागराने गिळलेल्या अंगास पुनः
पुण्यप्राप्ती म्हणणे
निखालस खोटे, नास्तिनाथा.

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.
Print Friendly, PDF & Email

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.

Read previous post:
तोंगिन महादेवी: लवून नमस्कार करणारी शरणी महादेवी

नासवू नका, नासवू नका जीवन, धरा हो धरा, अजि शिवाचे चरण. नश्वर पहा हो तुमचे शरीर, संसारसुख नसे पहा हो

Close