पुण्यस्त्री केतलदेवी

1 min read

शरणी केतलदेवी ही शरण गुंडय्या यांची पत्नी असून मूळ बीदर जिलयतिल भालकी येथील. म.बसवण्णा च्या कार्याची महती एकूण ते कल्याण मधे आले आणि उभ आयुष्य लिंगायतधर्म तत्व यासाठी खर्ची घातले. लिंगायता चा आत्मा म्हणजे कायक वे कैलास. कायक न करता एखादा वेक्ति जीवन जगतोय असे कधी झाले नाही म्हणून त्या काळातील सर्वात प्रगत राज्य म्हणून व विकास पुरूष म्हणून म.बसवण्णा ची कीर्ती सर्व दूर पसरली. पुण्यस्त्री केतलदेवी ने आपल्या वचनात शुद्धा कायक व आपन करत असलेल्या उदयोगाची भाषा वापरली या वरुण शुद्धा शरणी या कायकाला किती महत्व देत होत्या याचा अन्दाज नक्कीच येतो. ज्या काळात चूल आणि मूल ही संस्कर्ति होती त्याचा बिमोड करून स्त्री शुद्धा स्वंतत्र व्यवसाय करू शकते म्हणून स्त्रिला व्यवसाय करण्याची संधी व स्वंतंत्रदेणाऱ्या लिंगायतत्तवाला माझे वंदन. केतलदेवी नुसती कायकात रममाण झाली नाही तंर त्या सोबत या माउली ने वचन निर्मिति ही केलेली आहे. अनुभव मंटप मधील एक सक्रिय शरणी होती.

केतलदेवी ने लिंगायताला एक फार मोठा संदेश दिला आहे तो प्रत्येक लिंगायत स्त्री ने आपल्या मुलांवर रुजवला पाहिजे. तो म्हणजे संगत कोणाची असावी. माता केतलदेवी असे म्हणते की, प्रत्येक वेक्ति ने संगत खूपच जपून करावी,कारण संगति मधे खुप सामर्थ्य असते. जर संगत चांगली असेल तंर त्यास सत्याचा साक्षत्कार होतो.आणि जर संगत वाइट असेल तर त्याचा सत्यानाश होतो म्हणून आपली संगत चांगली ठेवावी असा सल्ला केतलदेवी आम्हास देते.माझ्या बाधवानो एखादी काल्पनिक देवी आपणास काय संदेश देईल मला माहिती नाही पण या जाग्रत वास्तवातील देवी ने मात्र आपणास किती मोठा वचन रूपी ठेवा दिला आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आपण जीवन जगले तंर नक्कीच आपले जीवन नंदनवन झाल्या शिवाय राहनार नाही.
वचन पहा…
मडके कसे बनवावे, अनुकूल नसता माती.
कधी ही ना करावी व्रतहिनाची संगती.
संगत ऐसा जनाची करता नरक (दुःख) अटळ.

जानुनी कुंभेश्वरा मी नच जाई त्या जवळ.

12 व्या शतकात एक महिला स्वंतत्र व्यवसाय करून, आपल्या लिखानाच्या माध्यमातून समाज चांगला घडला पाहिजे असा नीतिबोध देते. आशा या थोर वैचारिक व आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेल्या पुण्यस्त्री केतलदेवी च्या चरणी शतशः नमन !

© प्रा. आनंद  कर्णे , २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.
Print Friendly, PDF & Email
प्रा. आनंद कर्णे

प्रा. आनंद कर्णे

प्रा आनंद कर्णे, बसवचरित्र आणि वचन साहित्याचे गाढे अभ्यासक, शिव बसव आंबेडकर या महापुरुषांवर 1000 च्या आसपास व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रात दिले आहेत.शेतकरी कुटूंबातील जन्म, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत एम. ए. (राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र) एम.एस. हे शिक्षण पूर्ण केले. बसव ब्रिगेडचे प्रवक्ते. लिंगायत धर्म अल्पसंख्याक धर्ममान्यता लढ्यात सक्रिय सहभाग. विद्यार्थीचे आवडते शिक्षण म्हणून लौकिक. २०१७ साली आरवडे तासगाव येथे त्यांना बसव पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रा. आनंद कर्णे
Read previous post:
क्रांतिवीरांगना वैराग्ययोगिनी अक्कमहादेवी

कर्नाटक राज्यातील शिमोगा  जिल्ह्यातील शिराळकोप्प तालुक्यातील उडुतडी म्हणजे अक्कमहादेवीचे जन्मगाव.  शेठ निर्मलशेट्टी आणि सुमतीदेवी  या सदाचारसंपन्न शिवभक्त दाम्पत्यांच्या पोटी अक्कमहादेवीचा

Close