प्रत्यक्ष शिवालाच आपला पुत्र मानणारी बिज्जमहादेवी

1 min read

बोलावे तसे चालावे हा शरणांचा नियम होता. परधन, परस्त्री, परान्न याची अभिलाषा करू नये.  स्वतः श्रम करून  शिवकृपेने मिळालेला प्रसाद सत्य, शुद्ध, विकाररहित जगावे. कार्य , कायक, अन्नदासोह हीच जीवनसूत्रे मानून शरण जगत होते.

कल्याण राज्यात राहणारी बिज्जमहादेवी ही एक शरणी होती. बिज्जमहादेवी अनाथ होती.  एकदा बिज्जमहादेवीच्या घरी एक जंगम आला. त्या जंगमांचे तिने स्वागत, आदरातिथ्य केले.  जंगमाला शिवाविषयी प्रश्न विचारायला लागली.  जंगमाने शिवाचे वर्णन केले. तो स्वयंभू आहे, त्याला आईवडील नाहीत. बिज्जमहादेवीनी विचार केला की शिवाला आई-वडील नाहीत, तो ही अनाथ आहे. मी ही अनाथ आहे.

रात्रीच्या वेळी बिज्जमहादेवीला एक स्वप्न पडले.  स्वप्नात एका डोंगराजवळ एक पाळणा दिसला त्या पाळण्यात एक गोजिरवाणे बाळ खेळताना दिसले. बिज्जमहादेवी  घराबाहेर गेली तर तिला घराबाहेर पाळण्यात एक बाळ खेळताना दिसले.  त्या बाळाला तिने आपला मुलगा समजून वाढवले, सांभाळ केला. बाळ तिच्याजवळ आनंदात राहत होते, तिचेही त्याच्यावर खूप प्रेम होते.  एके दिवशी   बाळाने अन्न पाणी सोडले, बिज्जमहादेवीला बाळाची काळजी वाटायला लागली.  ती सक्तीने बाळाला अन्न खाऊ घालत असे, पण बाळ काही केल्या खात नसे. बाळ अशक्त झाला. बिज्जमहादेवीने विचार केला , आपला बाळ मरण्यापूर्वी आपण प्राण त्याग करू.  बिज्जमहादेवीने आपल्या प्राणाचा त्याग केला.

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.
Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
पुण्यस्त्री केतलदेवी

शरणी केतलदेवी ही शरण गुंडय्या यांची पत्नी असून मूळ बीदर जिलयतिल भालकी येथील. म.बसवण्णा च्या कार्याची महती एकूण ते कल्याण

Close