अक्का नागम्मा

1 min read

आई मादलांबिका व वडील मादरस यांच्या पोटी जन्मास आलेली कर्त्तत्ववान मुलगी म्हणजे नागलंबिका. पुढे शिवदेव यांच्या सोबत विवाह झाला.त्यांच्या मुलाचे नाव चन्नबसवण्णा. ज्या चन्नबसवण्णानी वयाच्या 10 वर्षी 500 वचन लिहले.हा आहे लिंगायता चा गौरवशाली इतिहास. जगातील सर्वात कमी वय असलेले साहित्यिक म्हणून चन्नबसवण्णा हे सर्वश्रेठच होत. असा थोर पुत्र घडवनारी अक्का नागम्मा ही म.बसवण्णा ची मोठी बहिन.बसवण्णा ला शुद्धा घडविन्या साठी अक्का चा मोठा वाटा आहे. कल्याण क्रांति नंतर संपूर्ण शरण आंदोलनाचे नेतृत्व अक्का नि केले. वचन साहित्य वाचविन्या साठी हाती तलवार घेणारी जगातील पहिली स्त्री म्हणून अक्का इतिहासात अजरामर झाली.जगात क्रांति अनेक झाल्या पण साहित्यासाठी एकमेव क्रांति झाली ती म्हणजे कल्याण क्रांति. आणि त्या क्रांति चे संपूर्ण नेतृत्व अक्का नि करून महिला ही अबला नसून सबला आहे हे दाखऊन दिले.ज्या काळात स्त्री म्हणजे पापी समजल्या जात होते त्या काळात महिला हाथी तलवार घेऊ शकते. ही केवढी मोठी क्रांति आहे. आचाट साहस,अफाट बुद्धिमत्ता, शौर्य आशा गुनानी परिपूर्ण असलेली खरी लिंगायता ची देवी म्हणजे अक्का नागम्मा.

लिंगायत समाजाला स्वाभिमानाने जगायची शिकवण देणारी अक्का नागम्मा आपल्या अनेक वचनातून नैतिक शिकवण ही देते.आपले आचरण कसे असावे याचा बोध ही करून देते.एवढे नाही तर लिंगायता नि सत्याच्या मार्गानी जात असताना अनेक संकटे आली तरी आपला मार्ग सोडू नये.मुखी बसव नाम असु द्यावे.निश्चित आपली ध्येय पुर्ती होईल असा विश्वास पुढील वचनातून अक्का देते.

रे मना, व्यस्थित न व्हावे,

रे तना ,व्याकुळ न व्हावे,

रे मना, सत्यासी ना विस्मरावे,

निश्चित होऊनि रहावे.

अपराध प्रवतापरि जरी,

व्यर्थ चिन्तिसी कासया?

बसवण्णप्रिय चेन्नसनगय्या 

एका करनगुळी ने नेई लया.

आशा अनेक वचनातून अक्का नी आह्मला निति बोध केला आहे.लिंगायत स्त्री ने आशा शुर, पराक्रमी अक्का चा आदर्श समोर ठेऊन,आपल्या मुलांवर शुद्धा जर संस्कार केले तंर मुले निश्चित त्यांचे ध्येय पूर्ण करू शकतात याची आम्हास खात्री वाटते.स्त्री ही नुसती देव घरातील देवता नसून प्रत्यक्ष जीवनात तिला सर्व अधिकार आणि देवी सम जगणे शक्य होते.आणि हे लिंगायत स्त्री ने जगाला दाखउन दिले आहे.आशा अक्का नागम्मा च्या चरणी शतशः वंदन !

Print Friendly, PDF & Email
प्रा. आनंद कर्णे

प्रा. आनंद कर्णे

प्रा आनंद कर्णे, बसवचरित्र आणि वचन साहित्याचे गाढे अभ्यासक, शिव बसव आंबेडकर या महापुरुषांवर 1000 च्या आसपास व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रात दिले आहेत.शेतकरी कुटूंबातील जन्म, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत एम. ए. (राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र) एम.एस. हे शिक्षण पूर्ण केले. बसव ब्रिगेडचे प्रवक्ते. लिंगायत धर्म अल्पसंख्याक धर्ममान्यता लढ्यात सक्रिय सहभाग. विद्यार्थीचे आवडते शिक्षण म्हणून लौकिक. २०१७ साली आरवडे तासगाव येथे त्यांना बसव पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रा. आनंद कर्णे
Read previous post:
क्रांतिकारी लिंगायत नारिशक्तीच्या प्रेरणादायी इतिहासाचा जागर आणि नवरात्रौत्सव

म. बसवण्णांच्या नेतृत्वाखालील शरण - शरणींच्या समग्र क्रांतीने बाराव्या शतकात स्त्री - पुरुष समानता व नारी सन्मानासाठी जाति-कुल-वर्ण-वर्ग-वंश-लिंगभेदरहित वैश्विक मानवतावादाची

Close