आकुर्डी येथे गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध

1 min read
पुणे : आकुर्डी येथील मल्लिकार्जुन मंदीर येथे ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी विचारसरणीच्या गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ, महाराष्ट्र बसव परिषद आणि पुणे व पिंपरी चिंचवड येथील समविचारी संघटनाच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड येथील उद्योजक रमेश कोरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यध्यक्ष,  कायदेतज्ञ मनीषा महाजन आणि ज्येष्ठ विचारवंत  डॉ.  शशिकांत पट्टण यांनी आपले विचार मांडले.
याशिवाय पिंपरी चिंचवड येथील आम आदमी पक्षाचे संयोजक चेतन बेंदे,  इंजिनियर अनंत शिंदाळकर, अभिषेक देशमाने, प्राधीकरण येथील बौद्ध विहारचे अध्यक्ष श्री. सोनावणे प्रताप आणी ईतरानीही या घटनेचा निषेध करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या त्याचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे:
रमेश कोरे सर यांची प्रतिक्रिया : आज समाजामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी आणी त्यातून होत असलेल्या विविध घटनेचा विरोध केला. धर्मांध शक्ती वाढत असून त्या समाजासाठी, मानवतेसाठी कशा घातक आहेत याबद्दल विवेचन केले. विचारधारेशी असलेली मतभेदाला हत्या हा पर्याय नाही यातून तूम्ही आपली हार कबूल केली हेच सिध्द होत आहे. शिवाय अशा घटनेच्या माध्यमातून समाजात तेढ , भिती निर्माण करण्याचे काम पद्धतशीर रित्या काही लोकांकडून केले जात आहे तरी अशा लोकांच्या विरोधात सर्वनी एकत्र येऊन त्यांचे मनसुबे उधळून लावले पाहिजे, शिवाय महात्मा बसवेश्वरां च्या मानवतावादी मूल्यांचा अभ्यास प्रत्येकानी करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
कायदेतज्ञ मनीषा महाजन : यांनी सर्वप्रथम गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला आणि सर्वानी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा असे आवाहन केले. गौरी लंकेश ह्या निर्भीड पत्रकार होत्या. समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध धर्मांध शक्तीशी, सरकारशी त्या लढत होत्या. आपले विचार त्यांनी गौरी लंकेश पत्रिके नावाच्या साप्ताहिकातून मांडत असत आणि समाजाला जागे करण्याचे काम त्या करत होत्या पण यामुळे प्रस्थापित धर्मांध लोकांचे धाबे दणाणून सोडले होते याचाच सूड म्हणून त्यांनी गौरी लंकेश यांचा खून केला.
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी यानंतर गौरी लंकेश अशी एकामागून एक विचारवंतांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि अजूनही त्यांचे मारेकरी पकडले नाहीत म्हणजेच अजून ते समाजात अशा लोकांना मारण्यासाठी मोकाट आहेत आणि सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने काम करत आहे यावर त्यांनी विचार व्यक्त केले. समाजातील काही लोकांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन केले यावरून लोकांची संपुष्टात येत असलेली संवेदनशीलता दिसून येते असे मत त्यांनी मांडले.
प्रा पट्टण सर : हे स्वतः गौरी लंकेश यांच्यासोबत काम करत होते. डॉ पट्टण हे महात्मा बसवेश्वर यांचे गाढे अभ्यासक आणि पुरोगामी विचारसरणीचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या मानवतावादी, वैश्विक कार्याचा उल्लेख केला आणि ते कसे प्रस्थापित विरोधात जाऊन  उदारमतवादी, भेदभाव रहित लिंगायत धर्म निर्माण केला हे सांगितले. आज जगात इंग्लंड मध्ये, अमेरिकेत आणि ईतर देशातही महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा, कार्याचा गौरव केला जातो. ज्यावेळी गौरी लंकेश यांना महात्मा बसवेश्वर अभ्यास केला तेव्हा ते सुद्धा स्वतःला आपण आशा महान विचारधारेचे अनुयायी आहोत असे अभिमानाने म्हटले. शिवाय पट्टण सरांनी सर्व राजकीय पक्ष कसे एकाच माळेचे मणी असतात हे लक्षात आणून दिले. समाजात वाढत असलेली अराजकता, विचारवंतांना जिवंत पणीच मारण्याची प्रक्रिया काही धर्माध लोकांकडून केली जात आहे त्याचा त्यांनी प्रखर विरोध केला. लोकांनी उदासीनता सोडून आशा बाबीचा जाहीर निषेध करावा असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय बसवराज कणजे तर आभार प्रदर्शन अभिषेक देशमाने यांनी केले.
Print Friendly, PDF & Email
Read previous post:
On Killing of Gauri Lankesh

Gauri Lankesh was killed at her residence on 5 September 2017 in the evening. Dr. Narendra Dabholkar, Comrade Govind Pansare,

Close