गौरी लंकेश यांच्या हत्येचा कडेगावमध्ये निषेध

1 min read

कडेगाव: बसव ब्रिगेडच्या कडेगाव तालुका व शहर शाखेतर्फे गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली व तहसीलदार अर्चना शेटे यांना सह्यांचे निवेदन देण्यात आले. बसव ब्रिगेड च्या शहर कार्यालयात गौरी लंकेश यांच्या हत्येसंबंधी सविस्तर भाषणे करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष श. संदीप माळी यांनी लिंगायत धर्मातील विचारवंतांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली.

तालुका शाखेचे सचिव श. प्रशांत विभूते यांनी प्रास्ताविक केले.

शहर शाखेचे अध्यक्ष श. हर्षल वाघिरे यांनी गौरी लंकेश यांचे पत्रकारीतेमधील तसेच लिंगायत धर्माच्या अभ्यासामध्ये असलेले योगदान स्पष्ट करत श्रद्धांजली वाहिली.

शहर शाखेचे सचिव श. अधिक तडसरे यांनी गौरी लंकेश यांच्या कामाची प्रेरणा मोठी असून त्यापासून सर्व लिंगायतांनी आदर्श घ्यावा, असे सांगितले.

यानंतर, गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करणारे कडेगाव शहर व तालुक्यातील लिंगायत धर्मियांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार सौ. अर्चना शेटे यांना देण्यात आले.

याप्रसंगी श. किरण महादेव माळी, श. कार्तिक नानासो माळी, श. योगेश नामदेव माळी, श. अनिल शिवाजी माळी, श. अक्षय आनंदा माळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जितेंद्रसिंह रजपूत, तसेच बसव ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
आकुर्डी येथे गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध

पुणे : आकुर्डी येथील मल्लिकार्जुन मंदीर येथे ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी विचारसरणीच्या गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ, महाराष्ट्र बसव

Close