आम्ही बसवन्नांचे शरण…!!!

1 min read
शरणांचा शरण होईन, शरणांचा दास होईन असे विश्वगुरु बसवण्णांनी वचनातून सांगितले. मग आज लिंगायत धर्ममान्यता आंदोलनात सक्रिय लिंगायतानी भक्त किंवा शिष्य होणे किती योग्य आहे, हे त्यांनीच ठरवावे.  नक्की आपण कोण आहोत,  हे व्यक्तिगत पातळीवर विचार करून ठरवावे. भक्तीला विरोध नाही पण भक्ती व्यक्तीची नसावी, ईश्वराची असावी. व्यक्तीला देवत्व देऊन व्यक्तीचे कार्य मातीत मिळविणेसारखे आहे. भक्त होऊन अंधभक्ती करण्यापेक्षा, शिष्य होऊन गुरूंची भक्ती करण्यापेक्षा शरण होणे महत्वाचे ठरेल.
बसवण्णांनी कधीही शिष्य किंवा भक्त निर्माण केले नाहीत तर शरण निर्माण केले. शरणांनी बसवण्णांना लिंगायत धर्म चळवळीत आयुष्यभर साथ दिली, पुढे तो स्वतंत्र आणि अवैदिक धर्म झाला. म्हणून आज लिंगायतानी अंधभक्त किंवा शिष्य होण्यापेक्षा  शरण झाले पाहिजे.  बसवण्णांनी शरण आणि शरण चळवळ निर्माण म्हणून आम्ही शरण आहोत.

ना आम्ही भक्त , ना आम्ही शिष्य , ना आम्ही अनुयायी , आम्ही फक्त शरण आहोत.

शरणांची लक्षणे

शुद्ध शरण तुमचे नित्य स्मरण करतात.

व्यर्थ गोष्टी बोलतो मी .

माझी अर्धवट भक्ती तुमचे स्मरण करू देत नाही

मानणार नाहीत तुमचे शरण मला, कुडलसंगमदेवा.

(बसव वचन ३०३.)

न्याय निष्ठुर; दक्षिण्याच्या बाजूने मी नाही ;
लोकविरोधी शरण कोणाला भीत नाही.
कुडलसंगमदेवाच्या राजतेजात सुरक्षित असल्यामुळे.

(बसव वचन ७५०)

मारणाऱ्यांना माझे आप्त मानतो,
शिव्या देणाऱ्यांना माझे बांधव मानतो,
निंदा करणाऱ्यांना माझे माता-पिता मानतो,
जे मला पीडतात, त्यांना मी माझा मालक मानतो,
फटकारणाऱ्यांना माझा सख्खा बंधू मानतो,
स्तुती करणाऱ्यांना सोन्याच्या सुळावर चढविणारे मानतो, कुडलसंगमदेवा.

(बसव वचन १०८५)

शरण मनाप्रमाणे वागण्यास स्वतंत्र आहेत.
निवडक सदाचार साधना करतात.
असाध्य असंभव काही नाही पहा.
कुडलसंगमदेवाचे शरण संगी नाही, निसंगी नाही.

( बसव वचन १३६०)

इष्टलिंगाला अर्पितो, इष्टलिंगाला वंदन करतो !
इष्टलिंगाला अनुरूप आचरण नसेल तर,
कुडलसंगमदेवा तुमच्यासाक्षीने धिक्कार करतो.

(बसव वचन ७५४)

शरण हा शब्द असा तसा नव्हे.
नोण: म्हणणाऱ्यास सूत्राने शरण म्हणविलेला
शर म्हणजे बाण ण म्हणजे, तसला मन्मथ बाण नसणारा,
तोच शरण पहा, कपिलसिद्ध मल्लिकार्जुना.

(सिद्धरामेश्वर वचन १७१५ )

शरणाचे दर्शन भवाचा नाश पहा.
शरणांची दृष्टी शिवदृष्टी पहा.
शरणांचा देह शिवदेह पहा.
शरणाच्या पादुका आमच्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाच्या पादरक्षा पहा, मडिवाळ माचय्या.

(सिद्धरामेश्वर वचन १७२१)

आत्मस्तुती, परनिंदा न ऐकवा हो,
तुम्हास विनवी.
मी भक्त , मजठायी भले असे म्हणून
आनंदित झालो तर मी तुमचा द्रोही हो.
कुडलसंगमदेवा,
तुमच्या शरणांचे हितच माझे हित हो.
(बसव वचन)

शरण संगाचे  महत्व

 

मडके करण्याकरिता माती आदी.
अलंकार करण्या सोने आदी.
शिवपथ जाणण्या गुरुपथ आदी.
आमच्या कुडलसंगमदेवा जाणण्या शरण संग आदी.

(बसव वचन ६८.)

ज्ञानाच्या बलाने अज्ञानाचा नाश पहा हो.

ज्योतीच्या बलाने अंधःकाराचा नाश पहा हो.

सत्याच्या बलाने असत्याचा नाश पहा हो.

परीसाच्या बलाने लोहाचा नाश पहा हो.

कुडलसंगमदेवाच्या शरणांच्या अनुभवाने

माझा भवनाश पहा हो.

(बसव वचन ८३७.)

शीर मलिन झाल्यास  अभ्यंगस्नान करावे.

वस्त्र मलिन झाल्यास धोब्यास द्यावेत.

मनाचे मालिन्य घालविण्या कुडलचेन्नसंगय्याच्या शरणांचा  अनुभाव करावा.

(चेन्नबसवेश्वर वचन १४४२)

अज्ञानीचा संग केल्यास

दगड फेकून भांडण काढल्यापरी,

ज्ञानाचा संग केल्यास दही घुसळून लोणी काढल्यापरी,

चेन्नमल्लिकार्जुना तुमच्या शरणांचा संग केल्यास

सुगंधाचा गोड वासघेतल्यापरी.

(अक्कमहादेवी शि. व. सं. ५- ४३ )

 

 

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.

फोटो सौजन्य: http://www.deccanherald.com
Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
पुन्हा एकदाअभिव्यक्ती स्वंतत्र,लेखन स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र याचा कर्नाटक मध्ये खून

गौरी लंकेश या बुद्धिप्रमाण्यवादी पत्रकार होत्या,त्या साहित्यिक ही होत्या, लिखानाला सत्याची धार होती. पण कर्मकांडी विचारधारेला सत्य कधीच पचत नाही

Close