२२ ऑगस्टला बेळगावीत लिंगायत महामोर्चा

1 min read

बेळगाव: येत्या २२ ऑगस्ट ला बेळगावी येथे लिंगायत महामोर्चाचे आयोजन धडकणार असून लिंगायत आपली ताकद दाखवणार आहेत, अशी माहिती स्वतंत्र लिंगायत धर्म चळवळीचे उमरगा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते शरण महादेव पाटील दिली. लिंगायत धर्मियांच्या शक्ती प्रदर्शनाने सर्वच राजकीय पक्षामध्ये चलबिचल सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडेच लिंगायत समाजाने बिदर येथे भव्य मोर्चा काढलेला ज्यामध्ये किमान चार राज्यातील हजारो लिंगायत उत्स्फूर्तपणे सामील झाले होते. अजूनही केंद्र व राज्य सरकारे लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्याविषयी गंभीर नसल्याने आणखी लिंगायत महामोर्चे निघण्याची शक्यता आहे.

लिंगायत स्वंतत्र धर्म मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक  दर्जा, या दोन प्रमुख मागण्यासाठी लिंगायत समन्वय समितीने हे राष्ट्रीय जनआंदोलन सुरु केले आहे.Print Friendly, PDF & Email
Read previous post:
लिंगयात धर्म महामोर्चा आयोजन बैठक आज लातूरमध्ये 

  लातूर: स्वतंत्र लिंगयात धर्म मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या

Close