लिंगयात धर्म महामोर्चा आयोजन बैठक आज लातूरमध्ये 

1 min read

 

लातूर: स्वतंत्र लिंगयात धर्म मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य नेतृत्वाखाली लातूरला भव्य लिंगायत महामोर्चा निघणार असून या मोर्चाच्या नियोजनासाठी आज लातूर येथे बैठक होणार आहे.

या बैठकीसाठी लातूर जिल्ह्यातील डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, उद्योजक, व्यापारी, कर्मचारी, राजकीय, सामाजिक, विद्यार्थी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लिंगयात समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे.

रविवार दि. ६ रोजी होणारी बैठक महात्मा बसवेश्वर कॉलेज, लातूर येथे दुपारी १ वाजता संपन्न होणार आहे.Print Friendly, PDF & Email
Read previous post:
बसव ब्रिगेड सचिव अधिक तडसरे यांना डॉ. जितेश कदम यांनी दिल्या शुभेच्छा

कडेगाव: 'बसव ब्रिगेड'च्या कडेगाव शहर शाखेचे सचिव श. अधिक तडसरे यांचा आज वाढदिवसानिमित्त युवानेते डॉ. जितेश कदम यांनी सत्कार केला.

Close