‘बसव ब्रिगेड’च्या कडेगाव संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन

0 min read


कडेगाव : बसव ब्रिगेडच्या कडेगाव संपर्क कार्यालयाचे उदघाटन आज येथील प्रतिष्ठित नागरीक व समाजसेविका सौ. वडगावी यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘बसव ब्रिगेड’चे कडेगाव तालुका अध्यक्ष श. संदीप माळी होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला संपर्क प्रमुख श. दिपक कोकणे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

उदघाटन कार्यक्रमाची सुरवात बसव प्रतिमेच्या पूजनाने झाली. बसव ब्रिगेडचे कडेगाव शहर प्रमुख हर्षल वाघिरे यांनी ब्रिगेड च्या कामाविषयी व श्रावण महिन्यातील कार्यक्रमाविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी सागर माळी, उमेश माळी, तेजस माळी, सौ. कडले, सौ. गीता धस्के, श्रीमती भागीर्थी धस्के, श्रीमती वाघिरे, फोक्स या सामाजिक संस्थेच्या कार्यकारी प्रमुख सौ. अनामिका धस्के व सामाजिक अभ्यासक डॉ. गोविंद धस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

बसव ब्रिगेड च्या कडेगाव शहर शाखेचे सचिव श. अधिक तडसरे यांनी आभाराचे भाषण केले.




ADVT


 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
शुन्य संपादन ग्रंथ

विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांच्या नेतृत्वाखाली १२ व्या शतकात जी अदभूत क्रांती झाली त्या क्रांतीत भारताच्या सर्व दिशातील शिवशरणांनी जात-पात, लिंगभेद

Close