शुन्य संपादन ग्रंथ

1 min read
सुनील समाने
Follow me

सुनील समाने

सुनील समाने लिंगायत धर्माचे अभ्यासक असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.
सुनील समाने
Follow me

विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांच्या नेतृत्वाखाली १२ व्या शतकात जी अदभूत क्रांती झाली त्या क्रांतीत भारताच्या सर्व दिशातील शिवशरणांनी जात-पात, लिंगभेद झुंगारून, मोडीत काढून बसवकल्याणातील प्रथम आद्य लोकसंसद “अनुभव मंटप” मध्ये सामील होऊन. समाज परिवर्तन व प्रभोधन तसेच समता, समानता, विश्वबंधुता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या स्वानूभावातून कोटीच्या संख्येने वचने लिहली. शिवशिरणांनी लिहलेली ही वचन लोकांना सहज समता येणाऱ्या लोकभाषेत लिहिले.

शिवशरणांनी जी कोटीच्या घरात वचने लिहिली होती. ती वचने कल्याणाक्रांती च्या उत्पाताने बहुतांशी वचनसाहित्य विध्वंस झाले. शरणांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन काही वचनसाहित्य वाचवीण्याचे दुर्दम्य, महाकठीण कार्य केले.

महात्मा बसवण्णा च्या काळानंतर १२ व्या शतकाच्या अखेरीस कल्याणक्रांती मुळे शिवशरण चोहीकडे विखुरले गेले.

त्यानंतर जवळजवळ दोन शतकाने संगमवंशीय विजयनगर साम्राज्यातील “प्रोढदेवराय” [१४१९ ते १४४७] यांचे प्रधान “लक्कण दंडेश” व “जक्कणा चार्य” यांच्या काळात लिंगायत साहित्य संकलणाला सुरवात झाली.

याच काळात निर्माण झालेली साहित्यकृती म्हणजे “शुन्यसंपादन” पाच निरनिराळ्या ग्रंथकारांकडून निरनिराळ्या काळांत निरनिराळ्या रितीने याची रचना झाली.याचा अर्थ असा की १४१९ ते १५१९ या शतकीय अवधित पाच शुन्य संपादने साहित्यकृती निर्माण झाल्याचे दिसून येते. या महान साहित्यकृतीचे आद्य संकलनकार म्हणजे “शिवगण-प्रसादी महादेव”.

विशेषतः या शिवगण-प्रसादी महादेव यांच्या बद्दल काहीच माहिती मीळत नाही.काहीचे म्हणणे आहे की ते कल्याणक्रांतीनंतरही कल्याणातच राहून हा ग्रंथ लिहला पण याला विशेष आधार, पुरावा नाही.

शिवगण-प्रसाद हे एक प्रकारचे कायक आहे दासोहातून फलाची अपेक्षा न करता भक्तगणांना निरपेक्ष बुद्धीने अन्नसमर्पण करणे व त्यातच संतोष मानने हा शिवगण-प्रसाद कायक होय.

शुन्य संपादन या ग्रंथाच्या संकलनाच्या संदर्भात प्रस्तूत ग्रंथकर्ता फक्त नावाचा तेवढा उल्लेख केला आहे. “शून्य संपादनेच्या महानुभाव गोष्टी शिव-शरण-महागण बसवदेव, चन्नबसवण्णा, प्रभुदेव, आदि करुन प्रामुख्याने वचनानुसंगे कथानिरुपण करून शिवगण-प्रसादी महादेव याने शिवगणांचे शिवानुभव स्तोत्र व्दारमुखाने निर्मल दर्पण समर्पिले आहे”. अशा शब्दात ग्रंथाचा उपसंहार करतात.

स्वतःचे गाव,माता-पिता किंवा आपण रचलेली इतर साहित्यकृती याबद्दलचा कसलाही निर्देश ते करीत नाहीत. याच महान ग्रंथाचे ते आद्य निर्मितीकार आहेत.

या ग्रंथात ते आणखी एका वैशिष्ट्येपूर्ण गोष्ट चे निवेदन करतात की,”हे “शुन्य संपादन” शिवशरणांनी श्रवण करावे, लालन करावे, पालन करावे, तसेच लिहून पठन करावे. या निरुपणक्रमात उणीव भासल्यास तुमच्या परमज्ञानाने सुधारणा करून या वचनानुभवाची चर्चा करून सुख संपादन करावे (शुन्य संपादन – पान क्र. ३९१) .

याचा विशेष विचार व विनंती करूनच पुढील संकलनकारांनी आणखी काही वचनांची व प्रसंगाची भर घालून हा ग्रंथ विस्तृत करीत गेले असावे.अशा रितीने प्रथम संकलनकार शिवगण-प्रसादी महादेव यांनी ९५९ वचनाचा ग्रंथ विस्तृत होऊन १६०० वचनाचा झाल्याचे दिसून येते.

शिवगण-प्रसादी महादेव यांच्या नंतर

१] केंच वीरण्ण वडये [काळ – इ,स.-१४९५]

२] गुम्मळपूरचे सिद्धलिंग देवरु [काळ -इ.स.-१५००]

३] गुळूर- सिद्धवीरणार्य [काळ – इ.स.-१५१०]

४] हलिगेय देव [काळ – १५२०]

अशा प्रकारे पाच वेगवेगळे शुन्य संपादन ग्रंथकर्ते होऊन गेले.

“शुन्य संपादन” हा लिंगायत तत्त्वज्ञान, शरण संस्कृती तसेच बसवादी शरणगणाच्या दिव्यत्व स्वानूभवातून स्फुरलेलेला वचन संग्रह ग्रंथ आहे.

शून्य संपादन हा ग्रंथ मानवीमुल्याची व विश्व तत्त्वज्ञानाचा सार आहे.म्हणून “प्रसिद्ध तत्त्वज्ञानी प्रा. R. D. रानडे यांनी या ग्रंथाची तुलना प्लेटोच्या प्रवचनाशी केली आहे. जागतिक गूढ तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात या ग्रंथाला खास स्थान आहे, असे मत त्यांनी प्रकट केले आहे [Mysticism in Karnataka].

शिवगण-प्रसादी महादेव यांच्या “शून्य संपादन” ग्रंथात एकून ९५९ वचनांचा समावेश आहे. या चर्चेत १३ शिवशरण, व ३ शिवशरणी यांचा सहभाग आहे.

९५९ वचनांत अल्लमप्रभुची ३५० वचने आहेत. त्यानंतर महात्मा बसवण्णा, षटस्थल चक्रवर्ती चन्नबसवण्णा इ. वचने आहेत.

म्हणून या ग्रथाला “प्रभुदेवाचे शुन्य संपादन” असेही म्हणतात.

संदर्भ:

  • शून्य संपादन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई]

लेखक:सुनिल चन्नाप्पा समाने (सर)

मु.पो.जकेकूर ता.उमरगा जि.उस्मानाबाद
रेंजहिल्स सेकंडरी स्कूल, खडकी, पुणे
प्रणयराज प्लाजा सोसायटी, विश्रांतवाडी, गोकूळनगर, धानोरी रोड, पुणे
इमेल:  sunil.samane@gmail.com

©सुनिल चन्नाप्पा समाने, २०१७. लेखकाचे संमतीने पुनर्प्रकाशित.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.ADVT


 

 

Print Friendly, PDF & Email

सुनील समाने

सुनील समाने लिंगायत धर्माचे अभ्यासक असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.

Read previous post:
देगाव मध्ये समता परिषद उत्साहात संपन्न

  देगाव:  येथे समता परिषद उत्साहात संपन्न झाल्याची माहिती बसवेश्वर गुडपे देगावकर यांनी दिली. नायगाव तालुक्यातील देगाव येथे समतेच्या विचारांचा

Close