श. रमेश मिठारे यांचा ‘समाज विभूती’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

1 min read

शेडशाळ: येथील महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ यांचेवतीने ‘समाज विभूती’ पुरस्कार मिळाल्याबद्दल शरण रमेश मिठारे यांचा सत्कार करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते मिठारे यांना मे महिन्यामध्ये ‘समाज विभूती पुरस्कार घोषित’ करण्यात आला होता. इचलकरंजी येथील ‘गीता संघर्ष साप्ताहिक’ व ‘माता जिजाऊ महिला फौंडेशन’ यांचे वतीने हा पुरस्कार प्रदान केला जातो.

काल झालेल्या सत्कार समारंभामध्ये ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ’ चे विश्वस्त शरण संजय शहापूरे, शरण राजू शनवाडे, शरण नाईकवाडे यांनी पुरस्कार मिळालेबद्दल शरण मिठारे यांचे अभिनंदन केले. शरण दत्ता भेंडवडे यांच्या हस्ते सत्कार केला.

याप्रसंगी शरण गोटखिंडे, नाईकवाडे गुरुजी, शरन शिरढोणे व शेडशाळ गावचे शरण-शरणी उपस्थित होते.ADVT


 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
महात्मा बसवेश्‍वरांचा स्मारक उभारण्यासाठी २५ एकर जमीन

सोलापूर: 'कन्नड साहित्य परिषद, महाराष्ट्' अंतर्गत सोलापुरातील हुतात्मा स्मृती सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य कन्नड साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी करण्यात

Close