देगाव मध्ये समता परिषद उत्साहात संपन्न

1 min read

 

देगाव:  येथे समता परिषद उत्साहात संपन्न झाल्याची माहिती बसवेश्वर गुडपे देगावकर यांनी दिली.

नायगाव तालुक्यातील देगाव येथे समतेच्या विचारांचा वणवा पेटवण्यासाठी महामानावाच्या विचारांचे बीज रुजवण्यासाठी समता परिषद यशस्वीरीत्या संपन्न झाली. या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून निळकंठ पाटील ताकबीडकर यांनी सर्व बहुजन समाजाला संघटित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जाती अंताची लढाई लढण्याची हीच खरी वेळ आहे ,जात ही मानव निर्मित आहे हे उपास्थितांना पटवून देण्यासाठी समातानायक महात्मा बसवण्णा याच्या जीवनातील हृदयस्पर्शी प्रसंग लोकांच्या डोळ्यापुढे वर्णन केले आणि बुद्ध, बसव,  शिवछत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवाच्या विचाराचा गजर केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्यातील लिगायताचे तरुण नेतृत्व राजुभाऊ बेळगे यांनी हा समता परिषदेचा प्रतिसाद आणि उत्साह पाहून तालुक्यातील गाव तेथे समता परिषद आयोजित करण्याचा मनोदय बोलून दाखवला.

या परिषदेच्या प्रमुख पाहुणे म्हणून बंटी पा. बोमानाळे, राजेश्वर पा. खानापूरकर, मनोज बेळगे, प्रविण पाटील ताकबीडकर आणि देगाव नगरीतील प्रतिष्ठित नागरीक व बहुजन समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देगाव येथील समातावादी नवयुवक मंडळीनी हा अद्वितीय उपक्रम घडवून आणला.

नोंद: ही बातमी नीलकंठ पाटील ताकबीडकर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बनवण्यात आली आहे.ADVT


 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
श. रमेश मिठारे यांचा ‘समाज विभूती’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

शेडशाळ: येथील महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ यांचेवतीने 'समाज विभूती' पुरस्कार मिळाल्याबद्दल शरण रमेश मिठारे यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक

Close