महात्मा बसवेश्‍वरांचा स्मारक उभारण्यासाठी २५ एकर जमीन

1 min read

सोलापूर: ‘कन्नड साहित्य परिषद, महाराष्ट्’ अंतर्गत सोलापुरातील हुतात्मा स्मृती सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य कन्नड साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ना. देशमुख यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

महात्मा बसवेश्‍वरांच्या स्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढा ही कर्मभूमी आहे. त्यांच्या कर्मभूमीत त्यांचे स्मारक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जमिनीबाबत ठराव केला आहे. हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन  पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांनी केले. तसेच सिध्दरामेश्वरांच्या वचन चळवळीचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

यावेळी व्यासपीठावर उद्घाटक कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री ना. एम.बी. पाटील, खा. शरद बनसोडे, कन्नड साहित्य परिषदेचे कर्नाटकचे राज्य अध्यक्ष डॉ. मनू बळीगार, संमेलनाचे सर्वाध्यक्ष डॉ. बी.बी. पुजारी, महाराष्ट्र घटकचे अध्यक्ष बसवराज मसुती, डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, कर्नाटकचे जलसंपदामंत्री एम.बी. पाटील, महापौर शोभा बनशेट्टी, आळंदचे आमदार बी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

वरील बातमी श. महादेव पाटील, लिंगायत अभ्यासक, सहसचीव, श्री. महात्मा बसवेश्वर पंच कमिटी, उमरगा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बनवण्यात आली आहे.ADVT


 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
नवी मुंबईत गुणवंत विद्यार्थ्यांचा १६ जुलै रोजी सत्कार

मुंबई: गतसालाप्रमाणे यंदाही 'बसव सेवा प्रतिष्ठान' च्या वतीने १० व १२ वीतील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करीयर मार्गदर्शन शिबीर

Close