ताकबीड मध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि करियर मार्गदर्शन उत्साहात संपन्न

1 min read

ताकबीड: नायगाव तालुक्यातील ताकबीड येथे सरपंच रंजित पाटील ताकबीडकर यांच्या नेतृत्त्वाखाली शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये उत्तीर्ण झालेल्या १० वी आणि १२ वी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान समारंभ आणि करिअर मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुढील जीवनाविषयी देगलूर येथील वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक लकक्षेट्टे सर यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव पंचायत समितीचे सभापती प्रा. मनोहर पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील गावांचे सरपंच उपस्थित होते.

गुणवंत समारंभ प्रसंगी वर्ग १२ वी उत्तीर्ण १) सुरेश कुरे ,२) वर्षाराणी टेकाळे ३) जयपाल शिरधे, ह्या प्रथम तीन, तर १० वी उत्तीर्ण १) उमाताई मंगनाळे, २) हर्षद कुरे, ३) वर्षा वरवटे आणि उत्तेजनार्थ ४) शिवशंकर कुरे ह्या सर्व ताकबीड नगरी मधून प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना महात्मा बसवण्णा आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो असणारे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच रंजित पाटील यांचा सर्व युवकांनी सत्कार केला. वेळोवेळी युवकांची भूमिका जाणून, प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात सामील होणारा गावातील एक तरुण म्हणून त्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गुणवंतांच्या तसेच उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था मा. सरपंच यांनी केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बसव वैचारीक विद्रोही तरुण शरण निळकंठ पाटील आणि त्याची लहानी बहीण शरणी वैष्णवी पाटील यांनी करून  उपस्थितांना भारावून टाकले.

ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बसव प्रतिष्ठान ताकबीडच्या सर्व युवकांनी प्रयत्न  केले.

अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ताकबीडची शैक्षणिक दिशा उंचावणार असल्याचा सूर श्रोत्यांमध्ये जाणवला.

यासंदर्भात सविस्तर माहिती  शरण निळकंठ पाटील यांनी दिली.


ADVT


Print Friendly, PDF & Email
Read previous post:
वचन संशोधन पितामह डॉ. फ. गु. हळकट्टी

बाराव्या शतकात बसवादि शरणांनी वचनरुपी मंदिराची उभारणी केली. बसवोत्तर काळात तोटड सिद्धलिंग शिवयोगी आणि समकालीन शरणांनी त्या वचनरुपी मंदिराचे शिखर

Close