वचन संशोधन पितामह डॉ. फ. गु. हळकट्टी

1 min read

बाराव्या शतकात बसवादि शरणांनी वचनरुपी मंदिराची उभारणी केली. बसवोत्तर काळात तोटड सिद्धलिंग शिवयोगी आणि समकालीन शरणांनी त्या वचनरुपी मंदिराचे शिखर बांधले, फ. गु. हळकट्टी यांनी त्या वचनरुपी मंदिरावर संशोधनरुपी सुवर्णकलश चढविला. सत्ता, संपत्ती, विद्या, कीर्ती, प्रतिष्ठा हे सर्व असताना त्याचा त्याग करून वचन संशोधनासाठी जीवन समर्पित केले. वकिली सोडून सायकलवरून फिरून वचनांची ताडपत्रे मिळविली. ताडपत्र मिळविण्यासाठी त्यांनी बरीच संपत्ती खर्च केली. त्याच्या मुद्रनासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हे म्हणून राहते घर विकले.  त्यांच्या उतार वयात त्यांचा तरुण मुलगा चंद्रशेखर सोडून गेला. त्यानंतर दोन वेळ जेवणाची भ्रांत, हालअपेष्टा हसतहसत सहन करून त्यांनी वचनसंशोधनाचे केलेले  कार्य अद्वितीय आहे.

डॉ. फ. गु. हळकट्टी यांचा जन्म वडील गुरुबसप्पा आणि आई दांनम्मा यांचे पोटी २ जुलै, १८८० रोजी झाला. गुरुबसप्पा हे शिक्षक होते. त्यांच्या घरचे वातावरण सुसंस्कृत होते. त्यांनी बी. ए. एल.एल.बी. पर्यंतचे शिक्षण घेतले.पुढे सरकारी वकील म्हणून नोकरी स्वीकारली. तिम्मणप्पा चिकोडी यांच्या भागीरथी नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर चंद्रशेखर, सरस्वती, गुरुपुत्रप्पा, पार्वती, शिवशंकर ही पाच अपत्ये त्यांना झाली.

सन १९०३ साली शिवलिंगप्पा मंचाली यांच्या घरात षटस्थलतिलक आणि प्रभुदेवांची वचने असणारी ताडपत्रे पाहून वचन साहित्य अध्ययनकडे वळाले. सरकारी वकीली करत असताना त्यांनी अनेक खेड्यांना  भेटी देऊन जुने ग्रंथ मिळवून अभ्यास केला. १९२६ साली शिवानुभव हे त्रैमासिक सुरू केले. क्रांतिकारक वचनांचा संग्रह करून वचनशास्त्रासार असे नाव देवून मंगळूर च्या बासेल मिशन प्रेसकडे मुद्रणासाठी पाठवले. पण त्या प्रेसने वचनशास्त्रासार ची प्रत आणि  ५०० रुपये परत पाठवून मुद्रणासाठी नकार दिला.  त्यांनी सोबत एक पत्र पाठवले त्यात लिहिले होते, ” महाशय हळकट्टी आपण पाठवलेल्या ग्रंथात सांगितलेले विचार आमच्या धर्मातील बायबल ग्रंथाशी मिळते जुळते आहेत. आपला ग्रंथ छापणे म्हणजे ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या कामाला भंग आणणे आहे. म्हणून पैसे आणि ग्रंथ परत पाठवीत आहोत.”  ते पत्र वाचून त्यांचे डोळे भरून आले, ग्रंथ छापला नाही. पण, वचनसाहित्य हे बायबलशी मिळतेजुळते आहे याचा त्यांना आनंद झाला. मुद्रणांच्या जिज्ञासेपोटी त्यांनी स्वतः हितचिंतक मुद्रणालय स्थापन केले.

डॉ. बी. एम. पाटील आपल्या वचनगुम्मट या पी.एच. डी च्या प्रबंधात  डॉ. हळकट्टी यांच्या साहित्याचा उल्लेख करतात. हळकट्टी यांनी ८६ ग्रंथ संपादित केले असून त्यापैकी ४६ वचनसंपादनाचे ग्रंथ आहेत. ७ शिलालेख संपादन ग्रंथ आहेत. १० रगळे संपादन आहेत. काव्यसंपादने १२ आहेत. गद्य संपादने ९ आहेत. नवकर्नाटक हे साप्ताहिक आणि शिवानुभव हे मासिक त्यांनी चालविले. याशिवाय १२ ग्रंथाची स्वतंत्र निर्मिती केली आहे. त्यात अधिकाधिक चरित्राचा समावेश आहे. शिवानुभव शब्दकोश हाही मौलिक ग्रंथ तयार केला आहे.

डॉ. फ. गु. हळकट्टीनी दिलेला संदेश:-

१. तुम्ही तुमच्या संपत्तीचे रक्षण करता ,तसे वचन साहित्याचे रक्षण करा.

२. वचन साहित्याने तुमचे घर उजळू द्या.

३. शरणांची भावचित्रे आणि अनुभाव वाणीने तुमच्या घराच्या भिंती अलंकृत होऊ दे.

४. सभा समारंभाच्या आरंभी आणि समारोप प्रसंगी वचन प्रार्थना ऐकवा.

५. वचनसंगीत तुमच्या कानासाठी मधूर आभूषण होऊ द्या.

६. वचन ग्रंथ प्रकाशित करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या ,सहकार्य करा.

७.  बालकांसाठी वचन पाठांतर स्पर्धा आयोजित करा.

संदर्भ:

  • शरण जीवन दर्शन , लेखक: राजू जुबरे

 

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.ADVT


 

 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
श. सचिन समाने यांचा प्रशंसनीय उपक्रम

एकूरगावाडी पाटी (प्रतिनिधी): आजच्या तथाकथित पध्दतीनुसार जन्मदिन साजरा करण्याचा विचार सोडून अनाथ, मुकबधीर, मतिमंद आश्रमात जाणे व तिथे तो साजरा

Close