श. सचिन समाने यांचा प्रशंसनीय उपक्रम

1 min read

एकूरगावाडी पाटी (प्रतिनिधी): आजच्या तथाकथित पध्दतीनुसार जन्मदिन साजरा करण्याचा विचार सोडून अनाथ, मुकबधीर, मतिमंद आश्रमात जाणे व तिथे तो साजरा करण्याचा विचार करणे याची आपल्यापैकीच काही पुढारलेले कदाचित थट्टा करतीलही परंतु हे घडलय !

 

२९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता सचीन समाने, महेश पाटील, महादेव पाटील, अजित बिराजदार व इतर जणांचा समुह मराठवाडयातील पहिले व जिल्हा मधील एकमेव तुळजाभवानी अनाथ मुकबधीर मतीमंद बालग्रह, एकूरगावाडी पाटी, ता.उमरगा जाऊन काही वेळ तेथे व्यतित करून एक वेळच्या दासोह (फराळ व मिठाई) ची व्यवस्था केली व जगतज्योती महात्मा बसवेश्वराची प्रतीमा भेट दिली. त्यांच्या प्रकल्पाची माहिती घेतली. जन्मदिनाचे औचित्य साधून त्या कृतीतून समाजापुढे एक उदाहरण प्रस्थापित करण्याच्या शरण सचीन समाने यांचा प्रयत्न प्रशंसनीय आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती  शरण महादेव पाटील, लिंगायत अभ्यासक, सहसचिव महात्मा बसवेश्वर पंच कमिटी, उमरगा यांनी दिली.


ADVT


 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
चाकूरच्या प्रवेशद्वाराला जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे नाव

चाकूर (प्रतिनिधी): लातुर जिल्हातील चाकूरच्या प्रवेशद्वाराला जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याचा ठराव नगरपंचायतीने गुरुवारी (दि. २९) सर्वसाधारण सभेत सर्वानुमते

Close