चाकूरच्या प्रवेशद्वाराला जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे नाव

1 min read
चाकूर (प्रतिनिधी): लातुर जिल्हातील चाकूरच्या प्रवेशद्वाराला जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याचा ठराव नगरपंचायतीने गुरुवारी (दि. २९) सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर केला. चाकूर नगरपंचायतीच्या विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष  विलासराव पाटील चाकुरकर यांनी जनतेच्या मागणी अर्जावरून चाकूरच्या प्रवेशद्वाराचे जगतज्योती महात्मा बसवेश्वर नामकरण करण्याचे सूचविले. त्यास माजी पं. स. सभापती तथा पाणीपुरवठा सभापती अब्दुल करीम गुळवे यांनी अनुमोदन दिले.सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
याबद्दल महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीकडून सत्कार करण्यात आला. यामध्ये  नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, उपनगराध्यक्ष विलासराव पाटील, मुख्याधिकारी सुमित जाधव, विरोधी पक्षनेते नितीन रेड्डी, पाणीपुरवठा सभापती अब्दुल करीम गुळवे, जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वच्छता सभापती गोपाळ माने, नगरसेवक इलियास सय्यद, चाँद मासुलदार यांच्यासह सर्व नगरसेवकांचा सत्कार करून आभार मानले.
तसेच चाकूरच्या प्रवेशद्वारात जाऊन फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
याप्रसंगी  प्रा. राजेश विभुते (लिंगायत सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष), सुभाष काटे (शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख), सागर होळदांडगे (अध्यक्ष, स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी सोनटक्के चॅरिटेबल ट्रस्ट), भागवत फुले (शिवसेना शहरप्रमुख), आत्माराम डाके (तालुकाध्यक्ष, सावता परिषद), राहुल फुलारी (अध्यक्ष, बसवेश्वर जयंती महोत्सव समिती), संदीप शेटे, सुरज शेटे, अंकुश हुडगे, ज्ञानेश्वर चाकूरकर, दीपक आलमाजी, गणेश आलमाजी, शिवदर्शन स्वामी, रविंद्र हाळे, सतीश हाळे, सोमनाथ स्वामी, धनंजय नाकाडे, रवि पटणे, अविनाश गोलावार, बाळू बिडवे, अजय शंके, बस्वराज इरवाने,  यांच्यासह चाकुर तालुक्यातील बसवप्रेमी युवक, नागरीक  होते.
यासंदर्भात सविस्तर माहिती  शरण महादेव पाटील, लिंगायत अभ्यासक, सहसचिव महात्मा बसवेश्वर पंच कमिटी, उमरगा यांनी दिली.


ADVT


 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
लाखाचा पोशिंदा: महाराष्ट्र कृषिदिन विशेष

ज्याने आपल्या घामाने ही काळी माती भिजविली अखंड श्रमाने ज्याने आपला देह राबविला कष्ट उपसले पोटासाठी ज्याने आपले तन आणि

Close