बसव ब्रिगेड सोलापूरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

1 min read

सोलापूर: ‘बसव ब्रिगेड’ संघटनेच्या सोलापूरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये माळशिरस तालुक्यातील राहुल बिडवे यांची ‘बसव ब्रिगेड’ सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

तरुण लिंगायत कार्यकर्ते म्हणून सक्रीय असलेले राहुल बिडवे ‘बसव बिग्रेड’ च्या कार्यक्रमामध्ये कार्यरत असून  लिगांयत धर्माच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी खा.राजु शेट्टी यांना निवेदन दिले होते, त्यावर खासदार राजु शेट्टी यांनी लोकसभेत आवाज देखील उठवला होता

याचबरोबर, पंढरपूर तालुक्यातील शरण संदीप तवटे यांची ‘बसव ब्रिगेड’ चे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी ‘बसव ब्रिगेड’ चे संस्थापक अध्यक्ष मा. शरण. अविनाश दादा भोसीकर, ‘बसव ब्रिगेड’ राज्य सचिव अमितकुमार महाजन, ‘बसव ब्रिगेड’ लातूर जिल्हाध्यक्ष मा. सचिन शिवशेटे, संतोष अप्पा तवटे, वैभव तवटे, महेश टेके, रणजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ADVT


 

 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
‘बसव ब्रिगेड’ च्या कडेगाव तालुका शाखेचे उद्घाटन आज

कडेगाव (प्रतिनिधी): ‘बसव ब्रिगेड’च्या कडेगाव तालुका शाखेचे उद्घाटन आज (रविवार दिनांक २५ जून २०१७) संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे,

Close