माणसात देव शोधणारे महात्मा

1 min read

१२ वे शतक हे इतिहासातील क्रांतिकारक आणि परिवर्तनवादी शतक होते. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात बसवादी शरणांनी क्रांती घडवून आणली. देवाधर्माचे अवडंबर न मानता एकेश्वरवाद जोपासला. बसवण्णा आपल्या एका वचनात म्हणतात, ‘दगडाचा देव देव नाही’. म. बसवण्णानी माणसात देव शोधला, तो त्यांना सापडला. त्यासाठी त्यांची वचने प्रमाण आहेत.

महात्मा बसवण्णांचे माणसातच देव आहे हे सांगणारे वचनसार.

१ – शरणांचा देह कैलास आणि शरणांच्या घराचे अंगण वाराणसी आहे.

२- केदार ,वाराणसी, विरुपाक्ष, पर्वत, यापैकी कोणत्याही स्थानाचे मी दर्शन घेत नाही. तर समाजच लिंग आहे असे दृढ जाणले आहे.

३-सुख प्राप्त झाले म्हणून पुण्याचे फळ मानणार नाही, दुःख प्राप्त झाले म्हणून पापाचे फळ मानणार नाही. त्याचा कोणालाही दोष देणार नाही. कर्माचा कर्ता तूच असे म्हणणार नाही. कधीच उदास होणार नाही, मानवतेसाठी त्याग करणे  हेच जीवन आहे हे कधीच विसरणार नाही.

४-  जलाशय आणि वृक्ष या नश्वर गोष्टीला आपले अस्तित्व मानणारे आमच्या कुडलसंगम देवाला जाणू शकत नाहीत.

५- सूप, रस्त्यावरचा दगड, मडके, तांब्या धन्यष्याची दोरी या असंख्य प्रकारच्या देवामुळे पृथ्वीवर जागा शिल्लक राहिली नाही.

६- चोरी, हत्या, निंदा, आत्मस्तुती, क्रोध, मत्सर करू नका. खोटे बोलू नका हीच अंतरंग आणि बहिरंगाची शुद्धी आहे. हीच कुडलसंगम देवाला ओळखण्याची रीत आहे.

७- दगडी नागला दूध देतात , जिवंत नागला मारतात. भुकेल्या व्यक्तीला अन्न देत नाही, न खाणाऱ्या लिंगाला नैवेद्य दाखवतात. असे जर वागत राहिले तर दगडाखाली असणाऱ्या ढेकळासारखी अवस्था होईल.

८- वितळणाऱ्या धातूच्या मुर्ती, विकल्या जाणाऱ्या प्रसंगी जमिनीत गाडल्या जाणाऱ्या देवाला देव कसे म्हणावे.

९- फुटणारे, तुटणारे, विकले जाणारे, गहाण पडणारे देव देव नाहीत.

१०-  झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या क्षुद्र देवाला बकरीचा बळी देतात, आमच्या कुडलसंगमदेवाला पूजण्यासाठी एक बेलाचे पान पुरे आहे.

११-  श्रीमंत लोक मंदिर बांधतात. गरीब लोक मंदिर बांधू शकत नाहीत, त्याचे मंदिर म्हणजे त्यांचा देह आहे. स्थावर मंदिर नैसर्गिक आपत्तीत नाश पावते. जंगम (येथे अर्थ समाज) कधीच नाश पावत नाही.

१२-  पतीव्रता स्त्रीला एकच पती आणि परमभक्ताला एकच देव असतो.

१३-  परपुरुषाला पती म्हणणाऱ्या स्त्रीला पतीव्रता म्हणता येत नाही तसे लिंग प्रसाद घेतात पण अन्य देवांची स्तुती करतात ते ढोंगी आहेत, दांभिक आहेत.

१४-  पतीला नाकारुन परपुरुषांबरोबर रममाण झाल्यास देव प्रसन्न होत नाही. तसेच गळ्यात लिंग असून अन्य देवाची उपासना करणारा भक्त व्यभिचारी आहे.

१५-  गळ्यातील लिंग सोडून अन्य देवांचा संगती व्यभिचार आहे.

१६- देव एकच आहे, नावे मात्र वेगळी आहेत. अन्य देवाला वंदन करणाऱ्याचे कुडलसंगमदेव नाक, कान कापेल.

१७- पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालून पूर्वलिखित नष्ट होत नाही.  खोट्यावर विश्वास ठेवू नका. फक्त लिंगपुजा करा. मंत्र वाचून दुसऱ्याचा गळा कापणाऱ्यांना कुडलसंगम आपलेसे करत नाही.

१८- जंगमसेवा (समाजसेवा) हीच आचारशुद्धी आणि  ज्ञानशुद्धी आहे. तेच सर्वस्व आणि सत्य आहे.

१९- परस्त्री, परधनाची आशा करून नदीत स्नान करणाऱ्या दांभिक लोकांनो, तुमच्या दांभिकपणामुळे नदी आटून जाईल.

 

(नोंद: येथे वचनातील महत्वाच्या मुद्द्यांचा सारांश घेतला आहे. त्याचा सार लिहिला आहे, वचन नाही.)

 

संदर्भ ग्रंथ:

  • वचन – कन्नड डॉ. एम. एम.कलबुर्गी (बसव समिती) ,वचनदीप्ती, अगा कुडलसंगमदेवा, वचनसंदेश
  • लिंगायत धर्मसंस्थापक महामानव बसवण्णांचे क्रांतिकारी विचार- रविशंकर कोरे

 

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.
ADVT


 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
योजना आलुरे मानवधिकार महासंघाच्या महिला उपाध्यक्षापदी

मुंबई: 'आंतरराष्ट्रीय मानवधिकार न्याय महासंघ, महाराष्ट्र राज्य' च्या महिला उपाध्यक्षापदी योजना आलुरे यांची निवड झाली आहे. लिंगायत धर्मातील धडाडीच्या महिला

Close