‘बसव ब्रिगेड’ च्या कडेगाव तालुका शाखेचे उद्घाटन आज

1 min read

कडेगाव (प्रतिनिधी): ‘बसव ब्रिगेड’च्या कडेगाव तालुका शाखेचे उद्घाटन आज (रविवार दिनांक २५ जून २०१७) संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘बसव ब्रिगेड’ चे सोशल मिडिया प्रमुख व वचन अभ्यासक अभिषेक देशमाने यांनी दिली.

उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ‘बसव ब्रिगेड’चे संस्थापक-अध्यक्ष अविनाश भोसीकर तसेच संघटनेचे राज्य सचिव अमित महाजन हे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रम कडेगाव येथील महादेव मंदिरात संपन्न होणार आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व लिंगायत बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशांत विभूते, संदीप माळी, दिपक कोकणे, अधिक तडसरे या उद्घाटन समितीच्या कार्यवाह सदस्यांनी संयुक्तपणे केले आहे.
ADVT


 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
शरणी जान्हवी संजय बिराजदार दहावी बोर्ड परीक्षेत उमरग्यात प्रथम

उमरगा: येथील शरणी जान्हवी संजय बिराजदार दहावी बोर्ड परीक्षेत ९८.२० टक्के गुण प्राप्त करुन उमरगा तालुक्यात प्रथम आली आहे .

Close