वीरगणाचारी मडिवाळ माचीदेवाचे वचन

1 min read

निर्वाह झाले देवा बसवण्णांचे कप्पडी संगमनाथा ठायी

अक्कनागाई, मिंड मल्लिनाथ, हडपद अप्पण्णा,

मोगवाडद केशिराज, कोलशांतय्या आदी करून सकल शिवगण बसवण्णांच्या सर्वशून्यठायी झाले एक.

‌त्या सर्वशून्य प्रसादाने निरुपम प्रभुदेव कर्दळीच्या बनी ऐक्य पावले.

शून्य निशून्य त्या बयलू प्रसादाने मोळीगे  मारय्या, कक्कय्या, पडिहारी उत्तण्णा, कन्नड मामण्णा, कलिकेत बोमण्णा, नुलिय चंदय्या, हेडद मारय्या,  शंकर दासिमय्या, एकांत रामय्या, मेदार केतय्या आदिकरुन अमरगणांचा समूह पावला हो निजैक्य.

आले महत कार्याची झाली आता पूर्तता  प्रख्यात असलेले सकल पुराण निपटले माझ्या मनीचे मालिन्य.

या योगे कलिवरदेवा, या सकलांचे शेष प्रसादाचे निशून्य झाले हो मज प्राप्त.

भावार्थ आणि इतिहास

‌कल्याणच्या क्रांतीनंतर बसवण्णा हे कुडलसंगमकडे गेले आणि तेथेच ते लिंगैक्य झाले. म. बसवण्णानंतर अक्कनागाई, मिंड मल्लिनाथ, हडपद अप्पण्णा, मोगवाडद केशिराज, कोलशांतय्या इ. सकल शिवगण लिंगैक्य झाले. या सर्वांच्या निर्वाहानंतर महाज्ञानी अल्लमप्रभुदेव कर्दळीबनात ऐक्य पावले.  त्या शून्य निशून्य प्रसादाने मोळीगे मारय्या, कक्कय्या, पडिहारी उत्तण्णा, कन्नड मोमण्णा, कलिकेत बोमण्णा, नुलिय चंदय्या, हेडद मारय्या, शंकर दासिमय्या, एकांत रामय्या, मेदार केतय्या हे शरणांनी वचन रक्षणासाठी आपले बलिदान दिले.

‌आपल्या महत कार्याची पूर्तता करून आता माझे सगळे पुरातन निजैक्य पावले. म्हणून या सर्वांचे शेष शून्य प्रसाद मला प्राप्त झाला.

 

संदर्भग्रंथ: वचनदीप्ती

 

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.ADVT

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
उठ लिंगायत युवा…जागा हो !

स्वतंत्र लिंगायत धर्म चळवळीच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे ‘लिंगायत स्वाभिमान आणि

Close