बसवकल्याण – एक प्रेरणास्थान : वैराग्यनिधी अक्कमहादेवीचे वचन

0 min read
अभिषेक देशमाने
Follow me

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.
अभिषेक देशमाने
Follow me
कल्याण नगर पाहुन महादेवी अक्कांनी केलेले वर्णन:
जाता येईना कोणालाही कल्याणा,
नच जाता येई असाध्य हे जाणा,
आशा, आमिष नष्ट केल्याशिवाय,
कल्याण नगरात ठेऊ नये हो पाय,
अंतबाह्य शुद्धीवीण कल्याण
रहस्य न घ्यावे उमजून,
चन्नमल्लिकार्जुनाशी जोडून प्रिती,
मी उभय लाज सांडली म्हणोनि ,
नमो नमो म्हणती कल्याण पाहुनी.

वचनांतील कल्याणचे संदर्भ:

म. बसवण्णा  आणि शरणांची कर्मभूमी बसवकल्याण. बसव काळात बसवकल्याणचे नाव कल्याण असे होते . शरणांच्या वचनात त्याचा उल्लेख आहे.  वैराग्यानिधी अक्कमहादेवी आपल्या वचनात  ” जाता येईना कोणालाही कल्याणा ”  अशा शब्दांत कल्याणचे महत्व सांगते. ज्ञानयोगी अल्लमप्रभु तर कल्याणला पणतीची उपमा देतात. “कल्याणरुपी पणतीत भक्तिरस रुपी तेल घालून”  या शब्दांत ते कल्याणचे वर्णन करतात. बसवण्णा वचनात म्हणतात ” कल्याण बत्तीस वर्ष भक्तीचे केंद्र राहिले. ” बसवण्णांच्या वचनांत बत्तीस वर्ष कल्याण मध्ये अनुभव मंटप चालला यासाठी हे बसव वचन प्रमाण आहे.
शरणांनी कल्याणवर जीवापाड प्रेम केले. त्याच शरणांचे आज आपण वारसदार म्हणून जगत असताना आज हा विश्वास कोठे तरी कमी होत आहे. आज कल्याणला जाणाऱ्या लिंगायतांची संख्या वाढली पाहिजे. आम्हा बसवण्णांचे वारसदारांचे माहेरचं बसवकल्याण आहे. बसवकल्याण जेथे लिंगायत धर्माच्या वचन साहित्य निर्माण झाले. शरणांनी आपल्या अनुभावातून वचन लिहिले.  जेथे शरण चालले, बोलले, कायक केले ते बसवकल्याण. आजही कल्याण शरणांच्या वास्तव्याची साक्ष देत आहे.

भावार्थ:

शरणांची लाडकी लेक अक्कमहादेवी आपल्या वचनांत कल्याणचे महत्व सांगतात. कोणालाही कल्याणला जाणे शक्य नाही. कल्याणला तोच जाऊ शकतो ज्याने अशा अमिषावर नष्ट केले आहे. त्यालाच कल्याणमध्ये प्रवेश आहे. त्याचे अंतरंग आणि बहिरंग शुद्ध आहे तोच कल्याणचे रहस्य समजू शकतो. चेन्नमल्लिकार्जुनाचे ठायी एकरूप झाल्याने अक्कांचे सर्व भाव शून्य झाले होते. त्या पवित्रपावन कल्याण भूमीला, शरणभूमी कल्याणला पाहून अक्कमहादेवी दोन वेळा नमस्कार करते.

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.जाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड


 

Print Friendly, PDF & Email

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.

Read previous post:
विजापूरच्या महिला विद्यापीठास अक्कमहादेवीचे नाव

विजापूर (अभिषेक देशमाने) : कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात असणाऱ्या महिला विद्यापीठास 'वैराग्यानिधी अक्कमहादेवी' चे नाव देण्यात आले आहे. विद्यापीठाला अक्कमहादेवीचे

Close