लिंगायतांनी उपवास करू नये

1 min read

 

. बसवण्णा आणि शरणांनी आम्हा लिंगायताना सत्य शुद्ध कायक, दासोह आणि निराकार लिंगदेवाची भक्ती शिकविली. दांभिक भक्ती करायला शिकविली नाही. महात्मा बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात की आमच्या शरणांनी अनुभव आणि अनुभावामधून लिहिलेली वचनेच आम्हाला प्रमाण आहेत. शरणांनी सत्य शुद्ध कायकालाच ईश्वर म्हंटले आहे. त्यासाठी खाली दिलेले वचन प्रमाण आहे,

आद्यांची वचनेच परिसासम असे पहा,

तेच सदाशिवलिंग, असा विश्वास ठेवावा.”

                           ~~~ . बसवण्णा

शरणांनी बहुदेवउपासना नाकारली. इष्टलिंगाशिवाय दुसरा देव नाही, जर इष्टलिंगसोडून इतर देव पूजिल्यास परपुरुषांशी संग केल्यासारखे होईल. करस्थळावर इष्टलिंग असता स्थावरलिंगाला नमस्कार करू नये. जेथे शरणांनी शरणांनी स्थावरलिंग मानले नाही तेथे इतर देवतांचा विचार करणेसुध्दा चुकीचे ठरेल.

इष्टलिंग धारण करता देहावरी

स्थावरलिंगास पुजू नये.

स्वपतीस सोडून परपुरुषाची संगत होईल का उचित ?

करस्थळी असता देव,

स्थावर लिंगासी केल्यास वंदन

नरकात ढकलेलं कुडलसंगमदेव.

                                ~~~ . बसवण्णा

आमचे बंडखोर शरण अंबिगर चौडय्या म्हणतात,

धारण केलेल्या लिंगाला कनिष्ठ करूनी.

पर्वतावरील लिंग श्रेष्ठ करण्याची रीत पहा!

नि: सत्व ढोंगी दिसता,

नवीन पादरक्षा घेऊन फटा-फटा मारावे असे म्हणे

                                                 ~~~अंबिगर चौडय्या

शिवयोगी मन्मथ स्वामीदेखील दुजोरा देतात, मन्मथ स्वामी म्हणतात,

अमान्य करुनि हृदयीचे लिंग । जो धरी स्थावरी भक्ती अंग ।।

तो शिवभक्त नोहे केवळ सोंग ।बहुरूपियाचे।।

इष्टलिंग असता हृदयावरी ।  अन्य स्थावरा दंडवत घाली ।।

त्याचे मुख देखता आंघोळी। वस्त्रासाहित करावी ।

                                                  ~~~मन्मथ स्वामी

. बसवण्णा आपल्या एका वचनात दांभिक भक्ती, दांभिक भक्त यांच्यावर कडाडून टीका करतात. त्या दांभिक भक्तांचा संगती, बोलणे, शेजार मला नको असे सांगतात. या दांभिक भक्तांच्या सहवासात राहण्यापेक्षा आमच्या कुडलसंगमदेवाच्या शरणांचा सोज्वळ दास होऊन राहीन असे सांगतात.

दांभिक भक्तांचा शेजार नको, संगत नको,

त्यांची सोबत नको, त्यांच्याशी बोलू नको, सावध रहा.

कुडलसंगाच्या शरणांच्या येथे

सोज्वळ लिंगैक्याचा दास होऊन राहावे.

                                                          ~~~ . बसवण्णा

अण्णा बसवण्णांचे वडील एकदा पूजा करत होते. त्या देवघरात असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे देव होते. त्या सर्वांची पूजा झाल्याशिवाय घरात  कोणालाही खाण्यापिण्याची मुभा नव्हती. बाळ बसवाला तहान लागली होती, तो आईकडे पाणी मागतो तेव्हा आई बाबांची पूजा झाल्यावर देतो म्हणते. बसव अंगणात खेळायला जातात. खेळताना काही वेळाने पुन्हा ताहनेची आठवण होते, पूजा चालू असल्याने तेव्हाही पाणी मिळत नाही. बसव पार घेऊन अंगणात येतात, छोटे छोटे खड्डे करतात. काही वेळाने पूजा संपते वडील बाहेर येतात. ते पाहतात बसवण्णा अंगणात छोटे छोटे खड्डे करत आहे. बसवला बाबा विचारतात.

(बसवण्णांचे वडील मादिराज)

मादिराज: अरे..! बसवा  तू हे काय करत आहेस ?

बाल बसवण्णा : बाबा..!, मला तहान लागली म्हणून विहीर खोदत आहे .

मादीराज: बसवा, तू एके ठिकाणी खोदले असतेस तर पाणी लागले असते ?

बाल बसवण्णा: बाबा, तुम्ही एकाच देवाची पूजा केली असती तर आतापर्यंत तुम्हाला देव भेटला असता.

मादीराज आवक होऊन बाल बसवण्णांकडे पाहत राहतात. म्हणजे बसवण्णानी आम्हाला एकदेव उपासना दिली आहे. म्हणून इष्टलिंगाशिवाय अन्य देव मानले नाही पाहिजे.

बहुदेव उपासना करणाऱ्या लोकांना बसवण्णा म्हणतात की देव असंख्य नाही देव फक्त एकच आहे. आमच्या कुडलसंगमदेवाशिवाय दुसरा देव नाही.

दोघेतिघे देव म्हणून छाती फुगवून बोलू नको,

तो एकच असे हो, दोघे म्हणणे खोटे असे पहा हो !

कुडलसंगमदेवाशिवाय दुसरा देव नसे हो !

                                                         ~~~. बसवण्णा

वैदिक संस्कृतीत वेगवेगळ्या रुपात देव पूजिले जातात, गुहेश्वराचे ध्यान करणारे अल्लमप्रभु मात्र गुहेश्वराचे पूजन करून पुनर्जन्मरहीत झालो, शून्यात निशून्य झालो असे म्हणतात,

अग्नी देव , निखारा देव ,

मरीआई देव, स्मशानवासी देव,

भिक्षाटन करणारा संन्यासी रूपातील देव,

असे जेथे तिथे एकेक रीतीने सांगती.

मी तव पूजन करुनी, पुनःजन्मरहित होऊन,

शून्यात निशून्य होऊन गेलो, गुहेश्वरा.

                                                      ~~~अल्लमप्रभु

लिंगायताना कोणतेही व्रत, उपवास करण्याची गरज नाही. शरणांनी आपल्या वचनातुन व्रत, उपवासाला विरोध केला आहे.

तीर्थव्रत नेम , अष्टांगादि योग । आचारिता न भोग चुकेसी ।।

नानादेवतांचे केलिया पूजन। अनन्यता तेणे नष्ट होय ।

                                                   ~~~मन्मथ स्वामी

लिंगायतांनी व्रत, उपवास करू नये, याचे काडिनोळगाद शंकरप्रिय चेन्नकदंबलिंग निमाय प्रभू हे वचनातून सांगतात.

दिनचर्यात, मासात, सप्ताहात सोमवार उपवास करावा म्हणतात. व्दादश मासात श्रावण सोमवार उपवास करावा म्हणतात. माघ मासाच्या चतुर्दशी दिवशी उपवास रात्री जागरण करावे म्हणतात. असे वार मास तिथिंच्या दिवशी अन्नपाणी सोडून, उपवास करून,आत्म्याला क्लेश देवून, देहाला दुर्बळ करून, तुम्ही व्रत आचरिल्यास तो तुमचा आत्म द्रोह, त्या देवतांना दु:खवून परत भव भवात जाणार. या कारणे उपवास करू नयेत. उपवास करण्याने प्रयोजन नाही. ते कसे म्हणजे : जेवण करून लिंग पूजा करावी. जेवण कपडालत्ता देवून जंगम पूजा करावी. असे त्रिविधाचे भेद जाणलेले उपवास करू नये म्हणतात.

                                                              ~~~ काडिनोळगाद शंकरप्रिय चेन्नकदंबलिंग निमाय प्रभूवे      advt


 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
शरण शिवयोगी सिद्धरामेश्वर जी का वचन

बसव को द्वितीय शंभु कहते है। हम तृतीय शंभू है। जो खुद को जानता है वह द्वितीय शंभु कहलाते है

Close