बसव ब्रिगेड आयोजित राज्यस्तरीय बसव अभ्यास शिबीर उत्साहात संपन्न 

0 min read
अभिषेक देशमाने
Follow me

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.
अभिषेक देशमाने
Follow me

बसव कल्याण (अभिषेक देशमाने) : शनिवार १० जून २०१६ रोजी  परमपावन शरणभूमी बसवकल्याण येथे विश्वगुरु महात्मा बसवण्णांच्या कृपाशीर्वादाने पूज्य बसवकुमार स्वामीजी यांच्या उपस्थितीत बसव मंत्रपठण, षटस्थल ध्वजारोहण करून शिबिराची सुरवात झाली. पूज्य गुरुवर्य बसवकुमार स्वामीजी यांच्या पावन हस्ते षटस्थल ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाचे प्रस्थाविक मा. श अविनाश भोसीकर यांनी केले. लिंगायत धर्म अभ्यासक, प्रसिद्ध व्याख्याते, ‘ महाराष्ट्र राज्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र असे कार्य करणारे ‘बसव मिशन’ चे संस्थापक अध्यक्ष शरण डॉ. एस. व्ही. शेटे सर यांनी लिंगायत एक अवैदिक धर्म या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन केले. डॉ. शेटे सर यांनी  वैदिक आणि अवैदिक यातील विरोधाभासाचे ऐतिहासिक आणि प्रमाणबद्ध पुराव्यासह सविस्तरपणे विवेचन केले. अतिशय सुदंर आणि सोप्या भाषेत त्यांनी आपल्या विषयाची मांडणी केली. लिंगायत इतिहासाचे  गाढे अभ्यासक मा. श.  डॉ. भीमराव पाटील सर यांच्या ओजस्वी वाणीतून सत्य शुद्ध बसवचरित्र या विषयावर अनमोल मार्गदर्शन मिळाले. शरणचरित्राचे गाढे अभ्यासक , साहित्यिक, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे राजू जुबरे सर आणि प्रख्यात व्याख्याते अभ्यासक डॉ.  रत्नाकर लक्षेट्टे सर यांनी वचन आणि त्या वचनांचा सामाजिक दृष्टिकोनातून भावार्थ सांगितला.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी इष्टलिंग योगाचे गाढे अभ्यासक डॉ. अमरनाथ सोलपुरे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून इष्टलिंगाचे आणि इष्टलिंग योगाचे महत्व चित्रफितीच्या माध्यमातून समजावून सांगितले आणि इष्टलिंग योग कसा करावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले.  लेखक, दिग्दर्शक, चित्रसुष्टी कलावंत श. राजेंद्र अल्लमखाने दिग्दर्शित ‘ जगतज्योती महात्मा बसवेश्वर ‘ या मराठी मालिकेचा शुभारंभ पूज्य चन्नबसवानंद स्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.  या प्रसंगी पूज्य बसवकुमार स्वामीजी, पूज्य शिवानंद स्वामीजी उपस्थित होते .राष्ट्रीय वक्ते , लिंगायत धर्म इतिहासाचे सखोल अभ्यासक  प्रा. संजय माकण यांचे  बसवपूर्व कालीन सामाजिक परिस्थिती व धर्मस्थापना या विषयावर इतिहासाची पाने उलगडणारी अशी प्रभावी व्याख्यान  सरांनी केले.  बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श. अविनाशदादा भोसीकर यांनी लिंगायत धर्ममान्यता आणि संघटनात्मक बांधणी या विषयावर युवकांना मार्गदर्शन केले. युवा कार्यकर्ते श. अमित महाजन यांनी आभार प्रदर्शन केले, आमचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध व्याख्याते प्रा आनंद कर्णे सर यांनी संपुर्ण शिबिराचे सूत्रसंचालन केले.  या शिबिरासाठी प्रा. सुनील हेंगणे, मा. श.बसवराजजी कणजे सर, मा. श. चंद्रशेखर हुमशाळ आदी शरण मार्गदर्शक उपस्थित होते.   या शिबिरासाठी संपुर्ण महाराष्ट्राच्या सर्वच आणि  कर्नाटकाच्या काही भागातून युवा शरणबांधव उपस्थित होते.


Print Friendly, PDF & Email

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.

Read previous post:
बसव ब्रिगेड आयोजित राज्यस्तरीय बसव अभ्यास शिबिराचे उत्साहात उदघाटन

बसव ब्रिगेड आयोजित राज्यस्तरीय 'बसव अभ्यास शिबिरा'चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. शनिवार, १० मे २०१६ रोजी परमपावन शरणभूमी बसवकल्याण येथे...

Close