बसव ब्रिगेड आयोजित राज्यस्तरीय बसव अभ्यास शिबिराचे उत्साहात उदघाटन

1 min read

बसव कल्याण (अभिषेक देशमाने) : १० मे २०१६ रोजी  परमपावन शरणभूमी बसवकल्याण येथे विश्वगुरु महात्मा बसवण्णांच्या कृपाशीर्वादाने पूज्य बसवकुमार स्वामीजी यांच्या उपस्थितीत बसव मंत्रपठण, षटस्थल ध्वजारोहण करून शिबिराची सुरवात झाली. पूज्य गुरुवर्य बसवकुमार स्वामीजी यांच्या पावन हस्ते षटस्थल ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाचे प्रस्थाविक मा. श अविनाश भोसीकर यांनी केले. लिंगायत धर्म अभ्यासक , प्रसिद्ध व्याख्याते शरण डॉ. एस. व्ही. शेटे सर यांनी लिंगायत एक अवैदिक धर्म या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन केले. डॉ. शेटे सर यांनी  वैदिक आणि अवैदिक यातील विरोधाभासाचे ऐतिहासिक आणि प्रमाणबद्ध पुराव्यासह सविस्तरपणे विवेचन केले. अतिशय सुदंर आणि सोप्या भाषेत त्यांनी आपल्या विषयाची मांडणी केली. लिंगायत इतिहासाचे  गाढे अभ्यासक मा. श.  डॉ. भीमराव पाटील सर यांच्या ओजस्वी वाणीतून सत्य शुद्ध बसवचरित्र या विषयावर अनमोल मार्गदर्शन मिळाले. शरणचरित्राचे गाढे अभ्यासक , साहित्यिक, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे राजू जुबरे सर आणि प्रख्यात व्याख्याते अभ्यासक डॉ.  रत्नाकर लक्षेट्टे सर यांनी वचन आणि त्या वचनांचा सामाजिक दृष्टिकोनातून भावार्थ सांगितला.  या शिबिरासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून आणि  कर्नाटकाच्या काही भागातून युवा शरणबांधव उपस्थित होते. 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
शरण अंबिगर चौडय्या जयंती उत्साहात साजरी

पुणे (अभिषेक देशमाने): महाराष्ट्र बसव परिषद पुणे, यांचे तर्फे शरण अंबिगर चौडय्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मा. महेशभाऊ

Close