लिंगायत धर्म वार्तासाठी बातम्या व माहिती पाठवताना

1 min read

शरणु शरणार्थी,

लिंगायत युवा डॉट कॉम तर्फे आपले हार्दिक स्वागत.

आमची वेबसाईट वैश्विक पातळीवर लिंगायत धर्मियांसाठी एक बसवपीठ तयार करणे या उद्देशाने सुरु करण्यात आली असून आम्ही इंग्लिश, मराठी व कन्नड या तिन्ही भाषांमध्ये लिंगायत धर्मासंबंधी बातम्या, चर्चा, घडामोडी, उपयुक्त माहिती, बसव वचन, आर्थिक व सामाजिक विकास, अनुभव मंटप या व अश्या विविध विषयांवर लेख, फोटो, विडीओ, सोशल मिडिया लेखन आदी प्रसिद्ध करतो.

सर्व शरण-शरणींना आमचे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या लिंगायत धर्म विषयक सर्व घडामोडी आम्हाला कळवाव्या.

१. बातमी किंवा कार्यक्रमविषयक माहिती पाठवताना ती Whatsapp द्वारे ९८१९१७९३७७ या क्रमांकावर किंवा इमेल द्वारे editor@lingayatyuva.com वर पाठवावी.

२. प्रत्येक बातमीसोबत पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव व गाव लिहावे व संपर्क क्रमांक द्यावा. आम्ही खात्री केल्याशिवाय कोणत्याही बातम्या प्रसारित करत नाही.

३. प्रत्येक बातमीमध्ये कार्यक्रमाचे ठिकाण, मुख्य विषय, निवेदन किंवा प्रकाशन असल्यास त्याची सोफ्ट कॉपी (PDF/मायक्रोसोफ्ट वर्ड/ इमेज), प्रमुख वक्त्यांचे मुख्य वक्तव्य किंवा ठळक मुद्दे अवश्य पाठवावे.

४. प्रत्येक बातमीसोबत किमान एक फोटो अवश्य पाठवावा.

५. आपल्या बातमीमध्ये जाहिरात देण्यास कुणी इच्छुक असेल तर त्यांना आमच्या संपर्कात आणा. लिंगायत युवा  प्रत्येक बातमीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने  जाहिरातींचे प्रसारण करते व यासाठी भरमसाठ पैसे घेतले जात नाहीत.

आपल्याला शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास ९८१९१७९३७७ या नंबरवर कॉल करा किंवा वर दिलेल्या इमेलवर लिहा.

 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
उदगीर येथे ५ जून ला मासिक अनुभव मंटपाचे आयोजन

उदगीर (अभिषेक देशमाने): लातूरजवळील उदगीर येथे येत्या ५ जून ला मासिक अनुभव मंटपाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक

Close