बसव कल्याणमध्ये लिंगायत धर्मियांच्या शिबिराचे भव्य आयोजन

1 min read

बसव कल्याण (अभिषेक देशमाने): बसव कल्याण या जगतज्योती बसवेश्वर यांच्या क्रांतीभूमिच्या ठिकाणी येत्या १० व ११ जून ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘बसव ब्रिगेड’चे प्रदेशवक्ते प्रा. आनंद कर्णे यांनी दिली.

दोन दिवस चालणाऱ्या या निवासी शिबिरात सुप्रसिध्द विचारवंत व व्याख्याते वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करतील.

शरण डॉ.आमरनाथ सोलपुरे (इष्टलिंग दिव्य योगसाधना), शरण प्रा.संजय माकल (बसवपुर्वकालिन सामाजिक परिस्थिति और धर्म स्थापना), शरण मा.राजशेखर तंबाके (शिवयोग एक वैज्ञानिक दृष्टिकोण), शरण प्रा.भिमराव पाटिल (बसव सत्यशुद्ध चरित्र), शरण प्रा.राजेश विभूते (कल्याणक्रांती व आजचा लिंगायत समाज), शरण डॉ. राजशेखर सोलापुरे (वैज्ञानिक लिंगायत धर्म व त्याचे झालेले दैवीकरण), शरण डॉ.एस.व्ही.शेटे (लिंगायत: एक अवैदिक धर्म), शरण मा.अविनाश भोसिकर (लिंगायत धर्म मान्यता व संघटनात्मक बांधणी), अशी मुख्य व्याख्याने होणार आहेत.

या दोन दिवसीय शिबिरात वरील सर्व मान्यवर आपले आभ्यसपूर्ण विवेचन मांडणार आहेत. या शिबिरास पूर्वनोंदणी आवश्यक असून निवास व जेवणाची सुविधा करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी प्रा. आनंद यांच्याशी संपर्क साधावा (९६०४९६२४४१).

फोटो सौजन्य: http://www.goroadtrip.com


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
Basav Pith…….Not Vyas Pith

Peth Vadgaon (Abhishek Deshmane): Basavling Swami emphasized to use the word "Basav Pith" instead of the hitherto used "Vyas Pith".

Close