नमस्कार नव्हे, ‘शरणु शरणार्थ’ …व्यासपीठ नव्हे…’बसवपीठ’ !

0 min read
अभिषेक देशमाने
Follow me

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.
अभिषेक देशमाने
Follow me

पेठवडगाव (अभिषेक देशमाने) : दहाव्या शरण संस्कृती अध्ययन शिबिरास अत्यंत उत्साहात सुरवात झाली. ‘स्वतंत्र लिंगायत धर्म’ हा केंद्रीय विषय घेऊन दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी भारतातून अनेक लिंगायत विद्वानांचे आगमन झाले आहे.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ घुगरे असून पूर्णतः लिंगायत धर्मियांचे सांस्कृतिक संदर्भ सविस्तरपणे दाखवून देण्याचा प्रयत्न धर्म तज्ञ करत असल्याचे दिसत आहेत.

लिंगायत धर्मियांनी “नमस्कार” हा शब्द वापरण्याऐवजी शरण परंपरेत वापरला जाणारा “शरणू  शरणार्थ” हा शब्द वापरावा असे सांगितले.

शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी मुरघेन्द्र बसवकुमार स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांनी आशिर्वचनात नेहमी वापरल्या जाणाऱ्या व्यासपीठ या शब्दाऐवजी सर्वत्र लिंगायत धर्मियांनी  ‘बसवपीठ’ हा शब्द वापरावा असे सांगितले. बसवधर्माचे पालन करणाऱ्यांनी आपले मूळ स्रोत वापरणे आवश्यक असल्याचे आणि ते शरण संस्कृतीचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले. पाश्चात्य संस्कृतीचे कपडे लिंगायत धर्मातील लोकांनी परिधान करू नयेत. ख्रिस्ती धर्मानुसार असणारे कॅलेंडर आम्ही का वापरायचे? असा प्रश्न उपस्थित करून स्वामीजी म्हणाले, ख्रिस्ती धर्मात रविवारी चर्चमध्ये जावे लागते म्हणून रविवारी सुट्टी घेतली जाते. आपल्या लिंगायत धर्मानुसार रविवारी नव्हे तर सोमवारी सुट्टी घेतली जाते. त्यामुळे लिंगायत धर्माच्या स्वतंत्र कॅलेंडरचे अनुकरण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात करावे.

Print Friendly, PDF & Email

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.

Read previous post:
बसवन्नांचा वचननामाच घटनेच्या सरनाम्याचा मूलाधार : प्रा. भीमराव पाटील

पेठवडगाव (अभिषेक देशमाने) : भारतीय संविधानाची मूल्यात्मक चौकट बसवेश्वरांच्या वचन साहित्यातून आलेली असून घटनेच्या सर्व अंगात वचन संस्कृतीने मांडलेल्या स्वातंत्र्याच्या

Close