दहाव्या शरण संस्कृती अध्ययन शिबिरास उत्साहात सुरवात

1 min read

पेठवडगाव (प्रतिनिधी): दहाव्या शरण संस्कृती अध्ययन शिबिरास आज येथे अत्यंत उत्साहात सुरवात झाली. लिंगायत धर्माच्या ध्वजस्थापनेनंतर मुख्य उद्घाटन कार्यक्रम अनेक लिंगायत धर्मीय विद्वानांच्या उपस्थितीत सुरु झाला.

दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात लिंगायत धर्माच्या वेगवेगळ्या पैलूंवर विस्तृत चर्चा होणार असून अनेक तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

आज सकाळच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रा. घुगरे यांनी बसव दर्शनाचे महत्व सांगताना लिंगायत धर्माची वैश्विकता स्पष्ट केली.

लिंगायत धर्म हा सुरवातीपासून स्वतंत्र धर्म राहिला असून उत्तर ब्रिटीश काळातील काही राजकारणामुळे लिंगायत धर्माची स्वतंत्र ओळख प्रशासकीय पातळीवर पुसून टाकण्याचे प्रयत्न झाले. तीच स्वतंत्र धर्म म्हणून असणारी ओळख पुनश्च प्रस्थापित करण्यासाठी लिंगायत धर्मियांनी एकत्र येवून कृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी अनेक लिंगायत धर्म अभ्यासक उपस्थित आहेत.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीतुन बाहेर काढणे ही काळाची गरज: मा.चंदन पाटील नागराळकर

उदगीर (प्रतिनिधी): महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीतुन बाहेर काढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मा.चंदन पाटील नागराळकर यांनी केले. बसव प्रबोधन शिबीराचे

Close