महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीतुन बाहेर काढणे ही काळाची गरज: मा.चंदन पाटील नागराळकर

1 min read
उदगीर (प्रतिनिधी): महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीतुन बाहेर काढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मा.चंदन पाटील नागराळकर यांनी केले. बसव प्रबोधन शिबीराचे स्वागताध्यक्ष या नात्याने ते आपले विचार व्यक्त करत होते.
‘महाराष्ट्र बसव परिषद, उदगीर’च्या वतीने संपन्न होत असलेल्या बसव प्रबोधन शिबीरात मा.चंदन पाटील नागराळकरानी आपले विचार व्यक्त करतांना सांगीतले की म.बसवण्णा हे विश्व मानव होते. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळेच आज म.बसवण्णा साता समुद्रापार गेले आहेत. समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, बुवाबाजी आणी निरक्षरता दुर करण्यासाठीच म.बसवण्णांनी लिंगायत नावाची चळवळ निर्माण केली. जगाला लोकशाहीचा संदेश देण्यासाठी व तो रुजवीण्यासाठी अनुभव मंटपाची उभारणी करणारे बसवण्णा हे जागतीक स्तराचे महामानव आहेत. आज अशा शिबीरांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना बसव विचार कळणे गरजेचे आहे. पुढे बोलतांना नागराळकर म्हणाले की वाढता जातीवाद व ढासळत चाललेले आमचे नितीमुल्य  ही एक मोठी समस्या आहे. आज दिशाहीन झालेल्या तरुणांना महापुरुषांचाच विचार तारु शकतो. आमच्या महापुरूषांच्या विचारातच नवभारत घडवीण्याची क्षमता आहे. आवश्यक्ता आहे ती त्या महापुरुषांना समजुन घेण्याची. तथागत बुद्ध,महावीर,म.बसवण्णा,  संत कबीर, संत रवीदास, छ.शिवराय, म.फुले, शाहु महाराज, व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनीच आम्ही हा समाज घडवु शकतो.म्हणुनच आज इतिहासाच्या उजळणीची आवश्यकता असल्याचे मा.चंदन पाटील नागराळकरांनी सांगीतले.
या प्रसंगी बसवपीठावर महाराष्ट्रातील नामवंत शरण साहीत्यीक व व्याख्याते मा. प्रा. भिमराव पाटील, श. सुनिलजी हेंगणे, श. प्रा.रत्नाकर लक्षेट्टे, श. मा.राजु जुबरे, श. व्यंकटेश पाटील किणीकर यांच्यासह शिबीराचे कार्यवाह व महाराष्ट्र बसव परिषदेचे प्रदेश अध्यक्ष अँड. शिवानंद हैबतपुरें, श.हणमंतप्पा औरादे आणी श.पंचय्या स्वामी उपस्थित होते.


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
२८ व २९ ला होणाऱ्या शरण संस्कृती अध्ययन शिबिरासाठी पेठवडगाव सज्ज

पेठवडगाव (प्रतिनिधी): बसवदृष्टी केंद्र, कोल्हापूर यांचे वतीने आणि वचन अकादमी, पुणे यांच्या सहयोगाने रविवार, दिनांक २८ आणि सोमवार दिनांक २९

Close