बसव महामेळाव्याची जय्यत तयारी

1 min read
लातूर (प्रतिनिधी): लातूर येथे लिंगायत समाजाचा सातवा राजव्यापी बसव महामेळावा रविवार, २८ मे रोजी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) च्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील कार्यकर्ते व लिंगायत धर्मबांधव  मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
बसव महामेळाव्याचे उद्घाटन  ईश्‍वर खंड्रे (कर्नाटक) आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम व परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख  यांचे हस्ते होणार आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील, खा. डॉ. सुनील गायकवाड, खा. भगवंत खुब्बा, आ. अमित देशमुख, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. बसवराज पाटील, आ. ज्ञानराव चौगुले, आ. हेमंत पाटील, आ. सुधाकर भालेराव, आ. त्र्यंबक भिसे, आ. विनायकराव पाटील, आ. विक्रम काळे, जि. प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, महापौर सुरेश पवार,उपमहापौर देविदास काळे,
सोलापूरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी, यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात जीवन गौरव, समाजभूषण व अक्कामहादेवी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच मेळाव्यात सामूहिक लिंगपूजा, लिंगायत आरक्षण, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून घटनात्मक मान्यतेवर त्वरित कार्यवाही , महात्मा बसवेश्‍वरांचे दर्शन या विषयावर चर्चा होणार आहे.
या मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
राज्यस्तरीय दहाव्या शरण संस्कृती अध्ययन शिबिराच्या अध्यक्षपदी डॉ. सुर्यकांत घुगरे

कोल्हापूर (प्रतिनिधी): बसवदृष्टी केंद्र कोल्हापूर आणि वचन अकादमी पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दहाव्या शरण संस्कृती अध्ययन शिबिराच्या अध्यक्षपदी बार्शीतील

Close