२८ व २९ ला होणाऱ्या शरण संस्कृती अध्ययन शिबिरासाठी पेठवडगाव सज्ज

1 min read

पेठवडगाव (प्रतिनिधी): बसवदृष्टी केंद्र, कोल्हापूर यांचे वतीने आणि वचन अकादमी, पुणे यांच्या सहयोगाने रविवार, दिनांक २८ आणि सोमवार दिनांक २९ मे २०१७ रोजी दहावे शरण संस्कृती अध्ययन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी दिव्य सानिध्य पु. डॉ. श्री बसवलिंग पट्टदेवरू, अध्यक्ष,विश्व बसव ट्रस्ट, अनुभव मंटप, बसवकल्याण यांचे असणार आहे. तसेच विशेष महनीय अतिथी म्हणून  श्री अरविंद जत्तीजी व शिबिराध्यक्ष म्हणून सामाजिक शास्त्रज्ञ प्रा. डॉ.श्री. सूर्यकांत घुगरे असतील.

या शिबिराचा मुख्य विषय ‘लिंगायत- स्वतंत्र धर्म व अल्पसंख्याक मान्यता’ हा असेल. शिबीर समर्थ संकुल, गणेश कॉलनी, गणेश मंदिराच्या पाठीमागे, सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकानजीक,पेठवडगाव. ता. हातकणंगले इथे संपन्न होईल.

रविवार, २८ मे, २०१७ उ शिबिराच्या पहिल्या दिवशी खालीलप्रमाणे कार्यक्रम होतील.
स. ९.०० वा. षडस्थल ध्वजारोहण.
स.९.३० वा  दीपप्रज्वलन आणि उदघाटन
स्वागत आणि प्रस्ताविक:  प्रा. भीमराव पाटील, लातूर व  श्री . राजू जुबरे. भालकी.
शरणू समर्पण: राजेंद्र पाटील, नागाव.
*पहिली सभा:* स १०.०० ते दु. २.०० वा.
*दुसरी सभा:* दु. ३.०० ते सा. ५.०० वा.
*तिसरी सभा:* सा ६.०० वा  ते रात्री ८.००वा.
अध्यक्षीय समालोचन: रात्री ८.०० ते ८.४५ वा.
*रविवार, दिनांक: २८ मे, २०१७.*
*वक्ते आणि विषय:*
*पु. डॉ. श्री. बसवलिंग पट्टदेवरू.- लिंगायत: स्वतंत्र धर्म व्यवस्था.*
*मा. श्री. अरविंद जत्ती- लिंगायत धर्म मान्यतेसाठी संघर्ष आणि अडसर.*
*प्रा. श्री. भालचंद्र जयशेट्टी- समदृष्टीकडे पाहण्याची नवदृष्टी.*
*प्रा. श्री. सिद्धण्णा लंगोटी.- लिंगायत स्वतंत्र तत्वदर्शन.*
*प्रा. श्री. आर. एम. करडीगुद्दी.- लिंगायत: स्वतंत्र आहारशैली.*
*सुश्री डॉ. रेखा म. कोटूर.- लिंगायत: स्वतंत्र सामाजिक नीतिमत्ता.*
*सुश्री सविता नाडकट्टी-  लिंगायत: स्वतंत्र संस्कार पद्धती.*
*सुश्री नलिनी वाघमारे – वचन: लिंगायतांसाठी संजीवनी*
*प्रा डॉ श्री अशोक मेनकुदले- अल्पसंख्याक दर्जा प्राप्तीसाठी*
*श्री. नटराज मुरशिल्ली-  लिंगायत: आत्मोन्नती स्वतंत्र आध्यत्मिक पथ.*
*श्री राजू जुबरे- लिंगायत: जात नव्हे, अस्सल  भारतीय धर्म.*
*पु. बसवलिंग देवरू- धर्म आणि जाती : एक विश्लेषण*
*प्रा डॉ. रवींद्र बेंद्रे- लिंगायतांचा अन्य समाज घटकांशी मूल्यधारित सामाजिक व्यवहार*
*प्रा श्री बसवराज कोरे- लिंगायत:  स्वतंत्र नवसंस्कृती*
*सुश्री चेतना गौरशेट्टे- लिंगायत: महिलांना स्वतंत्र हक्क बहाल करणारा स्वतंत्र धर्म*
*प्रा. श्री. भीमराव पाटील- लिंगायतांच्या स्वतंंत्रतेची राष्ट्रीय एकात्मतेशी सांगड आणि संविधाननिष्ठा*
*प्रा डॉ सचितानंद बिचेवार- लिंगायत: स्वतंत्र वैशिष्टयपूर्ण इतिहास.*
*प्रा. डॉ श्री संतोषकुमार गाजले-  लिंगायत संस्कृतीतील अशुद्ध घटकांची भेसळ.*
*सुश्री प्रा.मिनाक्षी हिरेमठ- लिंगायत उत्पत्ती मूलस्थान: कल्याणचा अनुभवमंटप*
*प्रा डॉ श्री रत्नाकर लक्षेट्टे- लिंगायत स्वतंत्र संस्कृतीवरील अतिक्रमणाचा मुकाबला*
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सोमवार, २९ मे, २०१७ रोजी खालीलप्रमाणे कार्यक्रम होतील.
*प्रा. राजा शिरगुप्पे-  बहुजन हितासाठी लिंगायतांचे सामाजिक उत्तरदायित्व*
*प्रा डॉ श्री विजय करजकर- स्वतंत्र लिंगायत साहित्याचे नवस्वरूप*
*श्री धनाजी गुरव- लिंगायतांच्या स्वतंत्र धर्म मान्यता आंदोलनातील  सांस्कृतिक संघर्षाचा पैलू*
*श्री . गंगाधररावजी पटणे- स्वतंत्र धर्म मान्यता: घटनात्मक तरतुदी.*
*श्री. शिवराजप्पा खंकरे- स्वतंत्र धर्म मान्यता व आरक्षण मागणी: एक चिंतन*
*श्री. शिवानंद हैबतपुरे- स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी जनजागरण अर्थात लिंगायत एकीकरण.*
*श्री . अविनाश भोसीकर- अ. भा. लिंगायत समनव्य समितीची वाटचाल: एक लेखाजोखा.*
*श्री. बसवराज कणजे- एकविसाव्या शतकात सांस्कृतिक वेगळेपण जगताना.*
 *श्री.सुनील हेंगणे- लिंगायत- वीरशैव भेद.*
*प्रा. आनंद कर्णे- लिंगायतांची स्वतंत्र आर्थिक दृष्टी.*
*श्री. राजशेखर तंबाके- लिंगायत: स्वतंत्र जीवनशैली.*
*सुश्री प्रा. शालिनी दोडमनी- लिंगायत:  स्वतंत्र कुटुंब पद्धती.*
*प्रा श्री जवाहर चन्नशेट्टी-  लिंगायत ऐक्य- बिघडलेली केमिस्ट्री*
*प्रा. राजेश विभूते- लिंगायत बुद्धिजीवी  वर्गाची मानसिकता.*
*डॉ श्री एस व्ही शेटे- लिंगायत: स्वतंत्र जनांग निर्मिती*
*श्री अभिषेक देशमाने, सांगली.- स्वतंत्र धर्ममान्यता: युवकांची भूमिका.*
*श्री नरेश कुऱ्हेकर- लिंगायत: अंधश्रद्धाविरोधी धर्म.*
 या शिबिरामध्ये वचन गायन होणार असून श्री रामचंद्रप्पा  येरनाळे, भालकी, सुश्री मंदाकिनी पाटील, सुश्री वैजयंती पाटील, कोल्हापूर हे सादरीकरण करतील. विशेष वचन नृत्याचे सादरीकरण कु. शिवप्रिया व कु भक्ती, कोल्हापूर करतील. अशी माहिती संयोजकांतर्फे अभिषेक देशमाने यांनी दिली.


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
बसव महामेळाव्याची जय्यत तयारी

लातूर (प्रतिनिधी): लातूर येथे लिंगायत समाजाचा सातवा राजव्यापी बसव महामेळावा रविवार, २८ मे रोजी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Close