आवाहन: लिंगायत युवा.कॉम च्या संपादकीय व सल्लागार समितीसाठी नामांकने

1 min read

सन्माननीय लिंगायत धर्मीय भगिनी व बंधू,

शरणु शरणार्थ.

लिंगायत युवा.कॉम ही वेबसाईट लिंगायत समाजाच्या एकात्म जाणीवा निर्मितीसाठी व धर्मप्रसारासाठी कार्यरत आहे.

लिंगायत धर्माचे ऐतिहासिक दर्शन व त्याची आधुनिक काळातील उपयोजन यावर ‘अनुभव मंटप’ सारख्या दार्शनिक व मूल्यात्मक व्यवस्थेच्या अनुषंगाने जागतिक लिंगायत धर्मीयांमध्ये सुसंवाद घडवून आणणे व इतर धर्मियांचे लिंगायत धर्माच्या महान दर्शन व कायक तत्वांविषयी लोकशिक्षण करणे हे आमचे मुख्य उद्धिष्ट आहे.

यासाठी, लिंगायत धर्मातील तज्ञ अभ्यासकांचा, कायकजीवींचा, वचन साहित्य अभ्यासकांचा, लिंगायत धर्म चळवळ कार्यकर्त्यांच्या व इतर कर्मशील धर्मबंधू व भगिनींच्या एकत्रित जाणीवामधून लिंगायत दर्शन सैद्धांतिक पातळीवर सक्षम करणे यासाठी आम्ही ‘दार्शनिक सल्लागार समिती’ व ‘निमंत्रित संपादकीय सल्लागार समिती’ तयार करत आहोत.

या समित्यांसाठी आपण आपल्या परिसरातील व माहितीतील सर्वभाषिक लिंगायत धर्मीय तज्ञांचे नामनिर्देशन करावे ही नम्र विनंती.

खालील लिंकवर जावून आपण कृपया नामनिर्देशन नोंद करावे व सविस्तर माहिती भरावी.


आपल्या योगदानाबद्दल लिंगायत युवा. कॉम तर्फे आपले आभार !

शरणु शरणार्थ.

जय लिंगायत धर्म

जय बसवक्रांती

 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
लिंगायत धर्माची ध्वजा फडकली – गायक गणेश वैद्य, औरंगाबाद

 

Close