योगियांचा योगी शिवयोगी स्वन्नलगी – सोलापूरचे सिध्दाराम

1 min read
डॉ. महादेव जोकारे
Follow me

डॉ. महादेव जोकारे

डॉ. महादेव जोकारे हे व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.जोकारे सर लिंगायत धर्माचे अभ्यासक व तज्ञ असून महात्मा बसवेश्वरांच्या दर्शनावर ते सतत लिखाण करत असतात.
डॉ. महादेव जोकारे
Follow me
शिवयोगी सिध्दारामांचा जन्म १२.व्या शतकात स्वन्नलगी आताचे सोलापूर, या गावाचे पाटील मुद्दनगौडा आणि सुग्गलदेवी या कुडीय वंशीय म्हणजे कुडावक्कीलगा शेतकरी घरात झाला. सिध्दारामांचे  लहानपणी चे नाव घुळीमहांकाळ होते, लहानपणापासून धार्मिक वृतीचे होते, मल्लय्या (मल्लिकार्जुन) चे परम भक्त होते, सध्याच्या सोलापूरच्या किल्ल्यातील मल्लिकार्जुन मंदिर सिध्दारामांनी बांधल्याचे संशोधकांचा दावा आहे, सिध्दारामांची शिव भक्ती पाहून स्वन्नलगीचे  (सोलापूरचे) राजे नन्नप्पा आणि राणी चामालादेवी यांनी शिवलिंग स्थापण्यासाठी जमीन दान दिले, त्यात त्यांनी आडूसष्ठ लिंग स्थापन केले. ते सतत मंदिरे आणि शिवलिंग स्थापन करायचे त्यांनी स्वतःचे घर त्यागून बाहेर राहायचे, अनेक लोक त्यांच्या दर्शन भेटीसाठी यायचे. त्यात प्रामुख्याने हाविनहाळ कल्लय्या आणि त्याचे गुरु केदार हे वारंवार भेटले होते, हाविनहाळ कल्लयाचे मंदिर हाविनाळ कर्नाटक येथे आहे, आणि दक्षिण सोलापूर येथील भंडरकवठे (?), निंबर्गी, कंदलगाव या ठिकाणी असलेली केदारेश्वर आणि कलमेश्वर मंदिरे यांचीच असण्याची शक्यता आहे कारण सोलापूरला जाताना ही गावे प्राधान्याने लागतात शिवाय मंदिराच्या शिलालेखातील देवनामे भिन्न आहेत परंतु त्या गावात हिच देव नामे प्रचलित आहेत.
सोलापूर स्वन्नलगी गावातील एक विणकर पती-पत्नी  राहत होते त्यांचे नाव अमोगीदेव आणि रायम्मा हे दोघेही बसव कल्याणला जावून इष्टलिंग दीक्षा घेवून लिंगायत झाले होते, त्यांचे आणि सिध्दारामांचे तात्विक मतभेद झाल्याने ते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा जवळील ‘पुळूज’ येथे स्थलांतर केले ज्यावेळी सिध्दारामांना सत्याची जाण झाली तेंव्हा ते स्वतः पुळूजला जावून अमोगीदेव आणि रायम्मांना सोलापुरला येण्याची विनंती करतात पण ते दोघेही नम्रपणे नकार देवून सिद्धारामांना बसव कल्याणला जावून विश्वगुरु बसवण्णांची भेट घेवून इष्टलिंग दीक्षा घेण्याचे सल्ला देतात. सिध्दारामांच्या संदर्भातील ३४ शिलालेखा पैकी २ शिलालेख पुळूजला आहेत, बाकीचे सोलापूर आणि आसपास गावात आणि कर्नाटक राज्यात आहेत. गुंजेयगाव आताचे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर हे गाव दान असल्याचे शिलालेख आहे.
       सिध्दारामांची कीर्ती सर्वदूर पसरले होते आणि लिंगायत धर्मातील जंगम संघाचे प्रमुख अल्लमप्रभुदेव यांनी सिध्दारामांच्या भेटीला जाण्याचे निश्चित करून सोलापूरला येतात त्यावेळी तिथे एक नवीन मंदिराच्या बांधकामाचे काम चालू असते, तिथे जावून त्या कामगारांना विचारतात तुमचा वड्ड सिद्धाराम कुठे आहेत. ‘वड्ड’ हा कन्नड शब्द आहे ज्याचा अर्थ दगड घडवून घर बांधणारा वड्डर, एक कामगार जावून सिध्दारामांना निरोप देतो की एक योगी पुरुष आले आहेत ते आपल्याला वड्ड कुठे आहे असे विचारात आहेत, ते ऐकून सिध्दारामांना खूप राग येतो ते तडक निघून येतात आणि त्या योग्यास जाब विचारतात तसे ते योगी अल्लमप्रभू म्हणतात दगडाचे बांधकाम करणारे ते वडार असतात आणि तुही तेच करतो आहेस जे आज न उद्या ते नष्ट होणारे आहे. असे काही कर जे निरंतर राहील कधीही नष्ट होणार नाही बऱ्याच वादविवादानंतर शेवटी सिध्दारामांना सत्याची जाणीव होते तेंव्हा ते अल्लमप्रभूंना विनंती करतात की मला योग्य मार्गदर्शन करावे, तसे अल्लमप्रभू म्हणतात बसव कल्याणला ये तिथे विश्वगुरु बसवण्णांची भेट घेवून त्यांच्या मार्गदर्शनाने कार्य कर. सोलापूरच्या सिध्दारामांच्या मंदिराजवळ आजही अल्लमप्रभूंचे मंदिर आहे.
पुढे अल्लमप्रभू सोबत ते बसव कल्याणला येवून विश्वगुरु बसवण्णांची भेट घेतात तेंव्हा अनुभव मंटपचे कार्य जवळून पाहतात बसवण्णांचे घर ज्याला महामने म्हणतात तिथे बसव पत्नी निलाबिंका आणि गंगाबिंका यांचे कार्य पाहतात त्यांना मनाची शांती मिळते आणि स्वत:ही या कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करून चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णां कडून इष्टलिंग दिक्षा घेवून लिंगायत धर्मात कार्यास सज्ज होतात. सिध्दाराम त्यांचे गुरु चन्नबसवण्णांना इष्टलिंग दीक्षा आगोदर वचन देतात  “आधी मी जी वेदिक कर्मे केली ती झाली; यापुढे होमहवनादि कर्मे मी करणार नाही, मी फक्त इष्टलिंग पुजाच निष्ठेने करीन.” ” मुन्न माडीद होमविन्नु माडीदडे तले दंड, इष्टलिंगद पुजेय निष्ठयिंने माडुवेनु कपिलसिध्दमल्लिकार्जुनय्या. अश्या रीतीने सिध्दारामांनी चन्नबसवण्णांकडुन इष्टलिंग घेऊन लिंगायत धर्म चळवळीत सहभागी झाले. कल्याण प्रतीक्रांती नंतर चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा अनुभव मंटप चे तिसरे अध्यक्ष म्हणून सिद्धारामांची नियुक्ती करतात.
सिध्दाराम कल्याण मध्येच कन्नड वचने लिहिण्यास सुरवात केले त्यांचे तशी वचने आहेत, त्यांच्या वचनांचे वचनांकित कपिलसिध्द मल्लिकार्जुन आहे, आणि काहींचा योगीनाथा आहे. विश्वगुरु बसवण्णांच्या महामनेचा आणि माता निलाबिंकाच्या दासोहाचा आणि अनुभव मंटपचा उल्लेख त्यांच्या वचनात आढळतो, “ यले यले लिंगवे, नानंदे बरलील्ला कल्याणक्के ’’ अश्या स्वरूपाचे वचन आहे ज्याचा अर्थ मतितार्थ आहे की अल्लमप्रभुदेव आणि अमोगीदेव-  रायम्मा दांपत्याच्या प्रेरणेने मी कल्याणला आल्याचे सांगतात आणि सिध्दारामांच्या संदर्भातील बऱ्याच शिलालेखात हा वचन वापरला आहे, सर्व शरणात सगळ्यात ज्यास्त शिलालेख आणि दानपत्र सिध्दाराम यांचे आहेत.
सिध्दाराम यांचे वचन साहित्य समृद्ध आहे, ६८.हजार वचने लिहिल्याचे त्यांच्याच वचनात आहे परंतु सध्या १३०० वचने उपलब्ध आहेत, त्यातील ८५१ वचने ताडपत्रात आहेत तर बाकीचे संपादित आहेत. या वचनात १५० वर वचने फक्त विश्वगुरु बसवण्णांच्या स्तुती आणि महिमा आणि त्यांचे विश्वविभूती व्यक्तिमत्व यावर आहेत. सिध्दारामांच्या वचनातून विश्वगुरु बसवण्णांचे व्यक्तित्व आणि महानता सिद्ध होतो. “ बसवण्णाच माझी माता बसवण्णाच माझे पिता बसवण्णाच माझे परम बंधू, बसवण्णाच माझे आप्त वसुधीश कपिलसिध्दमल्लिकार्जुन तुम्हास इष्टलिंग असे नाव दिले ते गुरु बसवण्णांनी. ” “इष्टलिंग जनक बसवण्णाच” असल्याचे सिध्दराम आपल्या वचनांतून सांगतात. बसवण्णा प्रतक्ष शिव स्वरूप आहेत, आणि शिवाचे गुरु बसवण्णा आहेत, असे वचनात लिहिले आणि “ शिवने बसवा, बसवा शिवनो ” असे वर्णन आपल्या वचनातून करतात याचा अर्थ शिव हेची बसव आणि बसव हेची शिव असा होतो, पराशिवाचे तेज बसवण्णा आहेत असेही लिहिले आहे. या वचनांखेरीज बसव स्तोत्र, चन्नबसव स्तोत्र, यासारखी स्तोत्रे लिहिले आहेत.
कल्याण वरून परत येवून सिध्दारामांनी अनेक सामाजिक कामे केली अनेकांना इष्टलिंग दीक्षा देवून त्यांना लिंगायत केले, सोलापूर आणि आसपास अनेक मोठी तले खोदले, आजही सोलापुर आणि आसपास अगदी तुळजापूर तालुक्यातील जेवढे मोठे तळे आहेत ते सर्व सिध्दारामांनी दासोह तत्त्वातून खोदली आहेत, सोलापूर आणि आसपासचा परीसर कायम दुष्काळी भाग राहिला आहे त्यामुळे पाण्याच्या सोयीसाठी तळी खोदुन घेतले, गाय बैल आणि इतर जनावरे दत्तक घेवून त्यांचा सांभाळ करायचे, सामुदाईक विवाह करायचे, आजच्या काळात जे गरजेचे आहे ते सर्व लिंगायत धर्माची देण आहे, पाणी आडवा, नाला बांधणे, सामुदाईक विवाह, गाय आणि इतर जनावरे संरक्षण हे सगळे विश्वगुरु बसवण्णांच्या लिंगायत धर्माचे देण आहे आणि ते शिवयोगी सिध्दारामांनी समर्थपणे पेलून जगास एक आदर्श दिले आहे.
कल्याण प्रतिक्रांती नंतर सिध्दाराम नाराज झाले, आणि ते सोलापूर मधेच राहून अनुभव मंटप चालवू लागले, पण त्यांना बसवादी शरणांचा विरह सहन झाला नाही म्हणून त्यांनी सध्या सोलापुरात असलेल्या मंदिरा जवळील तळ्याच्या मधोमध संजीवन (जिवंत) समाधी घेतली.
अनुभव मंटप ज्याला शुन्य पिठसुध्दा म्हणतात त्याचे चौथे अध्यक्ष म्हणून रुद्रमुनींची नियुक्ती शिवयोगी सिध्दाराम करतात. रुद्रमुनींचे मंदिर सध्या माचणूर, तालुका मंगळवेढा सोलापूर येथे आहे तीथेच भिमा नदीपात्रात जंगम संघाचे प्रतिनिधी रेवणसिध्दाचे मंदिर आहे, आणि हे अनेक लिंगायतांचे कुलदैवत आहे.

लेखक: डॉ. महादेव जोकारे

कंदलगाव, जिल्हा: सोलापूर

मोबाईल: ९७६७५९७०४३

इमेल: drjokaremn74@gmail.com

© डॉ. महादेव जोकारे, २०१७. लेखकाचे संमतीने पुनर्प्रकाशित.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.

फोटो सौजन्य: http://www.solapuronline.inजाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email

डॉ. महादेव जोकारे

डॉ. महादेव जोकारे हे व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. जोकारे सर लिंगायत धर्माचे अभ्यासक व तज्ञ असून महात्मा बसवेश्वरांच्या दर्शनावर ते सतत लिखाण करत असतात.

Read previous post:
मृत्यू : एक सोहळा एक उत्सव

भाग - १ लिंगायत धर्मियांना मरणे पावणे किंवा लिंगैक्य होणे उत्सवासारखे आहे. तो का उत्सव आहे याचे वर्णन करताना बसवलिंग

Close