कायकवे कैलास

1 min read
सुनील समाने
Follow me

सुनील समाने

सुनील समाने लिंगायत धर्माचे अभ्यासक असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.
सुनील समाने
Follow me
कायक करण्यात गुंतल्यावेळी गुरुदर्शनही विसरावे,
लिंगपूजाही विसरावी,जंगम समोर आला तरी पर्वा नको,
कारण कायकातच कैलास असल्याकारणे
अमरेश्वरलिंगसुद्धा कायकात सामावले आहे.
                                                                            –आय्दक्की मारय्या
महात्मा बसवण्णा व शरण-शरणीनी जी एक सामाजिक धार्मिक आर्थिक संकल्पना आणली ती म्हणजे ‘कायक’.
कायक कोणतेही असो त्या कायकालाच ईश्वर मानून, शाश्वत आनंद मानून जे काही आपले कर्म आहे त्या कर्मात ईश्वर दडलेला आहे, श्रमातच कैलास प्राप्ती आहे, प्रामाणिक कायक हाच ईश्वर प्राप्ती चा महामार्ग आहे. असे स्पष्ट आचरणातून सांगितले आहे.
श्रम किती महत्त्वाचे आहे हे महात्मा बसवण्णा शरण आय्दक्की मारय्या सांगताना म्हणतात की,”कायक करण्यात आपण व्यस्त असल्यास आपण गुरू दर्शन ही विसरावे, लिंग पुजा ही विसरावी, जंगमाची तमा न केली तरी चालेले कारण आपण जो कायक करत आहोत त्या कायकातच कैलास सामावील्याने ते कायक निष्ठेने,एकाग्रता ठेऊन करावे. कायकापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही.”
महात्मा बसवण्णानी व शरण-शरणी ने जे समाजप्रबोधन करुन समाजपरिवर्तन केले व बुरसटलेल्या भारतीयांच्या मनात एक नवचेतना निर्माण करुन स्वावलंबी जीवणाचा एक आदर्श घालुन दिला. भारतीय समाजात जी ऐतखाऊ वृत्ती (ब्राम्हण, पुरोहित, सावकार, शेट्टी) वाढीस लागली होती. त्या ऐतखाऊ समाजावर ऐतिहासिक प्रहार करुन स्वकष्टाचे, श्रमाचे महत्त्व स्वताः आचरणात आणून नंतर समाजाला पटवून सांगितले. श्रमाला (कायकाला) धार्मिक चौकटीत बसवून “कायकवे कैलास” हे नवीन सूत्र समाजाला देऊन श्रमप्रतिष्ठेला एक अलौकिक उंची प्राप्त करुन दिली.
‘कायकाला देव मानणारा’, ‘कायकाला दैविकता प्राप्त करून देणारा’, ‘भेदभावरहित कायक’,’आपल्या आवडी नुसार कायक (ऐच्छिक कायक)’, ‘अधिक फळांची आशा न करणारा कायक’, ‘मानव समाजाचे देणे लागतो म्हणुन समाजासाठी कायक’, व ‘कायकातुन समाजासाठी दासोह’ अशी अप्रतिम व समाजकल्याणी समाजवादी रचना करून मानवी जिवनातील मानवतावाद प्रबळ करून समाज एकत्रीकरणाचे कार्य महात्मा बसवण्णा व शरण-शरणी ने केले आहे.
कायक सिद्धांतामुळे समाजातील जातीभेद-वर्णभेद नष्ट होऊन सर्वधर्म समभाव, मानवामध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता या मानवी मुल्यांची जोपासणा झाली. समाजात श्रमप्रतिष्ठेला असाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. या मुळे समाजातील विषमता कमी होऊन समाज उद्योगमुख होणास मदत झाली. अशा प्रकारे मानवासाठी समाज व समाजासाठी मानव याची अप्रतिम जोड घालून नवीन समाजरचना महात्मा बसवण्णानी व शरण-शरणी नी तयार केली.

लेखक:सुनिल चन्नाप्पा समाने (सर)

मु.पो.जकेकूर ता.उमरगा जि.उस्मानाबाद
रेंजहिल्स सेकंडरी स्कूल खडकी पुणे
प्रणयराज प्लाजा सोसायटी, विश्रांतवाडी, गोकूळनगर, धानोरी रोड, पुणे
इमेल:  sunil.samane@gmail.com

©सुनिल चन्नाप्पा समाने,२०१७. लेखकाचे संमतीने पुनर्प्रकाशित.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखाकाधीन.

फोटो सौजन्य:http://lingayatreligion.comजाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email

सुनील समाने

सुनील समाने लिंगायत धर्माचे अभ्यासक असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.

Read previous post:
जागतिक आद्य लोकसंसद : अनुभव मंटप

विश्वगुरु महात्मा बसवण्णा हे आधुनिक, प्रगत, समाजपरिवर्तनवादी, समाजवादी विचारांचे प्रेरणास्त्रोत. या स्त्रोतातून मानवी लोककल्याणकारी असे  जे धगधगते सुर्यकिरण पडले त्यापैकी

Close