जागतिक आद्य लोकसंसद : अनुभव मंटप

1 min read
सुनील समाने
Follow me

सुनील समाने

सुनील समाने लिंगायत धर्माचे अभ्यासक असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.
सुनील समाने
Follow me
विश्वगुरु महात्मा बसवण्णा हे आधुनिक, प्रगत, समाजपरिवर्तनवादी, समाजवादी विचारांचे प्रेरणास्त्रोत. या स्त्रोतातून मानवी लोककल्याणकारी असे  जे धगधगते सुर्यकिरण पडले त्यापैकी विश्वाला प्रकाशमान करणारे किरण म्हणजे ‘अनुभव मंटप’ होय. ‘अनुभव मंटप’ हे मानवी जीवणाला ‘संस्कारक्षम’ बनविण्यासाठीचे एक मुक्त असे संस्कारपीठ होत. यात मानवहीत हाच केंद्र बिंदू मानून मानवाच्या सामाजीक,आर्थिक, धार्मिक शिक्षणाचे मुख्य दालन निर्माण केले होते.
तत्कालीन समाजातील दबलेल्या आवाजांचा हुंकार बनुन समाजातील सर्व जाती-वर्णातील स्त्री- पुरुषांना धार्मिक, सामाजिक, आर्थिक विषयावर बोलतं करुन संसदीय लोकशाहीचे बिजे रुजविण्याचे क्रांतिकारी कार्य या अनुभव मंटपाने केले. अनुभव मंटप हे मानवी विकासाची, सर्वधर्म समभावाची, समाजातील आर्थिक दरी कमी करण्याची व लोककल्याण करणारी जगातील मानवतावादी विचारांची ‘पहीली प्रयोगशाळा’ होय.
विशेषतः, या जागतिक पहिल्या संसदेचे ‘अध्यक्ष’ हे एका तथाकथित ‘शुद्र’ जातीतून आलेल्या पण ज्ञानाचे महासागर असणारे ‘अल्लमप्रभु’ यांना करून जाती-वर्णाच्या भेदाला पहिला सुरुंग लावण्याचे क्रांतिकारी कार्य याच ‘अनुभव मंटपाच्या’ माध्यमातून विश्वगुरु महात्मा बसवण्णांनी केले.
वचनसाहित्य निर्मितीची प्रक्रिया 
अनुभव मंटपात सर्व जाती-वर्णातील समाज एकत्र येऊन समाजहीतवादी विचार मांडत व त्यावर चर्चा, वादविवाद होत. या चर्चेमध्ये ‘मानव’ हाच केंद्रबिंदू असत व ‘मानवातील देवत्व’ जागे करून जात-वर्ण-लिंग भेद विरहीत समाज घडविण्याचे कार्य या लोकसंसदेमध्ये होत असे.
या अनुभव मंटपात सर्व लोक आपली ‘आत्मानुभूती’, ‘स्वानूभव’, ‘विचार’ मांडत असत. हे विचार मांडत असताना त्यांनी ते स्वतः प्रथम आचरणात आणावे लागत असे. त्यानंतर, त्यांचे विचार व ‘दैनंदिन व्यवहार’ याचा मेळ घालण्याचा प्रयत्न होत असे. सर्वाचे विचार घेतले जात काही वेळा त्यात दुरुस्त्याही केल्या जात व नंतर सर्व शरण-शरणी च्या उपस्थित सर्वानी मान्यता दिल्यानंतर त्या विचाराचे ‘वचना’ मध्ये रुपांतर होत.  त्याला ‘वचन’ म्हणुन मान्यता मिळत. असे मान्यता मिळालेले ‘वचन’ ‘षटस्थल चक्रवर्ती चन्नबसण्णा’ यांच्या कडे जात व त्यावर ‘शिक्कामोर्तब करण्याचे कार्य ते करत. वचन भांडारी शरण शांतरस हे सर्वानी संमती दिलेले वचने सुंदर व स्वच्छ अक्षरात भूजपत्रावर लिहित व ती वचने ‘वचन भांडारात’ व्यवस्थित व सुरक्षित ठेवली जात. ‘वचन संग्रह भांडारात’ बसून इच्छेनुसार लोक वाचू शकत व ‘वचनभांडारी शरण शांतरस’ यांच्या अनुमती ने ते लिहून किंवा नकल करून त्या वचनाचा वापर प्रचार, प्रसारासाठी करवून घेता येत असे. ‘वचनभांडार’ म्हणजे आजच्या युगातील सार्वजनिक ग्रंथालय असे आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे, मानवतावादी विचारांचे बिजे रोवणारी वचने तयार होत.
ज्या काळात पुरूषांना शिक्षित साक्षर करणे महाकठीण होते. अशा काळात महात्मा बसवण्णानी स्त्रियांना शिक्षित करून स्त्री शिक्षणाची दारे सताड उघडली व त्याची सुरवात आपल्या घरातून केली. अनुभव मंटपात ७०० [शरण] पुरूष व ७० [शरणी] स्त्रियांचा समावेश होता. ते सर्व बहूतांशी तत्कालीन मागास वर्गातून आलेले होते. ज्यांना साधे स्पर्श करण्याचे स्वातंत्र्य नव्हते अशा दबलेल्या, पिचलेल्या, पिळलेल्या समाजाच्या वेदनेचा हुंकार हा अनुभव मंटपात फुंकला गेला. सर्वधर्मसमभाव व जात-वर्ण-लिंग विरहित समाज घडविण्याचे क्रांतिकारी कार्य अनुभव मंटपाच्या माध्यमातून या विश्वात पहिल्यांदा विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांनी केले.
अनुभव मंटपाची महत्त्वाचे वैशिष्ट्य
धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात राजेशाहीचा विळखा असताना, राजाचा राजाश्रय नसतानाही केवळ आणि केवळ लोकाश्रयाच्या बळावर चालविलेले हे विद्येचे महाविद्यापिठ, लोककल्याणकारी लोकशाहीचे उगमस्थान महात्मा बसवण्णा यांच्या अतुलनीय अशा प्रयत्नाच्या पराकाष्टाने उभा राहिलेले मानवतावादी विचारांचे मंदीर म्हणजे ‘अनुभव मंटप’ होय.

लेखक:सुनिल चन्नाप्पा समाने (सर)

मु.पो.जकेकूर ता.उमरगा जि.उस्मानाबाद
रेंजहिल्स सेकंडरी स्कूल खडकी पुणे
प्रणयराज प्लाजा सोसायटी, विश्रांतवाडी, गोकूळनगर, धानोरी रोड, पुणे
इमेल:  sunil.samane@gmail.com

©सुनिल चन्नाप्पा समाने,२०१७. लेखकाचे संमतीने पुनर्प्रकाशित.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखाकाधीन.

फोटो सौजन्य:http://basavasamithibrisbane.orgजाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email

सुनील समाने

सुनील समाने लिंगायत धर्माचे अभ्यासक असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.

Read previous post:
Mahatma Basveshwar

Translated from original by Rashmi Malapur The first leader to introduce women empowerment – World leader, proponent of equality, Mahatma

Close