मी लिंगायत…. माझा धर्म लिंगायत

1 min read
गणेश वैद्य
Follow me

गणेश वैद्य

बसव वचन अभ्यासक at औरंगाबाद
गणेश वैद्य हे बसव वचन या विषयावर अभ्यासक असून ते लिंगायत धर्माविषयी आपले विचार वेगवेगळ्या व्यासपीठावरून व्यक्त करून लिंगायत धर्माविषयी लोकजागृती करत असतात.
गणेश वैद्य
Follow me
दोनचार दिवसा पासुन बघतोय काही ‘भट लिंगायत’ स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी व्यर्थ बडबड करतायत. मुळात अश्यानां विचारांची कोणतीच बैठक दिसत नाही यांचे लक्ष फक्त समाजात फुट पाडुन आपली वर्षानुवर्षे लोकांना मुर्ख बनवून देवा धर्माच्या नावाखाली चालु असलेली त्यांची रोजगार हमी योजना जिवंत ठेवणे आहे. आणि, अश्या योजनेला महात्मा बसवेश्वरांची वचने सुरंग लावत आहेत हेच मुळी त्यानां सहन होत नाहीये. त्यामुळे त्यांनी बसवतत्वांचा प्रचार-प्रसार करणाऱ्यावर वैयक्तिक टीका करणे सुरू केले आहे. त्यांना असे वाटते की यातुन बसव शरणांचे मानसिक खच्चीकरण होईल. तसाच प्रकार सध्या माझ्या बद्दल होतोय. मला एक कळत नाही मी फक्त महात्मा बसवेश्वरांची वचने समाजापुढे आणण्याचे काम करतोय त्याची एवढी मिरची का लागावी ? अश्याच संधी साधु लोकांमुळेच आज पर्यंत खरे महात्मा बसवेश्वर कोणालाच समजु शकले नाहीत. कोण किती पुरातन आहे? कोणी कोठून जन्म घेतलाय ? ह्या पेक्षा समाजा करीता आजच्या काळात काय योग्य आहे आणि कोणी समाजा करीता काय योगदान दिलय की फक्त कर्मकांडाच्या जाळ्यात ओढुन सर्वसामान्य समाज बांधवांचे आर्थिक शोषण केलय हे समाज बांधव आता चांगले ओळखु लागले आहेत, आणि हेच महत्वाचे आहे.
आज २१ व्या शतकात समाजाला विज्ञाननिष्ठ धर्माची गरज आहे आणि ती तत्वे फक्त महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेला लिंगायत धर्मच देऊ शकतो. आता निर्णय घेण्याची वेळ आपल्या सर्वाची आहे की आपल्याला विज्ञाननिष्ठ परिश्रमवादी खरा परमार्थात सांगणारा धर्म हवा आहे की वर्षानुवर्षे पाप-पुण्याची स्वर्ग नरकाची देवा-धर्माची खोटी भीती दाखवून कर्मकांडाच्या जाळ्यात ओढुन आर्थिक शोषण करून मानसिक गुलाम करणारा धर्म हवा आहे.आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट मी फक्त या पुढे कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही कारण महात्मा बसवेश्वरांचे एक वचन आहे तेच सर्व टीकाकांराचे तोड बंद करण्यास सक्षम आहे:
कोणी आमच्यावर रागावून
आमचे बिघडणार काय ?
सारा गाव आमच्यावर रुष्ट झाल्यास  तरी आम्हास त्याचे वाटेल काय ?
हत्तीवरून जाणाऱ्याला कधी कुत्रे चावेल काय ?
असता पाठबळ आम्हांस कुडलसंगमदेवाचे
मी ठरवलय भुंकणाऱ्या कुत्र्यानां यापुढे उत्तर देणार नाही. त्यापेक्षा तो वेळ सत्कारणी लावण्याकरिता माझा भर राहील. कारण खरचं सांगु कामा मुळे माझ्याकडे फारच कमी वेळ शिल्लक असतो आणि भुंकणाऱ्याकडे वेळच वेळ असतो. हे आपल्या सारख्या सुज्ञ समाज बांधवांच्या लक्षात आलेच असेल. आता जर कोणी बसव वचनामृत पाहुन व्यर्थ बडबड करत असेल तर त्याला सुज्ञ समाज बांधवांनीच उत्तर द्यावे. आणि समजून घ्यावे की तो टीकाकार कोणाचा दलाल आहे. माझ्या सारख्यावर जर कोणी मी हे बसववचन प्रसारांचे  काम कोणता तरी स्वार्थ ठेवून करतोय असे वाटते असेल तर अश्यानी माझ्याविषयी व माझ्या परिवारा विषयी सर्व काही माहिती काढुनच टीका करावी कोण किती पाण्यात आहे आपल्या लगेचच लक्षात येईल.
शरणु शरणार्थी…. जय बसवण्णा….. जय लिंगायत…….

लेखक : गणेश वैद्य, औरंगाबाद

मोबाईल: 9595957772
ईमेल: gvaidya999@gmail.com

© गणेश वैद्य,२०१७. लेखकाचे संमतीने पुनर्प्रकाशित.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.जाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email

गणेश वैद्य

गणेश वैद्य हे बसव वचन या विषयावर अभ्यासक असून ते लिंगायत धर्माविषयी आपले विचार वेगवेगळ्या व्यासपीठावरून व्यक्त करून लिंगायत धर्माविषयी लोकजागृती करत असतात.

Read previous post:
कायकवे कैलास

कायक करण्यात गुंतल्यावेळी गुरुदर्शनही विसरावे, लिंगपूजाही विसरावी,जंगम समोर आला तरी पर्वा नको, कारण कायकातच कैलास असल्याकारणे अमरेश्वरलिंगसुद्धा कायकात सामावले आहे.

Close