लिंगायत एक स्वतंत्र धर्म

1 min read
डॉ. महादेव जोकारे
Follow me

डॉ. महादेव जोकारे

डॉ. महादेव जोकारे हे व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.जोकारे सर लिंगायत धर्माचे अभ्यासक व तज्ञ असून महात्मा बसवेश्वरांच्या दर्शनावर ते सतत लिखाण करत असतात.
डॉ. महादेव जोकारे
Follow me

लिंगायत धर्माची निर्मितीच मुळात सनातनी वैदिक धर्माच्या विरोधातील आहे. बाराव्या शतकात विश्वगुरु बसवेश्वरांनी सर्व व्यवसाय जातीच्या लोकांना घेऊन समानतेवर आधारित अवैदिक लिंगायत धर्माची स्थापना केली. सर्वांना इष्टलिंग स्वरुपातील शिव गळ्यात बांधला. शिव हा द्रविडांचा आराध्य आहे; त्याचा पुरावा हडप्पा शिव संस्कृतीत मिळतो. बसवादि शरणांच्या वचन साहित्यात मिळतो; तसेच वैदिकांच्या ऋग्वेदात सुध्दा त्याचा पुरावा आहे.

शिवाची पुजा ही १५ हजार वर्षापुर्वीसुध्दा होत होती ते मातीच्या शिवपिंडी स्वरूपात. शिव मंदिरे नव्हती. मंदिर संस्कृती सुरु झाली ती ४ थ्या शतकापासून. हडप्पाच्या शिव संस्कृतीत मातीच्या शिवपिंडीचे पुजन होत होते जे एका ठरावीक कालावधीत करीत असत. आणि दुसऱ्या दिवशी त्याचे शेतात विसर्जन केले जायचे. आजही कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात श्रावण महिन्याच्या एक महीना आगोदर ‘गुळ्ळवा’ सण साजरा करतात मंगळवारी संध्याकाळी शेतातून माती आणून त्याचे एक बैल एक स्त्री मूर्ती एक शिवपिंडी तयार करुन त्याची पुजा करतात आणि बुधवारी त्याचे शेतात विसर्जन करतात.

ज्या वेळी वैदिक लोक भारतात आले त्यांनी शिव पुजेला विरोध केला.  त्याचा पुरावा त्यांच्याच ऋग्वेदात आहे. ऋचा ७/२१/५ यात शिवाला शिश्नदेव म्हणून हिणवले आहे. “न यातव इंद्र जुजुवर्नो न वंदना शविष्ट वेद्यामि : l स शर्घदर्यो विष्णुस्य जंतोर्मा *शिश्नदेवा*अपिगुर्तमन : ll ” याचा अर्थ असा होतो ” ‘शिवपुजक’ जे आमच्या यज्ञ कार्यात बाधा आणतात आणि आमचे यज्ञ नाश करतात आणि आमच्या यज्ञात केल्या जाणाऱ्या पशु हत्तेला विरोध करतात अश्या जादूटोणा जाणणाऱ्या शिवपुजकांना ठार मारण्यात इंद्राला खुप आनंद होतो. यात जादूटोणा शब्द आहे, द्रविडांकडे अशी काही  हत्यारे होती जी विज्ञानाच्या आधारे काम करीत जे वैदिक लोकांना जादूटोणा वाटत असत. याही उपर ज्यांना वाटतो की शिव पुजा सनातनी वैदिक लोकही करतात आणि लिंगायत सुध्दा करतात तर लिंगायत धर्म ‘स्वतंत्र कसा’ याच उत्तर वर आहेच. शिव हा वैदिकांचा देव नाही, आणि हिंदु सनातनी हे वेद आगमांना प्रमाण मानतात.

लिंगायत धर्माचे धर्म ग्रंथ म्हणजे  बसवादिशरणांचे वचन साहित्य जे प्रत्येक शरणांनी आपल्या अनुभवातुन लिहिले आहे. मी त्यातील  फक्त विश्वगुरु बसवण्णांच्या एका वचनाचा उल्लेख करतो.

” वेदाला म्यानबंद करेन !

शास्त्रांना बेड्या घालेन !

तर्काच्या पाठीवर कोरडे ओढेन !

आगमांचे नाक कापेन !

महादानी कुडलसंगमदेवा .”

या वचनातच लिंगायत हे अवैदिक आणि आगम, शास्त्र, तर्क यांना मानत नाही. त्यामुळे, लिंगायत हा धर्म अवैदिक, म्हणूनच तो स्वतंत्र धर्म आहे.

आता कायद्याच्या भाषेत लिंगायत धर्म कसा वेगळा आहे याचही उत्तर कायद्यात आहे. मी कायद्याचा अभ्यासक नाही, पण, जे कायदे तज्ञ आहेत त्यांचे मत आणि काही माननीय सुप्रीम कोर्टाने नोंदवलेली मते.

आर्टिकल २५, २६, आणि १४ यामध्ये यासंदर्भात मुलभूत माहिती मिळेल.

आर्टिकल २५ (१०) मध्ये ‘हिंदू म्हणजे कोण?’ हे स्पष्ट करण्यात आले आहे. तिथे म्हणतात,  हिंदू म्हणजे वेद स्वीकारणारा (किंवा मानणारा), आगम पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात, तीर्थयात्रेला जातात, आणि वर्ण व जातीवर विश्वास ठेवतात.

सुप्रीम कोर्टाच्या यग्नपुरुषदासाजी विरुद्ध मुलुदास (Yagnapurushdasaji Vs Muludas AIR 1996 SC 1119 :(1966) I SCR134, dated 14/01/1996, Bench : Gajendragadakar.P.B. in para number 264) या केसची सुनावणी देत असताना माननीय सुप्रीम कोर्टाने असे मत नोंदले आहे की, बुध्दांनी बुध्द धम्म स्थापन केला; महाविरांनी जैन तर बसवेश्वरांनी लिंगायत धर्म स्थापन केला तर तुकाराम आणि ज्ञानेश्वरांनी वारकरी सांप्रदाय (Cult) चालू केला, गुरु नानकांनी शिख ,दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज तर चैत्यन्य महाराजांनी भक्ती सांप्रदाय  यात धर्म (Religion) आणि सांप्रदाय, समाज हे स्पष्टपणे नोंदले आहेत.

आता प्रत्येकांनी विचार करुनच निर्णय घ्यावा. (समाप्त)

 

लेखक: डॉ. महादेव जोकारे

कंदलगाव, जिल्हा: सोलापूर

मोबाईल: ९७६७५९७०४३

इमेल:drjokaremn74@gmail.com

© डॉ. महादेव जोकारे,२०१७. लेखकाचे संमतीने पुनर्प्रकाशित.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.जाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email

डॉ. महादेव जोकारे

डॉ. महादेव जोकारे हे व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. जोकारे सर लिंगायत धर्माचे अभ्यासक व तज्ञ असून महात्मा बसवेश्वरांच्या दर्शनावर ते सतत लिखाण करत असतात.

Read previous post:
Akka Mahadevi: A Rebel Lingayat Poetess from India

Author: Rashmi Malapur Akka Mahadevi: A contributor to the empowerment of women, social reformist and rebel poetess of India. She

Close