लिंगायत युवा.कॉम या वेबसाईटसाठी लिंगायत धर्मियांना व अभ्यासकांना लेखनासाठी आवाहन

1 min read

आदरणीय लिंगायत धर्मभगिनी व बंधूनो,

शरणू शरणार्थ,

समस्त जागतिक लिंगायत धर्मियांच्या समस्या, विचार, तत्वज्ञान, घडामोडी, विकास विचार, युवकांचे महिलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न या सर्वाना एक युवक केंद्रित व्यासपीठ तयार करून देण्याच्या हेतूने आम्ही www.lingayatyuva.com ही वेबसाईट तयार केली आहे.

या वेबसाईटसाठी आपले लेखन, कार्यक्रमासंबंधी माहिती, आपले चर्चात्मक तसेच विश्लेषनात्मक लिखाण, अनुभव, लिंगायत धर्म विचार तसेच संस्कृती, परंपरा, खाद्य परंपरा, महिलांची दार्शनिक परंपरा आदी विषयावरील चिंतन व स्फुट लेख  यांचे स्वागत आहे.

कृपया आपले लेख editor@lingayatyuva.com या इमेल पत्त्यावर पाठवून द्या.

सोबत लेखकाचा फोटो, व इतर आवश्यक माहिती तसेच वाचकांना संपर्क साधता येईल अशी सर्व आवश्यक माहिती पाठवून द्या.

एकात्म लिंगायत धर्माच्या जाणीवा पुनरुज्जीवित करणे, बसवक्रांती समजावून घेणे व कृतीत उतरवणे, लिंगायत धर्माच्या स्वतंत्र दर्शनाविषयी आणि मुल्यांविषयी माहिती घेऊन ती तत्वे आत्मसात करणे, लिंगायत धर्माविषयी जागतिक समुदायाचे लोकशिक्षण करणे, समान विचारसरणीच्या देशी व जागतिक धार्मिक तसेच मूल्यात्मक प्रवाहासोबत संवाद साधणे या उद्देशांसाठी एकत्र येवून विचारांचे आदान-प्रदान करण्याच्या या प्रक्रियेत सामील व्हा.

एका प्रगत कायक धर्माचा वारसा आणि बसव क्रांतीचे बाळकडू घेऊन जन्माला आलेल्या तमाम लिंगायत धर्मियांना शरणू शरणार्थ !

जय बसवक्रांती !!

आपले विश्वासू,

संपादक, लिंगायत युवा. कॉम

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
उदगीरमध्ये ‘बसव प्रबोधन शिबिरा’चे आयोजन

उदगीर(प्रतिनिधी): उदगीर येथे येत्या २२ मे पासून २६ मे पर्यंत 'बसव प्रबोधन शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. बसव अनुभव मंटप

Close