बसवमहामने – बसवकल्याण

1 min read
सुनील समाने
Follow me

सुनील समाने

सुनील समाने लिंगायत धर्माचे अभ्यासक असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.
सुनील समाने
Follow me

ऐतिहासिक बसवकल्याण हे शरणभूमी म्हणुन ओळखले जाते. महात्मा बसवण्णा व ‘शरण-शरणीनी’ची सामाजिक समाजक्रांतीची समता चळवळ उभी केली. त्या चळवळीचा उदय याच बसवकल्याण मध्ये झाला. त्या चळवळीलाच लिंगायत चळवळ या नावाने ओळखले जाते.

महात्मा बसवण्णांनी “अनुभव मंटप” याच पवित्र भुमीत निर्माण करून वचनसाहित्य नवनिर्माण युगाचा आरंभ केला. याच ठिकाणी हजारो शरण आपले कायक व दासोह करून शरणमय जीवन जगले. आजही या शहरात बसव कालीन शरणांच्या गुहा, ऐक्यस्थळ, स्मृतीस्थळे, मठ कायकस्थळे आपणास पाहावयास मिळतात.

१९६५ मध्ये कल्याण या शहराचे बसवकल्याण हे नामांतर झाले. बिदर जिल्ह्यातील हा तालुका आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र बनले आहे.

बसवकल्याण या शहराला बसवचरण लाभले यांचे महत्त्व ओळखून लिंगायत धर्म प्रचारक जगतगुरु पूज्य माते महादेवी यांनी “बसवमहमने बनविण्याची सुरवात २१/१२/२००१ केली. तो २२ एकरचा परिसर आहे.

महात्मा बसवण्णांचा १०८ फुटी पुतळा

बसवकल्याणच्या वैभवात भर घालून त्याची शोभा वाढवणारा महात्मा बसवण्णांचा हा महाकाय पुतळा शिल्पकार के. श्रीधर मूर्ती या शिल्पकारांनी अतिशय नयनमनोहर बनवीला आहे.

हा महात्मा बसवण्णांचा पुतळा ६०✖८० फुट आहे.हा जमिनीत २४ फुट खोल व वर १०८ फूट आहे.

या मुर्तीचे अनावर २८आँक्टोबर २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बी,एस.यदियुरप्पा व जगतगुरु पुज्य माते महादेवी यांच्या हस्ते झाले.

लिंगायत धर्मपिठ

लिंगायत धर्म प्रचार प्रसारासाठी लिंगायत धर्मप्रसारक प्रथम महिला जगतगुरु पूज्य माते महादेवी यांनी २००१ मध्ये या पिठाची स्थापना केली,भव्यदिव्य अशी चार मजली हे धर्मपिठ आहे.यात प्रार्थना मंदिर,ध्यानगृह वा शरण धाम आहे.

निलांबिका दासोह निलय, चन्नबसवेश्वर पुस्तक भांडार, अक्क नागलांबिका अनाथालय, वृद्धाश्रम, शरणधाम, सभामैदान इत्यादी सोयी सुविधा या धर्मपिठात आहेत. येथे प्रती रविवारी सामुदायिक प्रार्थना, प्रती पौर्णिमेला शरणसंगम कार्यक्रम संपन्न होतो वचनानुभव, वचन व्याख्यान,वचन प्रवचन, वचन नृत्य या धर्मपिठात होतात.

महात्मा बसवण्णा गुहा

याच महामने मध्ये महात्मा बसवण्णा नावाची ३६५ मीटर लांब गुहा तयार केली आहे या गुहेत महात्मा बसवण्णा, माता निलांबिका, चन्नबसण्णा, अक्क महादेवी, माडिवाळ माचय्या, शिवयोगी सिद्धरामेश्वर या षटगणाधिशांच्या हुबेहूब व सुंदर मुर्त्या आहेत.

अक्क महादेवी गुहा

महात्मा बसवण्णा च्या महाकाय मुर्तीच्या उत्तर बाजूस अक्क महादेवी गुहा आहे. या गुहेच्या प्रवेशद्वारा जवळ जंगल बनविले असून ही गुहा ६०० फुट लांब आहे. या गुहेत अनेक शरणांच्या मुर्त्या स्थापन केल्या आहेत.

ध्यान मंटप व शिल्प संग्रहालय

महाकाय मूर्तीच्या खाली ध्यान मंटप आहे. तेथे महात्मा बसवण्णाची सुंदर मुर्ती स्थापना केली आहे. मुर्तीच्या सभोवताली खुल्या जागेत सुंदर उद्यान आहे. बाजुला ३६ मूर्तीच्या शिल्पातून महात्मा बसवण्णा चे जीवनचरित्र शिल्पसंग्रहालय आवर्जून पाहण्या सारखे आहे.

हरळय्या तीर्थ

मूर्तीच्या पाठीमागे गोलाकार साठवण तलाव करून मध्यवर्ती हरळय्या व कल्याणम्मा व लावण्यवती यांचे शिल्प तयार केले आहे.

अष्टगण शरण समूह

मूर्ती कडे खालून जात असताना १०८ पायऱ्या चे दोन पथमार्ग आहे व मध्यभागी उतरत्याक्रमाने अल्लमप्रभु,मलेयमहादेश्वर,संतशिरोमणी मन्मथ माऊली, तोंटदसिद्धलिंगेश्वर,घनलिंगदेवरू,षण्मुशिवयोगी, देवनूर श्रीगुरुमल्लेश, पुज्य लिंगानंद स्वामीजी या आठ शरणांच्या स्थारूढ मुर्त्या सुंदररित्या स्थापित केल्या आहेत.

शरणग्राम

१२ व्या शतकात महात्मा बसवण्णा सोबत अनेक कायकधारी शरण राहत होते,त्यांचे कायक व गावगाडा शरणग्राममध्ये शिल्परुपी अत्यंत सुबक,सुंदर,बोलक्या व हुबेहूब मुर्त्यात जिवंतपणा भरला आहे.शरग्राम पाहताच आपण निश्चितपणे १२ व्या शतकात रममान होतो व आपली बसव कालीन संस्कृतीची क्षणोक्षणी आठवण होते.

या शरणग्राम मध्ये शरण हुगार मादय्या, शरणी सोमव्वे, संकव्वे, भिमव्वे, काळव्वे, शरण जेडर दासिमय्या, पुण्यश्री दुग्गवळे वैद्य संगण्णा, शरणी गौरम्मा, शरण हविनाळ कल्लय्या, बाचीकायक बसवय्या, बहुरुपी चौडय्या, शरण भिमय्या व शरणी अक्कम्मा यांचे कायकधारी शिल्प आहेत.

अनुभव मंटप

भालकी मठाधिश परमपुज्य बसवलिंग पट्टदेवरू यांनी बसवकल्याण येथे अनुभव मंटप इमारत बांधून त्यात बसवण्णा व शरण-शरणी चे छायाचित्रे सुंदररीत्या लावली आहेत. येथे दर वर्षी मोठ्या प्रमाणात वचनसाहित्य विजयोत्सव साजरा करतात.

बसवकल्याण हा महात्मा बसवण्णा व शरण-शरणी च्या पदस्पर्शाने पावन झालेला भुभाग आहे व यास भेट देणे आपले धर्म कर्तव्य आहे.

शरणु शरणार्थी

 

संदर्भ:

१. ऐतिहासिक बसवकल्याण- डॉ. भीमराव पाटील

 

लेखक:सुनिल चन्नाप्पा समाने (सर)

मु.पो.जकेकूर ता.उमरगा जि.उस्मानाबाद
रेंजहिल्स सेकंडरी स्कूल खडकी पुणे
प्रणयराज प्लाजा सोसायटी, विश्रांतवाडी, गोकूळनगर, धानोरी रोड, पुणे
इमेल:  sunil.samane@gmail.com

 

 

©सुनिल चन्नाप्पा समाने,२०१७. लेखकाचे संमतीने पुनर्प्रकाशित.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखाकाधीन.जाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.


Print Friendly, PDF & Email

सुनील समाने

सुनील समाने लिंगायत धर्माचे अभ्यासक असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.

Read previous post:
लिंगायत युवा.कॉम या वेबसाईटसाठी लिंगायत धर्मियांना व अभ्यासकांना लेखनासाठी आवाहन

आदरणीय लिंगायत धर्मभगिनी व बंधूनो, शरणू शरणार्थ, समस्त जागतिक लिंगायत धर्मियांच्या समस्या, विचार, तत्वज्ञान, घडामोडी, विकास विचार, युवकांचे महिलांचे, ज्येष्ठ

Close