दहावे शरण संस्कृती अध्ययन शिबीर पेठवडगाव इथे येत्या २८-२९ मे ला

1 min read

पेठवडगाव (प्रतिनिधी): ‘लिं. म. बा. पाटील शरण सेवा ट्रस्ट’ च्या ‘बसव दृष्टी केंद्रा’ मार्फत आयोजित करण्यात येणारे ‘दहावे शरण संस्कृती अध्ययन शिबीर’ कोल्हापूर जवळील पेठवडगाव इथे येत्या २८-२९ मे ला आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास श्री बसवलिंग पट्टद्देवरू, अरविंद जत्ती, डॉ. सुर्यकांत घुगरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचबरोबर भारतातील अनेक लिंगायत धर्मअभ्यासकांचा सहभाग व मार्गदर्शन शिबिरात असणार आहे.

शिबिराचा प्रधान विषय ‘लिंगायत-स्वतंत्र धर्म व अल्पसंख्याक दर्जा मान्यता’ असा असून या विषयातील नामवंत तज्ञ लिंगायत शिबिरार्थीना मार्गदर्शन करतील.

या शिबिरात भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी सौ. अनुबंधा लंबे मॅडम (७०८३८१२८७६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
We are accepting new articles to post on the website

Close